रेल्वे 20 सेकंद उशीरा आल्यामुळे जेव्हा जपानच्या रेल्वे कंपनीने चक्क माफी मागितली..

बुलेट ट्रेन

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, गाडी 20 सेकंद लवकर आली म्हणून कंपनीने माफी मागावी ही एक अद्भूत घटना आहे.

जपानच्या रेल्वे कंपनीने 20 सेकंद गाडी आधी सोडल्याने माफी मागितल्याची बातमी काही वर्षांपूर्वी प्रचंड गाजली होती.

या 20 सेकंदाच्या 'मोठ्या गैरसोयीमुळे' मागितलेली 'मन:पूर्वक माफी' हा सगळ्या प्रवाशांना एक मोठा धक्का होता. कारण इतर देशांत 20 सेकंद लवकर नव्हे, तर यापेक्षा कितीतरी उशीर झाल्यामुळे प्रवाशांची गैरसोय झालेली आपण पाहतो.

जपानमध्ये हाय स्पीड बुलेट ट्रेन शेवटच्या थांब्यावर निर्धारित वेळेपेक्षा सर्वसाधारणपणे 54 सेकंद उशीरा येऊ शकते. त्यात कोणाचंही नियंत्रण नसलेल्या नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या विलंबाचाही समावेश आहे.

X पोस्टवरून पुढे जा, 1
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

X पोस्ट समाप्त, 1

X पोस्टवरून पुढे जा, 2
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

X पोस्ट समाप्त, 2

X पोस्टवरून पुढे जा, 3
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

X पोस्ट समाप्त, 3

जर जपानमध्ये ट्रेनला पाच मिनिटं किंवा त्यापेक्षा जास्त उशीर झाला तर प्रवाशांना एक प्रमाणपत्र देण्यात येतं. हे प्रमाणपत्र ते आपल्या बॉसला किंवा शिक्षकांना उशीरा येण्याचं कारण म्हणून सादर करू शकतात.

पण जर इतर देशांना जपानच्या रेल्वे नेटवर्कचं अनुकरण करायचं असेल तर? तुम्ही कल्पना करत आहात त्यापेक्षा हे कठीण आहे.

ट्रेन वेळेवर कधी असते?

जगातील बहुसंख्य देश त्यांच्या देशातल्या ट्रेन किती वेळेवर असतात याची आकडेवारी जाहीर करतात.

तुम्ही विचार करत असाल की, ट्रेन 'वेळेवर' आली म्हणजे तिला उशीर झाला नाही. पण हे गणित एवढं साधं नाही.

विश्वास ठेवा अगर ठेवू नका पण वेळेवर म्हणजे काय यावर कोणाचंच एकमत नाही आणि हीच खरी अडचण आहे.

आता हे उदाहरण बघा.

स्वीस रेल्वे सर्वांत जास्त वक्तशीर असल्याचा दावा करते.

ते सांगतात की, जानेवारी ते ऑक्टोबर या काळात त्यांच्या 89.7% ट्रेन वेळेवर होत्या.

पण ग्रेट ब्रिटनचा असा नावलौकिक नाही. गेल्या 12 महिन्यात त्यांच्या देशात 88.3% ट्रेन्स वेळेवर होत्या.

याचा अर्थ ब्रिटीश हे स्वीस लोकांसारखे वक्तशीर आहेत असा होतो का? असंच काही नाही. एवढ्या लगेच निष्कर्षावर येऊ नका.

ट्रेन

फोटो स्रोत, AFP

फोटो कॅप्शन, स्वित्झर्लंडमध्ये वक्तशीरपणाचे वेगळे नियम आहेत.

सर्वप्रथम, वेळेवर म्हणजे नक्की काय याबाबत दोन्ही देशांच्या वेगवेगळ्या कल्पना आहेत.

स्वित्झर्लंडमध्ये जर निर्धारित वेळेपेक्षा ट्रेन तीन मिनिटापेक्षा जास्त उशीरा आली तर ते ट्रेन लेट झाली, असं समजलं जातं. ग्रेट ब्रिटनमध्ये हेच प्रमाण पाच मिनिटं आहे. म्हणजे ट्रेन पाच मिनिटं उशीरा आली तरी ती वेळेवर आली असं समजतात. (मोठ्या प्रवासासाठी हे प्रमाण 10 मिनिटं इतकं असतं.)

ग्रेट ब्रिटनमध्ये जास्तीत जास्त तीन मिनिटं उशीर झालेल्या ट्रेनचं प्रमाण 83.7% असतं.

दुसरी गोष्ट म्हणजे दोन्ही देश वक्तशीरपणाचं एकच परिमाण वापरत नाहीत.

ग्रेट ब्रिटनमध्ये शेवटच्या थांब्यावर ट्रेन कधी पोहोचली यावरून वक्तशीरपणा ठरवला जातो.

स्वित्झर्लंडमध्ये ते ट्रेनचा वक्तशीरपणा पाहात नाहीत तर प्रत्येक प्रवाशाचा वक्तशीरपणा पाहतात. ज्या स्टेशनवर त्यांना उतरायचं होतं त्या स्टेशनवर पोचायला त्यांना नेमका किती उशीर झाला, यावरून या सेवेचा वक्तशीरपणा ठरतो.

