नवाब मलिकांच्या अडचणी आणखी वाढल्या, अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल #5मोठ्याबातम्या

नवाब मलिक

फोटो स्रोत, ANI

फोटो कॅप्शन, नवाब मलिक

आज विविध वृत्तपत्र आणि वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्यांपैकी पाच मोठ्या बातम्यांचा थोडक्यात आढावा :

1) नवाब मलिकांच्या अडचणी आणखी वाढल्या, अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल

राष्ट्रवादीचे नेते आणि माजी मंत्री नवाब मलिक यांच्या अडचणीत आणखी वाढ झालीय. अमलीपदार्थ नियंत्रण विभागाच्या मुंबई विभागाचे माजी संचालक समीर वानखेडे यांच्या तक्रारीवरून नवाब मलिक यांच्याविरोधात अॅट्रॉसिटीचा गुन्हा नोंदवण्यात आलाय. लोकसत्तानं ही बातमी दिली आहे.

जात प्रमाणपत्र पडताळणी समितीकडून समीर वानखेडेंना नुकताच दिलासा मिळाला. त्यानंतर वानखेडेंनी अॅट्रॉसिटीअंतर्गत मलिकांविरोधात तक्रार केली.

सहाय्यक पोलीस आयुक्त दर्जाच्या अधिकाऱ्यामार्फत या प्रकरणाची आता चौकशी केली जाणार आहे.

नवाब मलिक यांनी समीर वानखेडेंवर आरोप करताना, वानखेडे कुटुंबीयांबद्दल आक्षेपार्ह शब्दांचा वापर केल्याचा आरोप आहे.

2) जयंत पाटील म्हणतात, 'एकनाथ शिंदेंनी किती जणांची मनं सांभाळायची? त्यामुळे...'

"खातेवाटप करण्याचा अधिकार हा मुख्यमंत्र्यांना असतो. मात्र, एकनाथ शिंदेंनी किती जणांची मनं सांभाळायची आता. शिंदेनी किती जणांना सांभाळायचं, त्यामुळे आता सगळ्यांनी मिळून एकनाथ शिंदे यांना समजून घेणं गरजेचे आहे," असा उपरोधिक टोला राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी लगावला.

सांगलीमध्ये जयंत पाटील प्रसारमाध्यमांशी बोलत होते. टीव्ही 9 मराठीनं ही बातमी दिलीय.

जयंत पाटील

फोटो स्रोत, ANI

फोटो कॅप्शन, जयंत पाटील

शिंदे-फडणवीस सरकारच्या खातेवाटपाची जोरदार चर्चा आता रंगू लागली आहे. महत्वाची आणि अतिमहत्त्वाच्या खातेवाटपावरुन जोरदार गदारोळ सुरू झाला आहे.

मिळालेल्या खात्यावरून काही मंत्री नाराज असल्याची चर्चा सुरू झाल्यानंतर विरोधकांनी टोले-टोमणे लगावण्यास सुरुवात केली आहे.

3) साहित्य वर्तुळातील मान्यवरांनी घेतली उद्धव ठाकरेंची भेट

महाराष्ट्रातील साहित्य वर्तुळातील मान्यवरांनी शिवसेनेचे पक्षप्रमुख आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. लेखक, कवी-कवयित्रींसह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते.

उद्धव ठाकरेंच्या 'मातोश्री' निवासस्थानी झालेल्या या बैठीकीला कवी अरूण म्हात्रे, कवयित्री नीरजा, महेश केळुस्कर, अर्जुन डांगळे, मेधा कुलकर्णी, रवींद्र पोखरकरांसह अनेकजण उपस्थित होते.

X पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

X पोस्ट समाप्त

शिवसेनेच्या ज्येष्ठ नेत्या नीलम गोऱ्हे यांनी ही भेट घडवून आणल्याची माहिती मिळते आहे.

महाराष्ट्रातील दूषित राजकीय स्थितीबाबत या साहित्य वर्तुळानं दु:ख व्यक्त केलं. ईटीव्ही मराठीनं ही बातमी दिलीय.

4) 2031 पर्यंत भारत दुसरी सर्वांत मोठी अर्थव्यवस्था बनेल - मायकल पात्रा

पुढच्या दशकभरात म्हणजे 2031 पर्यंत भारतीय अर्थव्यवस्था जगात दुसऱ्या क्रमांकावर झेप घेऊ शकते, असा विश्वास रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे (आरबीआय) डेप्युटी गव्हर्नर मायकल पात्रांनी व्यक्त केला.

ऑर्गनायेझशन फॉर इकोनॉमिक कोऑपरेशन अँड डेव्हलपमेंटच्या अंदाजानुसार, भारत 2048 पर्यंत अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेलाही मागे टाकू शकते आणि चीननंतर सर्वात मोठी अर्थव्यवस्था भारताची असू शकते.

फायनान्शियल एक्स्प्रेसनं ही बातमी दिलीय.

5) जम्मू-काश्मीरच्या कुलगाममध्ये ग्रेनेड हल्ला, एका पोलिसाचा मृत्यू

जम्मू-काश्मीरच्या कुलगाममध्ये झालेल्या ग्रेनेड हल्ल्यात एका पोलिसाचा मृत्यू झाला आहे. ताहीर खान असं या पोलिसाचं नाव आहे. हिंदुस्तान टाइम्सनं ही बातमी दिलीय.

काश्मीर पोलीस विभागानं दिलेल्या माहितीनुसार, कुलगाममध्ये रात्री झालेल्या ग्रेनेड हल्ल्यात पुंचमधील पोलीस ताहीर खान जखमी झाले होते. त्यानं अनंतनागमधील जीएमसी हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी नेण्यात आलं. मात्र, तिथंच त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

राजौरी जिल्ह्यातील लष्करी तळावर झालेल्या हल्ल्यात भारताच्या चार जवानांचा मृत्यू झाला. त्यानंतर हा ग्रेनेड हल्ला झाला.

हे वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)