मोरबी पूल दुर्घटनेत राजकोटच्या खासदाराच्या कुटुंबातील 11 जणांचा मृत्यू

फोटो स्रोत, Getty Images

- गुजरातच्या मोरबी शहरात माच्छू नदीवर बनलेला झुलता पूल कोसळला.
- या दुर्घटनेत आतापर्यंत 141लोकांचा मृत्यू झाला आहे.
- पूल व्यवस्थापन समितीविरोधात आयपीसी कलम 304, 308 आणि 114 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
- दुरुस्तीसाठी सहा महिने बंद असलेला हा पूल 28 ऑक्टोबरलाच पुन्हा खुला झाला होता.
- सणाच्या सुट्या आणि रविवार यांमुळे पुलावर प्रचंड गर्दी होती.
- एनडीआरएफ, एसडीआरएफच्या तुकड्या बचावकार्यात गुंतल्या आहेत.

गुजरातच्या मोरबी येथे झालेल्या दुर्घटनेत राजकोटचे खासदार मोहन कुंडारिया यांच्या 11 नातेवाईकांचा मृत्यू झाला आहे.
मोहन कुंडारिया यांनी बीबीसीशी बोलताना सांगितलं, "माझ्या मेव्हण्याच्या भावाच्या चार मुली, तीन जावई आणि पाच मुलं. 11 मृतदेह मिळाले आहेत. एक बाकी आहे."

या दुर्घटनेत आतापर्यंत 141 जणांचा मृत्यू झाला आहे. एनडीआरएफसह इतर बचावकार्य पथकांचे रेस्क्यू ऑपरेशन सुरू आहे.
या घटनेच्या चौकशीसाठी राज्य सरकारने उच्चस्तरीय समिती नेमली आहे.
पूल व्यवस्थापन समितीविरोधात आयपीसी कलम 304, 308 आणि 114 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गुजरातच्या गृहमंत्र्यांनी काय म्हटलं?
गुजरातचे गृहमंत्री हर्ष सांघवी यांनी म्हटलं, "या दुर्घटनेत आतापर्यंत 141 जणांचा मृत्यू झाला आहे. रविवारी (30 ऑक्टोबर) संध्याकाळी 6.30 वाजता ही दुर्घटना घडली. 6.45 पर्यंत बचावकार्याला सुरूवात झाली होती."
त्यांनी पुढे सांगितलं, "मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल तातडीने मोरबी येथे पोहचले आणि त्यांनी इतर व्यवस्था पाहिली. काही तासातच विविध दलाच्या 200 हून अधिक लोकांनी रात्रभर रेस्क्यू ऑपरेशन केले. मुख्यमंत्री कार्यालय आणि मुख्य सचिव कार्यालयाकडून रात्रभर रेस्क्यू ऑपरेशनवर नजर ठेवण्यात आली."
मोरबीच्या जिल्हाधिकाऱ्यांच्या मते आतापर्यंत 170 जणांना वाचवण्यात आलं आहे.

मोरबी येथील माचू नदीवरील शंभर वर्षे जुना पूल रविवारी (30 ऑक्टोबर) सायंकाळच्या सुमारास कोसळला. यावेळी पुलावर उपस्थित असलेले पर्यटक नदीत कोसळले. नदीत पडलेल्या लोकांना बाहेर काढण्यासाठी प्रशासनाकडून युद्ध पातळीवर बचावकार्य सुरू करण्यात आलं.

'वाचवा, वाचवा - चारही बाजूंनी आवाज येत होता'
ही दुर्घटना संध्याकाळी साधारण सहा वाजता घडली. बीबीसीचे सहयोगी पत्रकार राकेश अंबालिया साडे सहा वाजता घटनास्थळी पोहचले होते.
अंबालिया यांनी दिलेल्या माहितीनुसार, घटनेनंतर काही वेळातच अँब्युलन्स आणि प्रशासकीय अधिकारी घटनास्थळी पोहचले होते. मदत आणि बचावकार्य सुरू झालं. स्थानिक लोकही पाण्यात बुडणाऱ्या लोकांना वाचवण्याचा प्रयत्न करत होते.
अंबालिया सांगतात, "मी पोहचलो तेव्हा चारही बाजूंनी आवाज येत होते. खूप भयानक दृश्य होतं. काही लोक पुलाच्या रेलिंगवर लटकत होते, तर काही लोक पुलाचा बुडालेला भाग पकडून स्वत:ला वाचवण्याचा प्रयत्न करत होते. खूप लोक बुडत होते. 'वाचवा-वाचवा' असा आवाज देत होते."

