गुजरात विधानसभा निवडणूक 2022 च्या तारखा आणि 5 प्रश्नांची उत्तरं

गुजरात विधानसभा २०२२

गुजरातमध्ये यंदा 2 टप्प्यांमध्ये विधानसभा निवडणूक होणार आहे. 1 आणि 5 डिसेंबर 2022 या दोन दिवशी मतदान होणार आहे. तर 8 डिसेंबरला मतमोजणी होईल. याच दिवशी हिमाचल प्रदेशच्या निवडणुकांचीही मतमोजणी होईल. निवडणुकीसाठी एकूण 51000 मतदान केंद्रं यासाठी उभारण्यात आली आहेत. त्यातील 34000 केंद्रं ग्रामीण भागात आहेत.

यंदा गुजरातमध्ये तिरंगी लढत होणार आहे. भाजप आणि काँग्रेसबरोबरच यंदा आपसुद्धा गुजरातमध्ये जोरदार प्रयत्न करत आहे. 1995 पासून गुजरातमध्ये भाजपचीच सत्ता आहे.

1. गुजरातमध्ये मतदान कधी होणार?

गुजरात विधासभा निवडणुकांसाठी 5 आणि 10 नोव्हेंबरला नोटिफिकेशन जाहीर होईल. 1 आणि 5 डिसेंबर 2022 ला दोन टप्प्यांमध्ये मतदान होईल.

2. गुजरात विधानसभा निवडणुकांचे निकाल कधी जाहीर होणार?

8 डिसेंबर 2022ला मतमोजणी होईल. याच दिवशी हिमाचल प्रदेशच्या निवडणुकांचीही मतमोजणी होईल.

3. गुजरातमध्ये विधानसभेच्या किती जागा आहेत?

गुजरातमध्ये 182 जागा आहेत.

4. गुजरातमध्ये एकूण किती मतदार आहेत?

गुजरातेत 4 कोटी 90 लाथ 89 हजार 765 मतदार आहेत. त्यात 2 कोटी 53 लाख 36 हजार 610 पुरुष आहेत तर महिलांची संख्या 2 कोटी 37 लाख 51 हजार 738 आहे.

नवीन मतदारांची संख्या 11 लाख 62 हजार आहे. अहमदाबादमध्ये सगळ्यात जास्त मतदार आहेत कर डांग भागात सर्वात कमी मतदार आहेत.

5. गुजरात विधानसभा 2017 मध्ये कुणाला किती जागा मिळाल्या होत्या?

भाजप - 99

काँग्रेस -77

अपक्ष - 3

भारतीय ट्रायबल पार्टी - 2

राष्ट्रवादी काँग्रेस - 1

गुजरात विधानसभा 2017 चे निकाल

गुजरात विधानसभा २०२२

गुजरात विधानसभा निवडणुकांचा इतिहास

गुजरात विधानसभा 2022 निवडणूक काँग्रेससाठी किती सोपी? 2017 सौराष्ट्रमध्ये काँग्रेसची कामगिरी कशी होती?

Please wait...

मोठ्या शहरांमध्ये भाजपची स्थिती अशी मजबूत होत गेली.

Please wait...

गुजरात विधानसभेत गेल्या 2 निवडणुकांमध्ये मतांच्या टक्केवारीत असा बदल झाला आहे.

Please wait...

गुजरात विधानसभा निवडणुकीत 1980 ते 2017 दरम्यान असे बदल झाले आहेत.

( इथं प्रत्येक मतदारसंघावर क्लिक करून तुम्ही त्याची माहिती वाचू शकता.)

Please wait...

गुजरातमध्ये किती मतदारसंघ आहेत? SC आणि ST साठी राखीव मतदारसंघ कोणते?

Please wait..

गुजरातमध्ये गेल्या 3 निवडणुकांमध्ये मागासवर्गिय मतदारांनी भाजपला किती साथ दिली आहे?

Please wait...

यंदा गुजरातमध्ये नवीन मतदारांची संख्या 11 लाख 62 हजार आहे. अहमदाबादमध्ये सगळ्यांत जास्त नवे मतदार आहेत. तर डांग भागात सर्वांत कमी नवे मतदार आहेत.

हेही वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)