#WindowSeatProject: इन्स्टाग्रामवर भारतीय रेल्वेची फोटो-कथा

ट्रेनचा प्रवास आवडणाऱ्या शानू बाबरनं प्रवासाचे फोटो इन्स्टाग्रामवर शेअर करण्यास सुरुवात केली. त्याला तिथं त्यांच्यासारखेच ट्रेनचे फॅन भेटले आणि सुरू झालं #WindowSeatProject

रेल्वेचे रंगीबेरंगी डबे

फोटो स्रोत, SHANU BABAR

फोटो कॅप्शन, 21 जुलै 2015 ला शानू्नं 'विंडो सीट प्रोजेक्ट' वर फोटो टाकायला सुरुवात केली. खिडकीतील जागा ही आपल्यासारखीच त्याचीही आवडती जागा. दक्षिण भारतातील एरनाड एक्सप्रेसच्या या फोटोचं वर्णन करताना त्यानं प्रत्येक डब्याचा वेगळा रंग आणि त्यावरील जाहिरातींचा उल्लेख केला.
railway, travel, instagram

फोटो स्रोत, MaNPREET SINGH

फोटो कॅप्शन, एकानं हा फोटो @windowseatproject वर टाकला. रेल्वेच्या डब्यात दूधाचे कॅन ठेवायला जागा नसते, त्यावर ही शक्कल लढवली आहे. भारतातील डेअरी उद्योगाची स्थिती त्यातून दिसते.
रेल्वे प्रवाशी

फोटो स्रोत, SOVIK KOLE

फोटो कॅप्शन, ऑगस्ट 2015 मध्ये इन्स्टाग्राम यूजर्सनी @windowseatproject ला टॅग करून रेल्वे प्रवासातील फोटो शेअर केले. शानूनं ते फोटो पुन्हा शेअर केले. त्यातील या फोटोत थकल्या भागल्या मजूरांची स्थिती नेमकी टिपली आहे.
भारतीय रेल्वे

फोटो स्रोत, SHANU BABAR

फोटो कॅप्शन, वयाच्या पाचव्या वर्षापासून शानू बाबरनं रेल्वतून प्रवास सुरू केला. तेव्हापासूनच रेल्वे हा त्याच्या आवडीचा विषय झाला. कॉलेजच्या काळात एका प्रकल्पासाठी त्यानं देशभर प्रवासही केला. हा सेल्फी 2015मध्ये केरळची राजधानी थिरूवअनंतपूरममध्ये त्यानं घेतला आहे.
रेल्वे प्रवाशी

फोटो स्रोत, HARSHITA MAHAJAN

फोटो कॅप्शन, फोटोग्राफर हर्षिता महाजन यांनी दोन वर्षांपूर्वी काढलेला हा निजामुद्दीन रेल्वे स्टेशनवरील फोटो. गाडीची वाट बघत असताना दुसरी एक गाडी आली. त्यांच्या हातात कॅमेरा होता. त्या सगळ्यांची नजर लक्ष वेधणारी आहे. हा फोटो त्यांनी दोन वर्षांनी @windowseatproject वर शेअर केला.
रेल्वे प्रवाशी

फोटो स्रोत, WAJAHAT MIRZA

फोटो कॅप्शन, या फोटोविषयी शानूनं लिहिलं...हे रेल्वेतील हमखास दिसणारं चित्र आहे. कधी कधी अनोळखी सहप्रवाशांसोबत बर्थ असा वाटून घ्यावा लागतो.
एकत्र जेवताना रेल्वे प्रवाशी

फोटो स्रोत, SHARADDHA GOSAVI

फोटो कॅप्शन, शानू म्हणतो, चालत्या गाडीत घरातून आणलेल्या जेवणाचा आस्वाद घेणं ही एक परंपराच आहे. त्यांच्या कुटुंबाच्या वार्षिक सहलीत आमटी, भात, ब्रेड, मसाला पुरी असे पदार्थ असायचे.
पत्त्याचा डाव रंगलाय रेल्वेत

फोटो स्रोत, SHANU BABAR

फोटो कॅप्शन, रेल्वेमध्ये पत्ते खेळणं ही एक गंमत आहे. एकमेकांना न ओळखणारे प्रवासी पत्ते खेळताना दोस्त होतात, असं निरिक्षण शानू बाबर नोंदवतो.
रेल्वेत कुत्राही प्रवाशी

फोटो स्रोत, DIVYA DUGGAR

फोटो कॅप्शन, दिव्या दुग्गर यांनी फोटो शेअर केला. पाळीव प्राणीसोबत घेऊन प्रवास करायचा असेल तर फर्स्ट क्लासमध्ये दोन्ही बर्थ घ्यावे लागतात किंवा कूपेचं आरक्षण करावं लागत.
रेल्वेच्या छतावर प्रवाशी

फोटो स्रोत, SHANU BABAR

फोटो कॅप्शन, शानू मार्च 2017 मध्ये मध्य भारतातून प्रवास करत होता. गाडीत बिलकूल जागा नव्हती, त्यामुळे लोक टपावर बसले होते. कोणी पेपर वाचत होते, कोणी झोपत होते. गाडी जेव्हा बोगद्यातून जायची तेव्हा सगळे सवयीप्रमाणे खाली वाकत होते.