उपवास का करतात? सणासुदीला उपवास करताना कोणत्या बाबी लक्षात ठेवाव्यात?

    • Author, रोहन नामजोशी
    • Role, बीबीसी मराठी प्रतिनिधी

सध्या सणावाराचे दिवस आहेत. त्यामुळे अनेकदा उपास करण्याची वेळ येते. सणावारी घरी पाहुण्यांची गर्दी असते. त्यामुळे अनेकदा आरोग्याकडे दुर्लक्ष होतं आणि प्रकृतीच्या तक्रारी निर्माण होतात. त्यामुळे उपास करताना काही महत्त्वाच्या गोष्टी लक्षात घेणं अत्यंत गरजेचं आहे.

सणावारी उपास करण्याची मुख्य कारण म्हणजे किचनमध्ये कमी वेळ घालवून देवाच्या सान्निध्यात जास्त वेळ घालवावा हा आहे असं मत आहारतज्ज्ञ ज्ञानदा चितळे व्यक्त करतात. उपास करण्याची कारणं आणि परिणाम आपण जाणून घेणार आहोत.

उपास का केला जातो?

आपण अन्नपदार्थ खातो, तेव्हा पेशींना ग्लुकोज म्हणजे साखर मिळते. आपल्या शरीराद्वारे रक्तात काही प्रमाणात रक्तात साखर सोडली जाते. ही साखर वापरल्यावर उरलेली साखर ग्लायकोजेनच्या रुपात साठवली जाते आणि गरजेनुसार रक्तात सोडली जाते.

साधारणत: जेव्हा 12 तास काही न खाता पिता राहतो, तेव्हा ही साठवलेली साखर रक्तात सोडली जाते. त्यानंतर आपल्या शरीरातलं फॅट हे काम करतं.

साखर जाळण्यापेक्षा फॅट्स जाळल्यावर किटोन नावाचा पदार्थ तयार होतो. त्यामुळे भूकेची भावना कमी जाते. त्यामुळे अनेक दिवस सलग उपास केलेले लोक भूक जास्त लागत नाही असं सांगतात. या प्रक्रियेचा शरीरावर होणाऱ्या परिणामाचा वैज्ञानिक अभ्यास करत आहेत.

मँचेस्टर विद्यापीठाचे आहारतज्ज्ञ डॉ. मिशेल हार्वी यांच्या संशोधनानुसार, काही हार्मोनचं प्रमाण कमी केलं तर उपासामुळे स्तनांच्या कॅन्सरची शक्यता कमी होते.

सणावारी उपास करताना राजगिरा, रताळे, वरईचा भात, या पदार्थांचा वापर करावा. हे पदार्थ थोड्या प्रमाणात खायला हवेत.

सणावाराचे दिवस तणावपूर्ण असतात, त्या दिवशी उपास करत असाल तर आहारावर विशेष लक्ष देण्याची गरज असते. त्या दिवशी तेलकट खाणं टाळावं असा सल्ला दीक्षित देतात.

उपासामुळे वजन कमी होण्यास मदत होते का?

उपासामुळे शरीर फॅट जाळायला सुरुवात करतं. त्यामुळे प्राथमिक पातळीवर उपासामुळे वजन कमी करण्यास नक्कीच मदत होते. मात्र कोणत्या पद्धतीने जास्त फायदा होतो यावर वैज्ञानिकांचं एकमत नाही. इंटरमिटंट फास्टिंग मध्ये कमी कर्बोदकं असतात, त्यात 500-800 कॅलरी कमी होणार अशा पद्धतीने आहाराची रचना होते जेणेकरून वजन कमी होईल.

मात्र असं होण्यासाठी तुम्ही तीन ते चार दिवस कर्बोदकांशिवाय राहणं गरजेचं आहे. तेव्हाच शरीरात किटॉसिस नावाची प्रकिया व्हायला सुरुवात होते. या प्रक्रियेत तुमची भूक कमी व्हायला सुरुवात होते. मात्र वैद्यकीय मार्गदर्शनाखाली हे सगळं करण्याचा सल्ला तज्ज्ञ देतात कारण दीर्घकाळ उपास करण्याचे काय परिणाम होतात ते अद्यापही समोर आलेलं नाही.

उपास करण्याचे आरोग्याला आणखी काही फायदे असतात का?

उपास करण्याचा मेंदूला फायदा होतो.

