राहुल गांधींसोबत हातात हात घालून चालण्यावरून वाद, अभिनेत्री पूनम कौरने म्हटलं...

फोटो स्रोत, Twitter
सध्या काँग्रेस नेते राहुल गांधींची 'भारत जोडो यात्रा' सुरू आहे. या यात्रेचा मार्ग कन्याकुमारी ते काश्मीर असा आहे. या यात्रेचे अनेक फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले जात आहेत.
पण या यात्रेतला एक फोटो सोशल मीडियावर सध्या खूप मोठ्या प्रमाणावर व्हायरल होतोय.
हा फोटो शनिवारी (29 ऑक्टोबर) रोजी सोशल मीडियावर शेअर करण्यात आलाय. यात राहुल गांधींनी एका महिलेचा हात धरल्याचं दिसत आहे.
भाजप समर्थक आणि भाजपच्या कार्यकर्त्या प्रीती गांधी यांनी त्यांच्या ट्विटर अकाऊंटवरून हा फोटो शेअर केला असून त्यांनी केलेली ही पोस्ट सध्या वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे.
प्रीती गांधी यांनी हा फोटो शेअर करत राहुल गांधींवर टीका केली आहे.
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
X पोस्ट समाप्त, 1
त्या आपल्या पोस्टमध्ये लिहितात, आपल्या पणजोबांच्या पावलांवर पाऊल ठेवताना...
देशाचे पहिले पंतप्रधान आणि राहुल गांधी यांचे पणजोबा जवाहरलाल नेहरू यांच्याविरुद्ध सोशल मीडियावर कॅम्पेन चालवलेलं पाहायला मिळतं. यात नेहरूंचे महिलांसोबतचे फोटो शेअर केले जातात. याच गोष्टींना राहुल गांधींशी जोडण्याचा प्रयत्न प्रीती गांधीनी केल्याचं दिसतंय.
पण राहुल गांधींसोबत दिसणारी ती महिला कोण आहे? प्रीती गांधींनी ट्विट केलेल्या त्या फोटोवर इतरांनी काय प्रतिक्रिया दिल्यात? या यात्रेदरम्यान राहुल गांधी कितीवेळा चर्चेत आलेत? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला इथं मिळतील.
राहुल गांधींच्या त्या फोटोवर कोणी कोणी प्रतिक्रिया दिली?
प्रीती गांधीने केलेलं ट्वीट हजारो वेळा रिट्वीट आणि शेअर करण्यात आलंय. या ट्विटवर हजारो प्रतिक्रियाही आल्यात. बऱ्याच जणांनी त्यांच्या या ट्वीटवर आक्षेप घेतलाय, तर काही लोकांनी या ट्वीटला पंतप्रधान मोदींचे महिलांसोबतचे फोटो शेअर करून रिप्लाय दिला आहे.
काँग्रेसशी संबंधित असलेल्या रियाने ट्वीट करत म्हटलंय की, "हा हल्ला राहुल गांधींवर नाही, तर महिलांच्या अस्मितेवर करण्यात आलाय. भाजपने असा हल्ला केलाय याचं दुःख वाटतंय. लाज वाटू द्या प्रीती गांधी."
शिवसेना खासदार प्रियंका चतुर्वेदी ट्वीट करतात की, "पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून, हातात हात घालून देश जर पुढं जाणार असेल तर फक्त पंडित नेहरूंचं नाही तर बाबासाहेब आंबेडकर आणि इतर सर्व स्वातंत्र्यसैनिकांचीही तशीच विचारसरणी होती. जेणेकरून भारतात समानतेचं स्वप्न साकार होऊ शकेल."
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
X पोस्ट समाप्त, 2
काँग्रेस नेते आकाश शर्मा ट्वीट करतात की, "मला समजत नाहीये, की महिलांबाबत भाजप नेतृत्वाच्या विचारसरणीत बदल का होत नाहीये?"
आशु ट्वीट करतात की, "हे किती मूर्ख पद्धतीचं ट्वीट आहे. बऱ्याच पिढ्या गेल्या पण माझ्या कुटुंबातील कोणीही कधीही काँग्रेसला पाठिंबा दिला नाही, ना मतदान केलं. पुढेही करू असं वाटत नाही. अशा मूर्ख आशयाचे ट्वीट काँग्रेसनेही मोदींवर केलेत. सामान्य लोकांनी त्यावरही नापसंती व्यक्त केली होती. जबाबदार पदांवर बसलेले लोक अशा गोष्टी का करतात?"
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
X पोस्ट समाप्त, 3
पत्रकार रोहिणी सिंह ट्वीट करतात की, "राजकीय विरोधकांवर हल्ला करणं ही एक गोष्ट झाली. पण तुमच्या राजकीय विचारसरणीमुळे एखाद्या महिलेवर असभ्य भाषेत टिप्पणी केली गेली तर महिला सार्वजनिक जीवनात येण्यापासून रोखल्या जातील. हा हल्ला जेवढा राहुल गांधींवर करण्यात आलाय, तेवढाच त्या फोटोतल्या महिलेवर झालाय."
