You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
गावामध्ये घुसल्या पिवळ्या मुंग्या, पाळीव प्राण्यांची दृष्टी गेली; लोकांवर आली घरं सोडण्याची वेळ
- Author, प्रसन्न वेंकटेश आणि सुबगुणम कन्नन
- Role, बीबीसी तामीळ
या गावांमधल्या लोकांचा उदरनिर्वाह शेती आणि गुरे पाळून होतो. गेल्या काही वर्षात या गावांना विचित्र अशा मुंग्यांनी जर्जर करून सोडलं आहे.
तामिळनाडूमध्ये दिंडीगल इथे नाथम नावाच्या परिसरात पन्नाकडू, उलप्पूकडी, वेलायधमपट्टी, कुट्टूर, कुट्टूपट्टी, सर्वीदू, आथिपट्टी या गावांदरम्यान जंगल पसरलं आहे.
डोंगररांगात, जंगलात राहणाऱ्या या मुंग्या आता गावात आल्या आहेत. या मुंग्या गाईगुरांच्या डोळ्यांवर आक्रमण करतात. यामुळे गुरांचे डोळे निकामी होत असल्याचं स्पष्ट झालं आहे.
जंगली बैल, साप आणि ससेही या मुंग्यांच्या आक्रमणाचा शिकार झाले आहेत. या मुंग्या माणसांनाही त्रासदायक ठरल्या आहेत. या मुंग्यांनी शरीरावर आक्रमण केल्यानंतर डोळे लाल होतात. डोळे सुजतातही. डोळ्यांना खाज सुटते आणि फोडही येतात. अनेक गावकरी या मुंग्यांमुळे हैराण झाले आहेत.
धोकादायक प्रजाती
बीबीसी तामीळने कीटकशास्त्रज्ञ डॉ. प्रियदर्शन धर्मराजन यांच्याशी बातचीत केली. अशोका ट्रस्ट फॉर रिसर्च इन इकॉलॉजी अँड एन्व्हार्यमेंट या संस्थेत ते काम करतात.
ते सांगतात, "या पिवळ्या विषारी मुंग्या आहेत. त्या अतिशय धोकादायक आहेत. माणसांची वस्ती असते तिथे प्रामुख्याने या मुंग्या येतात. इंटरनॅशनल युनियन फॉर कन्झर्व्हेशन ऑफ नेचर संघटनेनं या मुंग्यांची वर्गवारी विनाशकारी गटात केली आहे".
करंथामलाई डोंगररांगांच्या पायथ्याशी 20 किलोमीटर परिसरात या मुंग्यांनी थैमान घातलं आहे.
या भागात गाईगुरांना चरायला घेऊन जाऊ नका अशी सूचना पशुपालन विभागाने नागरिकांना केली आहे.
या भागात राहून गुरे चरणाऱ्या माणसांनी हा भाग मुंग्यांच्या आक्रमणामुळे सोडला आहे.
हे सगळेजण आता गावात राहू लागले आहेत.
गावातली माणसं तासातासाला कीटकनाशकांचा फवारा या मुंग्यावर मारत आहेत.
मुंग्यांची संख्या झपाट्याने वाढत आहे. घाऊक प्रमाणात वाढणाऱ्या मुंग्यांचं आक्रमण रोखण्यासाठी गावकऱ्यांनी पशुपालन विभागाला विनंती केली आहे.
मुंग्यांमुळे गाईगुरांचं आयुष्य तसंच दृष्टी धोक्यात आहे.
सेल्वम नावाच्या शेतकऱ्याने अडचणींविषयी सांगितलं.
त्यांनी सांगितलं, "मुंग्यांच्या समस्येमुळे जंगलाजवळच्या भागात आम्ही शेती करू शकत नाही. मी 55 वर्षांचा आहे. मी अशा मुंग्या कधीच पाहिल्या नाहीत. या मुंग्या कोणालाच सोडत नाहीत. बकऱ्या, गाईगुरं, कोंबड्या सगळ्यांवर आक्रमण करत आहेत".
पिवळ्या विषारी मुंग्या
जिथे माणसांचा वावर मोठ्या प्रमाणावर असतो तिथे या मुंग्या वास्तव्य करतात. एखादं घर खूप काळ बंद असेल तर या मुंग्या तिथे जमा होत नाहीत.
माणसांचा वावर वाढू लागतो तसं या मुंग्यांना सुगावा लागतो असं डॉ. प्रियदर्शन सांगतात.
