एकनाथ शिंदे-देवेंद्र फडणवीस सरकारची संपूर्ण यादी आणि खाती

एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस

फोटो स्रोत, ANI

शिंदे-फडणवीस मंत्रिमंडळातील नवनियुक्त मंत्र्यांचे खातेवाटप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केले आहे.

एकनाथ शिंदेंनी 39 आमदारांसह शिवसेनेतून बंड केलं आणि भाजपसोबत सरकार स्थापन केलं.

हे सरकार स्थापन झाल्यानंतर गेल्या जवळपास महिन्याभराहून अधिका काळ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याच हाती राज्याचा कारभार आहे.

मंत्रिमंडळ विस्ताराला होणारा उशीर लक्षात घेऊन, विरोधकांकडून शिंदे-फडणवीसांवर टीकाही सुरू झाली होती.

अखेर महाराष्ट्रातील शिंदे-फडणवीस सरकारचा 9 ऑगस्टला मंत्रिमंडळ विस्तार झाला.

त्यानंतर मंत्रिमंडळ विस्तारात शपथ घेतलेल्या मंत्र्यांना खातेवाटप जाहीर झालं नव्हतं. त्यामुळे त्यावरूनही टीका केली जात होती. अखेर खातेवाटप जाहीर झालं आहे.

एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीसांकडे कोणती खाती?

राज्यात महत्त्वाचं मानलं जाणारं गृहमंत्रिपद आणि अर्थमंत्रिपद ही दोन खाती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सोपवण्यात आली आहेत. नगरविकास खाते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वत:कडे ठेवलं आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडची खाती :

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे सामान्य प्रशासन, नगर विकास, माहिती व तंत्रज्ञान, माहिती व जनसंपर्क, सार्वजनिक बांधकाम(सार्वजनिक प्रकल्प), परिवहन, पणन, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य, मदत व पुनर्वसन, आपत्ती व्यवस्थापन, मृदा व जलसंधारण, पर्यावरण व वातावरणीय बदल, अल्पसंख्याक तसेच इतर कोणत्याही मंत्र्यांना वाटप न केलेले विभाग असतील.

एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडची खाती :

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे गृह, वित्त व नियोजन, विधी व न्याय, जलसंपदा व लाभक्षेत्र विकास, गृहनिर्माण, ऊर्जा, राजशिष्टाचार ही खाती असतील.

एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस

राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी मंजुरी दिल्यानंतर हे खातेवाटप जाहीर करण्यात आले आहे.

इतर 18 मंत्र्यांची खाती पुढीलप्रमाणे आहेत:

भाजपचे मंत्री :

1) राधाकृष्ण विखे-पाटील - महसूल, पशुसंवर्धन आणि दुग्धविकास

2) सुधीर मुनगंटीवार- वने, सांस्कृतिक कार्य, व मत्स्य व्यवसाय

एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस

3) चंद्रकांत पाटील- उच्च व तंत्रशिक्षण, वस्त्रोद्योग आणि संसदीय कार्य

4) डॉ. विजयकुमार गावित- आदिवासी विकास

एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस

5) गिरीष महाजन- ग्राम विकास आणि पंचायती राज, वैद्यकीय शिक्षण, क्रीडा व युवक कल्याण

6) मंगलप्रभात लोढा- पर्यटन, कौशल्य विकास व उद्योजकता, महिला व बालविकास

एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस

7) सुरेश खाडे- कामगार

8) रवींद्र चव्हाण - सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून), अन्न व नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण

एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस

9) अतुल सावे- सहकार, इतर मागास व बहुजन कल्याण

एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस

शिंदे गटाचे मंत्री :

1) गुलाबराव पाटील- पाणीपुरवठा व स्वच्छता

2) दादा भुसे- बंदरे व खनिकर्म

एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस

3) संजय राठोड- अन्न व औषध प्रशासन

4) संदीपान भुमरे- रोजगार हमी योजना व फलोत्पादन

एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस

5) उदय सामंत- उद्योग

6) प्रा.तानाजी सावंत- सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण

एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस

8) दीपक केसरकर- शालेय शिक्षण व मराठी भाषा

एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस

9) शंभूराज देसाई- राज्य उत्पादन शुल्क

एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस

खात्यांबाबत आमच्यात वाद नाही - फडणवीस

राज्य सरकारचं खातेवाटप जाहीर झाल्यानंतर देवेंद्र फडणवीसांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली.

देवेंद्र फडणवीस म्हणाले, "अडीच वर्षाचा फॉर्म्युला कधीही ठरला नव्हता. सगळ्या वाटाघाटी मी केल्या होत्या. त्यामुळे मला माहिती आहे. सगळ्यात मोठी बेईमानी आमच्याबरोबर झाली. आमच्याबरोबर जे निवडून आले ते विरोधी पक्षाशी हातमिळवणी करून निवडून आले. हा सगळ्यात मोठा विश्वासघात आहे."

ते पुढे म्हणाले, "पुढचा विस्तार कधी करायचा हा मुख्यमंत्र्यांचा विषय आहे. आम्हाला प्रत्येकाला जबाबदारी मिळाली. महाराष्ट्राला सुशासन देण्याचा प्रयत्न असेल. खात्यांबाबत आमच्यात कोणतेही वाद नाहीत. आमच्याकडची खाती गरज वाटली तर त्यांना देता येईल आणि त्यांच्याकडची काही खाती आम्ही मागून घेऊ."

एकनाथ शिंदेंच्या नेतृत्त्वात शिवसेनेत बंड

शिवसेनेत सर्वात मोठं बंड एकनाथ शिंदेंच्या नेतृत्त्वात झालं.

एकनाथ शिंदेंनी शिवसेनेचे 39 आमदार सोबत घेऊन बंड केलं आणि पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्रिपदावरून खाली खेचलं. त्यानंतर भाजपसोबत सत्ता स्थापन करून एकनाथ शिंदे मुख्यमंत्रिपदी विराजमान झाले आहेत.

एकनाथ शिंदे हे फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकारमध्ये उपमुख्यमंत्री होतील, अशी शक्यता वर्तवली जात होती. पण एकनाथ शिंदे यांची थेट महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदावर वर्णी लागल्याने खळबळ उडाली आहे. हेही वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)