You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
स्कॉच व्हिस्की रिचवण्यात भारताचा जगात पहिला नंबर
भारतात मद्यावर बरीच बंधनं असूनही जगात सर्वाधिक मद्यविक्री होणाऱ्या देशांमध्ये भारताचा दुसरा क्रमांक लागतो. आता तर ताज्या आकडेवारीनुसार भारताने स्कॉच व्हिस्कीच्या खरेदीतही पहिला क्रमांक पटकावलाय.
भारत फ्रान्सची जागा घेत स्कॉच व्हिस्कीचा जगातील सर्वांत मोठा खरेदीदार देश म्हणून पुढं आलाय. जर व्हॉल्युमचा विचार करता भारत सर्वाधिक स्कॉच घेणारा देश आहे तर स्कॉचच्या किमतीच्या संदर्भात भारत हा पाचव्या क्रमांकाचा स्कॉच खरेदी करणारा देश आहे.
2021 मध्ये व्हिस्की निर्मात्यांनी भारताला 21.9 कोटी बाटल्यांची निर्यात केली होती, त्यात आता 60% वाढ झाल्याची माहिती स्कॉच व्हिस्की असोसिएशन (SWA) ने दिली आहे.
या स्कॉच व्हिस्कीच्या खरेदीत किमतीच्या बाबतीत अमेरिका पहिल्या क्रमांकावर आहे. अमेरिकेने 2022 मध्ये 1.27 अब्ज डॉलर्स स्कॉच व्हिस्की आयात केली होती. भारत या यादीत पाचव्या स्थानावर होता.
भारताच्या बाबतीत बोलायचं झाल्यास स्कॉचकडे नेहमीच स्टेटस सिम्बॉल म्हणून पाहिलं जातं. पण तरीही जगातील सर्वांत मोठ्या व्हिस्की मार्केटमध्ये त्याचा वाटा फक्त 2% इतकाच आहे.
भारतात मोठ्या प्रमाणावर ब्लेंडेड व्हिस्कीला पसंती दिली जाते कारण ती स्वस्त आहे. पण भारतीयांच्या क्रयशक्तीत झालेली वाढ आणि सांस्कृतिक बदल अशा गोष्टींमुळे महागड्या सिंगल माल्टची मागणीही देखील वाढली आहे.
शिवाय जागतिक स्कॉच विक्रीत भारताचा वाटा देखील वाढलाय. भारताने मागच्या एका दशकात जवळपास 200 टक्क्यांची निर्यात केली आहे. त्यामुळे स्कॉच निर्यातदारांना वाढीसाठी भरपूर वाव आहे.
आयात शुल्क कमी झाल्यास आणखी आयात होऊ शकते
देशांतर्गत डिस्टिलर्सच्या लॉबिंगमुळे भारतात आयात होणाऱ्या स्कॉच व्हिस्कीच्या प्रत्येक बॉटलवर 150% आयात शुल्क आकारला जातो.
मात्र स्कॉच व्हिस्की असोसिएशन (SWA) ला आशा आहे की, भारत आणि ब्रिटनमधील व्यापार करारामुळे या गोष्टी मार्गी लागण्यास मदत होईल. मागच्या ऑक्टोबर महिन्यापासून करार मार्गी लावण्यासाठी दोन्ही देशांमध्ये चर्चेच्या अनेक फेऱ्या झडल्या आहेत.
स्कॉच व्हिस्की असोसिएशनने आपल्या एका निवेदनात म्हटलंय की, जर हा करार मार्गी लागला आणि आयात शुल्क कमी केल्यास स्कॉच व्हिस्कीच्या विक्रीत वाढ होऊ शकते. पुढील पाच वर्षांत यात 1.20 अब्ज डॉलर्सची वाढ होऊ शकते.
स्कॉच व्हिस्की असोसिएशनच्या यादीत किंमत आणि आयातीच्या बाबतीत फ्रान्स दुसऱ्या क्रमांकावर होता.
कोव्हिडनंतर भारताव्यतिरिक्त तैवान, सिंगापूर आणि चीनमध्ये ही स्कॉच व्हिस्कीची मागणी वाढल्याची माहिती असोसिएशनने दिली आहे.
त्यामुळे 2022 मध्ये आशिया-पॅसिफिकने बाजारपेठेच्या बाबतीत युरोपियन युनियनला मागे टाकलंय. आशिया-पॅसिफिक मध्ये एकूण
108 कोटींची स्कॉटिश व्हिस्की आयात करण्यात आली.
स्कॉच व्हिस्की असोसिएशनचे सीइओ मार्क केंट सांगतात की, "2022 मध्ये जागतिक बाजारपेठांमधील हॉस्पिटॅलिटी सेवा पुन्हा सुरू झाल्या. त्यामुळे स्कॉच व्हिस्कीच्या व्यवसायाला फायदा झाला."
हे वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहि61890597ले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)