स्वातंत्र्य दिन : गांधी-नेहरूंना आरोपीच्या पिंजऱ्यात उभं करणं चुकीचं, सोनिया गांधींचा मोदींवर घणाघात

फोटो स्रोत, Getty Images
काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधींनी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदींवर जोरदार निशाणा साधला आहे.
"राजकीय फायद्यासाठी ऐतिहासिक तथ्यांवर चुकीचं वक्तव्य आणि गांधी-नेहरू-पटेल-आझाद यांच्यासारख्या महान राष्ट्रीय नेत्यांना असत्याच्या आधारे आरोपीच्या पिंजऱ्यात उभं करण्याच्या प्रयत्नांचा काँग्रेस कडाडून विरोध करेल," असं सोनिया गांधी म्हणाल्या.
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लाल किल्ल्यावरून केलेल्या भाषणात स्वातंत्र्यसेनानींच्या यादीत पंडित नेहरूंचं नाव घेतलं नाही. याचा संदर्भ सोनिया गांधींच्या टीकेला आहे.
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
X पोस्ट समाप्त
"आपल्या देशानं गेल्या 75 वर्षात अनेक गोष्टी मिळवल्या. मात्र, आजचं हे आत्ममग्न सरकार आपल्या स्वातंत्र्यसैनिकांच्या महान बलिदान आणि देशाच्या गौरवशाली इतिहासाला तुच्छ सिद्ध करण्याचे प्रयत्न करत आहे, जे कधीही स्वीकारलं जाऊ शकत नाही," असंही सोनिया गांधी म्हणाल्या.
नरेंद्र मोदींचे पुढील 25 वर्षांसाठी 'हे' 5 संकल्प
"आपल्यावर कधी अन्नसंकट आलं, कधी युद्ध झालं, दहशतवादानं अडचणी आणल्या, नैसर्गिक आपत्ती ओढवली, मात्र सर्व अडचणींवर मात करून भारत पुढे चालत राहिला," असं भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी लाल किल्ल्यावरून भाषणात म्हणाले.
भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्लीच्या लाल किल्ल्यावर ध्वजारोहण केले आणि त्यानंतर आपल्या भाषणाला सुरुवात केली.

फोटो स्रोत, Twitter/@BJP4India
देशासाठी बलिदान दिलेल्या लोकांचे स्मरण करून त्यांनी आपल्या भाषणाला सुरुवात केली.
नरेंद्र मोदींनी लाल किल्ल्यावरून देशासमोर 5 संकल्प ठेवले.
नरेंद्र मोदींचे पुढील 25 वर्षांसाठी 'हे' 5 संकल्प :
1) 25 वर्षात विकसित भारत निर्माण करायचा.
2) गुलामीची मानसिकतेचा अंश राहणार नाही यासाठी प्रयत्न करणंय
3) भारताच्या समृद्ध वारशाचा अभिमान बाळगणं.
4) एकता आणि एकजूटता हे मूल्य जपणं.
5) नागरिकांनी कर्तव्याचं पालन करणं.
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त, 1
पंतप्रधान मोदींच्या भाषणातील महत्त्वाचे मुद्दे -
- स्वातंत्र्यानंतर भारत कोलमडून पडेल, अशा शंका उपस्थित केल्या गेल्या. मात्र, ही हिंदुस्तानची माती आहे. या मातीत ते सामर्थ्य आहे, जे शतकांपासून लढत आलंय.
- आपल्यावर कधी अन्नसंकट आलं, कधी युद्ध झालं, दहशतवादानं अडचणी आणल्या, नैसर्गिक आपत्ती ओढवली, मात्र सर्व अडचणींवर मात करून भारत पुढे चालत राहिला.
- भारत लोकशाहीची जननी आहे

फोटो स्रोत, Twitter/@BJP4India
- 2014 माझ्याकडे देशाचं नेतृत्त्व आलं. स्वातंत्र्यानंतर जन्मलेला मी पहिला पंतप्रधान ठरलो. मी देशवासियांना जितकं समजू शकलो, त्यानुसार मी देशवासियांना आधार देण्याचा प्रयत्न केला.
- जग भारताकडे गर्वानं आणि अपेक्षेनं पाहतंय - नरेंद्र मोदी
- 'सबका साथ, सबका विकास'चं सूत्र घेऊन चाललो होतो, तर देशवासियांनी 'सबका प्रयास, सबका विश्वास' त्यात जोडलं.
- जेव्हा स्वप्न मोठे असतात, तेव्हा पुरुषार्थही मोठं असतं.
- आपल्या वारशाचा आपल्याला गर्व असायला पाहिजे
- आपला देश वेगानं विकसित होतंय.
- आपण कधीपर्यंत उर्जेसाठी इतर देशांवर अवलंबून राहणार? त्यामुळे या क्षेत्रातही आपल्याला आत्मनिर्भर व्हावं लागेल.
- भ्रष्टाचारासोबत आपल्याला पूर्ण ताकदीनिशी लढायचंय.
हे वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त, 2
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहि61890597ले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)