न्युरोसायंटिस्ट डॉ. मार्क मॅटसन यांनी सिद्ध दाखवलंय की, उंदरांना कमी कॅलरीच्या डायटवर ठेवलं आणि असं लक्षात आलं की त्यांची स्मरणशक्ती जास्त चांगली आहे.

2016 मध्ये त्यांनी मनुष्यप्राण्यांवर केलेल्या एका अभ्यासानुसार उपास करणाऱ्या लोकांना अल्झायमरचा धोका कमी असतो. किंग्स कॉलेज लंडन च्या प्रा. टिम स्पेक्टर यांच्या असं निदर्शनास आलं की, उपासामुळे पोटाच्या आतल्या बॅक्टेरियावरही परिणाम होतो. उपास केल्यानंतर पोटाचं आरोग्य सुधारणाऱ्या बॅक्टेरियाचे प्रकार आढळतात. त्यामुळे एखाद्यावेळी नाश्टा केला नाही तरी फारसा फरक पडत नाही. उलट त्यामुळ पोटाच्या आतलं आरोग्य सुधारतं.

डायबेटिसमुळे स्वादुपिंडाचं कार्य सुरळीत होतं त्यामुळे डायबेटिसवर नियंत्रण मिळवण्यास मदत होते. मात्र हे करताना वैद्यकीय सल्ला जरुर घ्यावा.

आहारतज्ज्ञ ज्ञानदा चितळे यांच्या मते, पोटाला आराम म्हणून महिन्यातून एक ते दोनदा उपास करणं फायदेशीर असतं. मात्र त्याचा अतिरेक टाळावा. आठवड्यातून दोन ते तीनदा उपास केल्याने आम्लपित्ताचा त्रास उद्भवू शकतो. त्यामुळे संयतपणे उपास केला तर त्याचे फायदेही होतात.

इंटरमिटंट फास्टिंग आणि त्याचा परिणाम

विस्कॉन्सिन स्कुल ऑफ मेडिसिन अँड पब्लिक हेल्थ चे सहयोगी प्राध्यापक कॅलरी रिस्ट्रिक्शनच्या फायद्याचा अभ्यास केला आहे. शरीराच्या खालच्या भागाचं वजन वाढवणाऱ्या कॅलरीवर त्यांनी विशेष अभ्यास केला आहे.

"रोज काही वेळ उपवास केला तर त्याचा फायदा होतो. उपवासामुळे शरीराची स्थिती बदलते. त्यामुळे शरीरारची स्थिती खरंतर सुधारते. उपवासामुळे मिसफोल्डेड प्रोटिन्स स्वच्छ होतात.

मिसफोल्डेड प्रोटिन हे प्रोटिनचंच मोडकंतोडकं रुप आहे. हा एक अणू आहे जो अनेक आजारांना आमंत्रण देतो.

अँडरसन यांच्यामते इंटरमिटंट फास्टिंगमुळे शरीराची कार्य योग्य पद्धतीने पार पडण्यास मदत होते. शरीराला ब्रेक मिळतो. तो खाण्यासाठी जागा निर्माण करतो आणि शरीराच्या ज्या भागाला उर्जेची गरज आहे तीसुद्धा मिळते.

इटलीमधील पडोवा विद्यापीठातील शारीरिक विज्ञान विषयाचे प्राध्यापक अँटनिओ पाओली म्हणतात, "उपवासामुळे ग्लायसेमिक प्रक्रियेत सुधारणा होते. खाल्ल्यानंतर शरीरातील साखरेचं प्रमाण वाढतं. साखरेचं हे प्रमाण कमी करण्यासाठी उपवासाचा फायदा होतो. शरीरात साखरेचं प्रमाण कमी झालं की लठ्ठपणा वाढत नाही."

"आमच्याकडे असलेल्या आकडेवारीनुसार रात्री लवकर जेवण्याचे आणि उपवास ठेवण्याच्या वेळ वाढवल्यामुळे शरीरावर काही सकारात्मक परिणाम होतात जसं ग्लायसेमिक कंट्रोल."

"पाओली सांगतात की ग्लायकेशन नावाच्या प्रकियेमुळे सगळ्या पेशींमध्ये साखरेची पातळी कमी होणं फायद्याचं असतं. इथेच साखरेचं आणि प्रोटिन्सचं संयुग तयार होतं आणि कंपाऊंड तयार होतं. त्याला Advance Glycation end product असं म्हणतात. त्यामुळे शरीराला सूज येऊ शकते आणि डायबेटीज आणि हृदयरोगांची शक्यताही वाढते.

हे वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहि61890597ले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)