ब्रिटीश रेल्वे ट्रॅक आणि इतर पायाभूत सुविधांची जबाबदारी घेणाऱ्या नेटवर्क रेलने सांगितलं की, ते फक्त टर्मिनस नाही तर प्रत्येक स्टेशनवर वक्तशीरपणा तपासण्याच्या मागे आहेत.

कोणाची वेळ महत्त्वाची ?

कोणत्याही दोन देशांचं वक्तशीरपणा तपासायचं परिमाण सारखं नाही.

अमेरिकेत 250 माईल्स (402 किमी) साठी 10 मिनिटांचा उशीर चालतो. त्यानं वक्तशीरपणा मोडला असं मानलं जात नाही. 550 माईल्ससाठी (886 किमी) हे प्रमाण 30 मिनिटं म्हणजे अर्धा तास इतकं असतं.

आयर्लंड आणि नॉर्दर्न आर्यर्लंडमध्ये एखादी ट्रेन दहा मिनिटं उशीरा आली तर ती वेळेवर आली असे मानतात. (डब्लिनच्या डार्ट नेटवर्कसाठी हे प्रमाण पाच मिनिटं आहे.)

ऑस्ट्रेलियाच्या रेल्वे कंपन्यांचे वक्तशीरपणाचे वेगवेगळे परिमाण आहेत. व्हिक्टोरिया ट्रेनमध्ये पाच ते अकरा मिनिटांचं स्वातंत्र्य असतं. क्वीन्सलँडला चार ते सहा मिनिटं स्वातंत्र्य मिळतं.

अर्थात हे त्या मार्गावर अवलंबून असतं. सिडने ट्रेन मात्र फक्त गर्दीच्या वेळेचा वक्तशीरपणा मोजतात.

जर्मनीत वेळेवर या शब्दाचे दोन अर्थ होतात. आतापर्यंत 94.2 टक्के ट्रेन त्यांच्या निर्धारित वेळेपेक्षा जास्तीत जास्त सहा मिनिटांत पोहोचल्या आहेत तर 98.9 टक्के वेळा निर्धारित वेळेपेक्षा 16 मिनिटं उशीरा पोहोचल्या आहेत.

आकडेवारीची तुलना करणं म्हणजे एक अशक्य गोष्ट आहे, असं सेंट्रल एम्पिरियल कॉलेज लंडनमधील रेल्वे आणि ट्रान्सपोर्ट स्ट्रॅटेजी विभागाचे सहयोगी संचालक बेन कॉड्री म्हणतात.

जर तुम्ही वेळेवर चालणाऱ्या ट्रेनची टक्केवारी लक्षात घेतली, तर त्यांच्या मोजमापात आणि व्याख्येत खूप फरक आहे.

अनियंत्रित गोष्टी

या माहितीत रद्द झालेल्या ट्रेनसुद्धा लक्षात घेतल्या जातात का? जी ट्रेन मधूनच रद्द होते त्याचं काय? त्या बदल्यात एखादी बस दिली असेल तर?

संप, प्रवासी, हवामान, नैसर्गिक आपत्ती, देखभाल अशी काही कारणं लक्षात घेतली जातात का?

ट्रेन

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, ट्रेन उशीरा येण्याची अनेक कारणं असतात.

उदाहरणार्थ तैवानच्या स्पीड रेल कंपनीचं म्हणणं आहे की, त्यांच्या 99.66% ट्रेन 2015 साली वेळेवर होत्या. पण कंपनीच्या नियंत्रणाबाहेरच्या सर्व गोष्टी यातून वगळल्या आहेत.

आणि कॉड्री जसं म्हणतात, "यातल्या काही गोष्टींचा प्रभाव वक्तशीरपणाच्या इतर परिमाणांपेक्षा जास्त आहे."

अजून काय मोजावं?

आपण वेळेवर आलेल्या ट्रेनची संख्या मोजणं सोडायला नको.

हेरिऑट-वॅट विद्यापीठातील प्राध्यापक उमित बितीसी विचारतात, 'तुम्ही उशीर करता म्हणजे नेमका किती उशीर करता?' हा विचार त्यांच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे.

95% वेळा वक्तशीर असणाऱ्या दोन रेल्वे कंपन्यांचा विचार करा. उरलेल्या पाच टक्क्याचं काय?

"एका कंपनीची ट्रेन काही सेकंदाचा उशीर झाला आणि दुसऱ्या कंपनीला काही तासांनी उशीर झाला. आता या दोन रेल्वे कंपन्यांचं वक्तशीरपणाची कशी तुलना करणार?" ते विचारतात.

म्हणजे गाडी सुटण्याची वेळ आणि प्रवास संपण्याची वेळ यामध्येसुद्धा तुलना झाली पाहिजे.

"गाडी वेळेअगोदर सुटणं जरा अडचणीचं आहे. त्यामुळे लोकांची अडचण होऊ शकते. पण लवकर वेळेअगोदर पोचल्याने काहीच अडचण होणार नाही, हो ना?" उमित बितीसी सांगतात.

हेही वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)