'सेल्फी' नाकारल्याने क्रिकेटपटू पृथ्वीच्या गाडीवर हल्ला; महिलेसह 8 जणांवर गुन्हा दाखल, #5मोठ्याबातम्या

भारताचा क्रिकेटपटू पृथ्वी शॉ

फोटो स्रोत, viral video

फोटो कॅप्शन, भारताचा क्रिकेटपटू पृथ्वी शॉ

आज सकाळी वृत्तपत्रं आणि वेबसाइट्सवर प्रसिद्ध झालेल्या बातम्यांपैकी 5 मोठ्या बातम्या थोडक्यात पाहूया.

1. 'सेल्फी' नाकारल्याने क्रिकेटपटू पृथ्वीच्या गाडीवर हल्ला; गुन्हा दाखल

भारताचा क्रिकेटपटू पृथ्वी शॉने 'सेल्फी' काढण्यास नकार दिल्याने एका चाहत्याने 'बेसबॉल बॅट' घेऊन त्याच्या गाडीवर हल्ला केला. ही घटना बुधवारी (15 फेब्रुवारी) पहाटे सांताक्रूझ येथील एका हॉटेलबाहेर घडल्याची माहिती पोलिसांनी दिली.

या घटनेत एका महिलेसह आठ जणांवर दंगल आणि खंडणीचा गुन्हा दाखल करण्याचे आल्याचेही पोलिसांकडून सांगण्यात आले. लोकसत्तानं ही बातमी दिलीय.

पृथ्वी मित्रांसह सांताक्रूझ येथील विमानतळाच्या जवळच असलेल्या एका हॉटेलमध्ये गेला होता. तेथून बाहेर पडल्यानंतर ही घटना घडल्याचे पोलिसांनी सांगितले. पृथ्वी आणि त्याच्याच घरात राहणाऱ्या आशिष यादवने पोलिसांत तक्रार दाखल केली.

या दोघांनी केलेल्या तक्रारीनुसार, एका अज्ञात व्यक्तीने पृथ्वीसोबत 'सेल्फी' काढण्याची मागणी केली. पृथ्वीने त्यासाठीही परवानगीही दिली. मात्र, त्या व्यक्तीने आणखी काही 'सेल्फी' काढण्याची मागणी केल्यानंतर पृथ्वी त्यास नकार दिला. त्यानंतर त्या व्यक्तीने पृथ्वीसोबत हुज्जत घालण्यास सुरुवात केली.

X पोस्टवरून पुढे जा, 1
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

X पोस्ट समाप्त, 1

हे सर्व पाहिल्यावर, हॉटेलच्या व्यवस्थापकाने त्या व्यक्तीस तेथून बाहेर पडण्यास सांगितले. मग पृथ्वी आणि यादव यांनी अन्य काही मित्रांसह हॉटेलमध्ये जाऊन भोजन केले. मात्र, हॉटेलमधून बाहेर पडत असताना पृथ्वीने 'सेल्फी'ची मागणी करणाऱ्या त्या व्यक्तीला पुन्हा तेथे पाहिले आणि त्या व्यक्तीच्या हातात 'बेसबॉल बॅट' होती.

पृथ्वी आणि त्याचे मित्र गाडीमध्ये बसताच त्या व्यक्तीने गाडीच्या पुढील काचेवर हल्ला केला. धोका लक्षात आल्यावर पृथ्वीने दुसऱ्या गाडीत बसण्याचा निर्णय घेतला, तर यादव आणि अन्य मित्र त्याची घाडी घेऊन ओशिवारासाठी रवाना झाले.

त्याच वेळी तीन दुचाकी आणि पांढऱ्या रंगाची गाडी आपला पाठलाग करत असल्याचे यादवने पाहिले. साधारण पहाटे 4 वाजताच्या सुमारास, या पाठलाग करणाऱ्या व्यक्तींनी लिंक रोड येथे त्याच्या गाडीवर हल्ला केला. यापैकी एकाने 'बेसबॉल बॅट'च्या साहाय्याने गाडीची मागील काच फोडली. मोटारबाईकवर बसलेले सहा जण आणि गाडीत असलेले दोघे (यापैकी एक महिला) यांनी यादव व त्याच्यासोबत असणाऱ्या अन्य मित्रांना शिवीगाळ केली. त्यानंतर यादव ओशिवारा पोलीस स्थानकात दाखल झाला.

त्याच्यावर हल्ला करणारे आठ जणही त्याच्या पाठोपाठ पोलीस स्थानकात आले. या आठ जणांपैकी महिलेने यादवशी हुज्जत घातली आणि हे प्रकरण मिटवण्यासाठी 50 हजार रुपयांची मागणी केली. तसे न केल्यास पोलिसांत खोटी तक्रार दाखल करण्याची धमकीही तिने दिल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. मग यादवने पोलिसांत तक्रार दाखल केली.