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
X पोस्ट समाप्त, 4
काँग्रेसच्या सुप्रिया श्रीनेत ट्वीट करतात की, "होय, राहुल गांधी त्यांच्या पणजोबांच्या पावलावर पाऊल ठेऊन भारत जोडण्याचं काम करतायत. यामुळे तुमचा ट्रॉमा आणि तुमची वाईट विचारसरणी दिसून येते. तुला उपचाराची गरज आहे प्रीती."
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
X पोस्ट समाप्त, 5
पत्रकार अजित अंजुम ट्वीट करतात की, "मोदी समर्थक असल्यामुळे तुम्ही राहुल गांधींना विरोध करत असाल. पण एक महिला असून एखाद्या महिलेसाठी असा विचार करता? राहुल गांधींसोबत चालणाऱ्या त्या महिलेच्या फोटोमध्ये तुम्हाला काय वाईट दिसलं? तुमचे भाऊबंद, नेहरूंचे त्यांच्या बहीण, भाचीचे सोबतचं फोटो अश्लील कमेंट टाकून शेअर करतायत."
फोटोत दिसणारी ती महिला कोण आहे?
राहुल गांधींची यात्रा सध्या तेलंगणातून जाते आहे. फोटोत दिसणारी ही महिला अभिनेत्री आणि सामाजिक कार्यकर्ती असून तिचं नाव पूनम कौर आहे.
प्रीती गांधींच्या ट्विटला उत्तर देत पूनम कौर यांनी पूर्ण घटनाक्रम सांगितलाय.
पूनम ट्वीट करते की, "हे खूप अपमानास्पद आहे. पंतप्रधान महिला शक्तीबद्दल बोलले होते त्याची तुम्हाला आठवण आहे का? मी घसरून पडणार होते, तितक्यात राहुल सरांनी माझा हात पकडला."
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
X पोस्ट समाप्त, 6
तेलंगणा काँग्रेसने हा फोटो ट्वीट करत म्हटलंय की, "कोणी पण येऊन या यात्रेत सहभागी होऊ शकतं. या यात्रेच्या माध्यमातून लोकांचे प्रश्न ऐकून घेणं, संवाद सुरू ठेवणं आणि मजबूत भारत बनवणं हा आमचा उद्देश आहे."
हे ट्वीट शेअर करताना पूनम कौर लिहितात, "राहुल गांधींची महिलांबद्दलची काळजी, आदर आणि दृष्टीकोन या गोष्टी माझ्या हृदयाला स्पर्शून गेल्यात. विणकरांचे प्रश्न ऐकल्याबद्दल धन्यवाद राहुल जी. विणकर लोकांच्या वतीने मी तुमचे आभार मानते."
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
X पोस्ट समाप्त, 7
पूनम कौर नेहमीच विणकरांचे प्रश्न, हस्तकलेसंबंधीच्या गोष्टी सोशल मीडियावर शेअर करत असतात.
पूनम हैदराबादची आहे. तिचा जन्म आणि प्राथमिक शिक्षण हैदराबादमध्येचं झालं.
पूनमने दिल्लीच्या नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ फॅशन टेक्नॉलॉजी (NIFT) मधून शिक्षण पूर्ण केलं. तिने बऱ्याच चित्रपटातही काम केलंय. ती 2006 पासून तमिळ, तेलगू चित्रपटसृष्टीत सक्रिय आहे.
'भारत जोडो' यात्रा आणि त्याच्या चर्चा
काँग्रेसची 'भारत जोडो' यात्रा 7 सप्टेंबर पासून कन्याकुमारीतून सुरू झालीय. ही यात्रा देशातील 12 राज्य आणि 2 केंद्रशासित प्रदेशांमधून पुढं जाणार आहे. हा एकूण प्रवास 3,570 किलोमीटर इतका असून पुढच्या 150 दिवसांत ही यात्रा जम्मू-काश्मीरमधील श्रीनगर इथं संपेल.
या पदयात्रेचं नेतृत्व काँग्रेस नेते राहुल गांधींकडे आहे. त्यांचे या यात्रेतले फोटो सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसतात. तसेच यातले काही फोटो चर्चेत आले होते.

फोटो स्रोत, @BHARATJODO
मागच्या काही दिवसात राहुल गांधींनी पावसात भाषण दिलं होतं. हा फोटोही व्हायरल झाला होता. सुरुवातीच्या काळात राहुल गांधींच्या टीशर्टच्या किंमतीवरून चर्चा रंगली होती. भाजपने या मुद्द्यावरून काँग्रेसला घेरण्याचा प्रयत्न केला होता.
तेच मागे काही दिवसांपूर्वी भाजपचे प्रवक्ते संबित पात्रा यांनीही एका फोटोवरून राहुल गांधींचा खरपूस समाचार घेतला होता. या फोटोत राहुल गांधी एका मुस्लिम मुलासोबत दिसले होते. पात्रांच्या एका ट्वीटनंतर काँग्रेसने राहुल गांधींचा सर्वधर्मीय मुलांसोबतचा फोटो शेअर केला होता.
काँग्रेस सोशल मीडियावर आप आणि भाजपच्या तुलनेत सक्रिय असल्याचं दिसत नाही. पण भारत जोडो यात्रेदरम्यान काँग्रेस चांगलीच अॅक्टिव्ह झाल्याचं दिसतंय.
हे वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)