फोटो स्रोत, ANI
ते पुढे सांगतात, "वाचलेल्या एका व्यक्तीने सांगितलं की, मी कसंतरी वाचलो, आणखी खूप लोक अडकले आहेत. त्यांना वाचवा."
शहरातल्या सर्व अँब्युलन्स घटनास्थळी रवाना झाल्या. जिथे पहावं तिथे गडबड आणि गोंधळ सुरू होता. जवळच्या शहरातूनही मदत बोलवली गेली.
मोरबी शहरातून जाणाऱ्या माचू नदीवरील हा पूल वर्षानुवर्षे बंद होता. दिवाळीनंतर गुजराती नववर्षाला हा पूल खुला करण्यात आला होता.
दिवाळीनंतरच्या सुट्ट्या आणि रविवार असल्याने आज या पुलावर प्रचंड गर्दी जमली होती.

सदर पूल हा मोरबीतील आकर्षणाचं केंद्र मानला जातो. मोरबी शहर प्रशासनाच्या वेबसाईटनुसार, हा झुलता पुल शंभर वर्षांपूर्वी बांधलेला अभियांत्रिकीचा उत्तम नमुना होता. पण काही कारणामुळे तो अनेक वर्षे बंद होता.
हा झुलता पूल 1.25 मीटर रुंद असून त्याची लांबी 233 मीटर इतकी आहे. मोरबी येथील दरबारगड पॅलेस आणि लखधीरजी अभियांत्रिकी महाविद्यालय या दोन ठिकाणांना जोडण्याचं काम पुलामार्फत केलं जातं.
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त, 1
नुकतेच मोरबीला एक वेगळी ओळख देण्यासाठी युरोपमध्ये उपलब्ध अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून हा स्विंगिंग पूल तयार करण्यात आला होता. पण काही दिवसांतच हा पूल कोसळल्याने खळबळ माजली आहे.
चौकशीसाठी पाच सदस्यीय समिती
मोरबी दुर्घटनेच्या चौकशीसाठी पाच सदस्यीय चौकशी स्थापन करण्यात आली आहे.
या समितीत महापालिका आयुक्त राजकुमार बेनिवाल, गांधीनगरचे क्वालिटी कंट्रोल विभागाचे मुख्य अभियंता के. एम. पटेल, अहमदाबादच्या एल. डी. इंजिनिअरिंग महाविद्यालयाचे स्ट्रक्चरल इंजिनिअरिंग विभागप्रमुख डॉ. गोपाल टंक, रस्ते आणि इमारती विभागाचे सचिव संदीप वासवा आणि सीआयडी महासंचालक सुभाष त्रिवेदी यांचा समावेश आहे.
केंद्र आणि राज्य सरकारकडून आर्थिक मदत जाहीर
केंद्र सरकारकडून मृतांच्या कुटुंबीयांना पंतप्रधान मदत निधीतून 2 लाख रुपये तर जखमींना 50 हजार रुपयांच्या मदतीची घोषणा करण्यात आली आहे.
तर राज्य सरकारनेही पीडितांना मदत जाहीर केली आहे. मुख्यमंत्री भुपेंद्र पटेल यांनी मोरबी दुर्घटनेत मृत्यूमुखी पडलेल्या लोकांच्या नातेवाईकांना 4 लाख रुपये तर जखमींना 50 हजार रुपयांची मदत घोषित केली आहे.
राष्ट्रपती, पंतप्रधान आणि मुख्यमंत्र्यांकडून दु:ख व्यक्त
या दुर्घटनेनंतर गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांनी ट्विटरवरून प्रतिक्रिया दिली.
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
X पोस्ट समाप्त, 1
भूपेंद्र पटेल म्हणाले, "मोरबीतील पूल दुर्घटनेमुळे मला अतीव दुःख झालं आहे. जिल्हा प्रशासनाकडून येथील बचावकार्य सुरू करण्यात आलं आहे. जखमींवर आवश्यक ते उपचार तत्काळ करण्यात यावेत, अशी सूचना प्रशासनाला करण्यात आली आहे. याबाबत जिल्हा प्रशासनाशी मी संपर्कात आहे."
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही पूल दुर्घटनेबाबत प्रतिक्रिया दिली.
ते म्हणाले, "मोरबी दुर्घटनेने मला प्रचंड दुःख झालं आहे. याबाबत मी गुजरातचे मुख्यमंत्री भुपेंद्र पटेल आणि इतर संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा केली. येथील बचाव आणि मदतकार्य वेगाने सुरू आहे. दुर्घटनाग्रस्तांना आवश्यक ती मदत तातडीने पोहोचवण्यात यावी."
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
X पोस्ट समाप्त, 2
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनीही ट्वीट करून दुर्घटनेबाबत दुःख व्यक्त केलं.
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
X पोस्ट समाप्त, 3
"मोरबीच्या दुर्घटनेने मी चिंताग्रस्त झाले आहे. माझ्या भावना आणि प्रार्थना दुर्घटनाग्रस्त लोकांसोबत आहेत. मदत आणि बचावकार्य यांच्यामुळे पीडितांना मदत मिळेल," असं मुर्मू यांनी म्हटलं.
हेही वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त, 2
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)