2. कट प्रॅक्टिसविरोधात राज्य सरकार आणणार कायदा

आपल्याकडे येणाऱ्या रुग्णाला अन्य डॉक्टरकडे पाठविल्यास संबंधित डॉक्टरला ठरावीक रक्कम मिळते. वैद्यकीय विश्वात याला 'कट प्रॅक्टिस' असे संबोधले जाते.

सर्रास चालणाऱ्या या कट प्रॅक्टिसवरच काट मारण्याचा निर्धार सरकारने केला असून, या प्रकारांना आळा घालण्यासाठी कट प्रॅक्टिसविरोधी कायदा आणण्याचे ठरवले आहे. त्यामुळे डॉक्टरांचे कमिशन बंद होणार असल्याचे बोलले जात आहे.

लोकमतनं ही बातमी दिली आहे.

प्रातिनिधिक छायाचित्र

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, प्रातिनिधिक छायाचित्र

रुग्णाची शिफारस करण्याच्या प्रकारात पैशांची देवाणघेवाण होते. या प्रकाराला आळा घालण्यासाठी आवश्यक असलेला कट प्रॅक्टिसविरोधी कायदा देशात अस्तित्वात नाही.

सगळेच डॉक्टर या प्रकारांत सहभागी असतात असे नाही. पण, जे डॉक्टर ही प्रॅक्टिस करतात, त्यांच्यामुळे वैद्यकीय विश्वाची प्रतिमा मलिन होते. या पार्श्वभूमीवर कट प्रॅक्टिसविरोधी कायदा आणला जाणार आहे.

3. महाराष्ट्रात 30 हजार शिक्षकांची भरती करणार, एकनाथ शिंदेंची घोषणा

राज्यात लवकरच 30 हजार शिक्षकांची भरती केली जाणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज केली आहे. त्याशिवाय जुन्या पेन्शन योजनेचा प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न सुरु असल्याचं त्यांनी सांगितलं. ते शिक्षक समितीच्या त्रैवार्षिक अधिवेशनात बोलत होते.

एबीपी माझानं ही बातमी दिलीय.

X पोस्टवरून पुढे जा, 2
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

X पोस्ट समाप्त, 2

"राज्यात शिक्षकांची 30 हजार पदे शासन भरत असून लवकरच पदभरती केली जाईल. शिक्षकांच्या समस्या सोडवण्यासाठी शासन सकारात्मक असून जुन्या पेन्शन योजनेचा प्रश्न सोडवण्यासाठी देखील शिक्षण विभाग काम करत आहे.

हा प्रश्न टप्पाटप्प्याने सोडवता येईल का याचा देखील विचार सुरू असून त्यासाठी लागणारा वेळ शिक्षकांनी शासनाला द्यावा," असं एकनाथ शिंदे यावेळी म्हणाले.

4. त्रिपुरामध्ये 81 % मतदान

त्रिपुरा विधानसभा निवडणूक 2023 साठी गुरुवारी (16 फेब्रुवारी) मतदान झाले. निवडणूक आयोगानं दिलेल्या माहितीनुसार, ही निवडणूक हिंसामुक्त झाली आणि स्थलांतरित मतदार अनेक वर्षांत प्रथमच मतदान करू शकले.

राज्यात सुमारे 81 % मतदान झाल्याचा अंदाज आहे.

त्रिपुरा मतदान

फोटो स्रोत, Ani

फोटो कॅप्शन, त्रिपुरा मतदान

मतदानाची नेमकी आकडेवारी शुक्रवारपर्यंत (17 फेब्रुवारी) कळेल असंही सांगण्यात आलं. फेरमतदानाच्या मागणीबाबत अद्याप कोणतीही तक्रार आलेली नाही, असंही निवडणूक अधिकाऱ्यांनी सांगितलं. एबीपी न्यूजनं ही बातमी दिलीय.

5. भारतीय वंशाचे नील मोहन यूट्यूबचे नवीन सीईओ

व्हीडिओ स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्म यूट्यूबच्या नेतृत्वात मोठा बदल झाला आहे. यूट्यूबच्या सीईओ सुसान वोजिकी यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. भारतीय वंशाचे नील मोहन सुसान वोजिकीची जागा घेतील.

नील मोहन सध्या यूट्यूबचे मुख्य उत्पादन अधिकारी आहेत. सुसान वोजिकीने पत्र लिहून राजीनामा जाहीर केला आहे.

नील मोहन

फोटो स्रोत, @nealmohan

फोटो कॅप्शन, नील मोहन

त्या म्हणाल्या की, मी माझ्या आयुष्याचा एक नवीन अध्याय सुरू करणार आहे. मी माझं कुटुंब, आरोग्य आणि वैयक्तिक प्रकल्पांबाबत नवीन काम सुरू करणार आहे.

आज तकनं ही बातमी दिली आहे.

बीबीसी इंडियन स्पोर्ट्सवुमन ऑफ द इयर
फोटो कॅप्शन, बीबीसी इंडियन स्पोर्ट्सवुमन ऑफ द इयर

हेही वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)