आशिया आणि ऑस्ट्रेलिया खंडात या मुंग्या आढळतात. त्या सर्वभक्षक आहेत. अन्य मुंग्यांना खाऊनही त्या जगतात. त्या मृत प्राणीही खाऊनही जगतात. माणसाच्या पायाला ज्या जखमी होतात त्यावरही या मुंग्या आक्रमण करतात. या मुंग्यांचं एकमेकींशी उत्तम समन्वय असतो. त्या मोकळेपणाने फिरतात. त्यांच्या दुधावरही या मुंग्या तग धरतात. या मुंग्यांना कशाचेही भय नाही. त्यांच्या शरीरातून फॉर्मिक अॅसिड स्रवतं. ते त्यांच्या शिकारीवर एकत्रितपणे हल्ला करतात.
'ऑन अ ट्रेल ऑफ अँट्स' या पुस्तकात विषारी मुंग्यांविषयी सविस्तरपणे लिहिलं आहे. हिरवळीचा भाग, जंगल, गवताळ, पर्णपाती, शेती, बगीचे या परिसरात मुंग्या राहतात. या मुंग्यांच्या वारुळात हजारो मुंग्या राहतात. त्या खूप सारी जागा व्यापतात आणि प्राणपणाने आपलं घर जपतात.
या मुंग्या 6.5 ते 7 मीटर असतात. त्या अतिशय वेगाने पळतामुंग्या खाल्ल्यामुळे खरंच दीर्घायुष्य लाभतं का?त. पश्चिम घाटातही या मुंग्यांचं वास्तव्य आहे. त्या आक्रमणासाठी ओळखल्या जातात.
बकऱ्यांनी गमावली दृष्टी
अलुगू शेतकऱ्याने दिलेल्या माहितीनुसार करंथमलाई भागातल्या सगळ्या पाळीव प्राण्यांना या मुंग्यांनी ग्रासलं आहे.
साप, ससे यांना या मुंग्यांनी विव्हळ करून सोडलं आहे. हे प्राणी दृष्टी गमावत आहेत.
वन विभागाने आता या भागाचं सर्वेक्षण हाती घेतलं आहे. मुंग्यांनी डसल्यानंतर हे प्राणी खाऊ शकत नाहीत. शरीरातली ऊर्जा संपून ते मरतात.
वेलायुधमपट्टी डोंगर परिसरात मी राहतो. माझ्या बकऱ्या या मुंग्यांमुळे वारल्या. माझ्या घरात या मुंग्या घुसल्यामुळे मला घरं रिकामं करावं लागलं. आम्ही त्या मुंग्यांना रोखू शकलो नाही. त्या वाढतच गेल्या. वनविभागाने या मुंग्यांना रोखायला हवं.
सूज, खाज
आशिका नावाच्या महाविद्यालयीन मुलीने या मुंग्या चावल्यावर नेमका काय त्रास होतो ते सांगितलं.
आधी या मुंग्या जंगलात दुर्गम भागात असायच्या, आता त्या मानवी वस्तीत आढळू लागल्या आहेत. सूर्यप्रकाश तळपत असताना या मुंग्या फारसा त्रास देत नाही.
पावसाळ्यात या मुंग्या गावात सगळीकडे बस्तान मांडतात. गुरं चरायला गेलेल्या लोकांना या मुंग्या चावल्या, त्यांना त्वचेचा आजार झाला.
शेतीला या मुंग्यांचा मोठा फटका बसला आहे. वन आणि पशुपालन विभागाला कॅम्प आयोजित करावे लागले आहेत.
डॉ. सिंगामुथू यांनी बीबीसीशी बोलताना सांगितलं की, या मुंग्या तशा नेहमीच्या मुंग्यासारख्याच आहेत. त्यांच्या शरीराचा अभ्यास सुरू आहे. त्यांचा वेगाने प्रसार का होतोय हे समजत नाहीये. त्यांना रोखण्यासाठी काय करावं हेही समजत नाहीये.
हवामान बदल असू शकतं कारण?
हवामान बदलामुळे हा प्रश्न अधिक गुंतागुंतीचा झालेला असू शकतो असं डॉ. प्रियदर्शन यांनी सांगितलं. कीटक थंड रक्ताचे असतात. भवतालाच्या तापमानावर त्यांच्या शरीराचं तापमान बदलतं. आजूबाजूचं तापमान वाढतं त्यांचा शरीरातलं चयापचयाचा वेग वाढतो. त्यांना जास्त खावं लागतं. हे कदाचित कारण असू शकतं. सध्याचं हवामान सतत बदलणारं आहे. यासंदर्भात अधिकाअधिक डेटा गोळा करावा लागेल.
हे वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)