झोप येत नाहीये? मग या 5 टिप्स वाचा

झोप येत नाहीये? मग या 5 टिप्स वाचा

फोटो स्रोत, Getty Images

    • Author, मनिष पांडे
    • Role, न्यूजबिट रिपोर्टर, बीबीसी

झोप येत नाहीये म्हणून तुमची चुळबुळ सुरूये... गेला तासभर तुम्ही मोबाईलला हातही लावलेला नाही... शांतता वगैरे असूनही झोप येत नाहीये... हे वाचून आपल्या बाबतीतही हेच घडत असल्याचं तुम्हाला जाणवतं का?

1. रुटिन

योग्य झोप यावी यासाठी रुटिन म्हणजे दैनंदिन करायच्या गोष्टी (दिनक्रम) नीट सुरळीत असायला हव्यात असं मत प्रा. केव्हिन मॉर्गन व्यक्त करतात. ते लव्हबरो विद्यापीठामध्ये मानसोपचारतज्ज्ञ आहेत. तिथं झोपेवर गेली अनेक वर्षं संशोधन सुरू आहे.

कोरोना लॉकडाऊन काळात लोकांच्या रुटिनमध्ये मोठा बदल झाला त्यामुळे झोपेसाठी लोकांनी प्रयत्न करणं हे फारसं धक्कादायक नाही असं ते सांगतात.

रुटिनमुळे चांगली झोप येते, आपल्या झोपेचं रक्षण तेच करत असतं असं केव्हिन सांगतात.

कोरोनानंतर आपल्या आयुष्यात मोठा बदल झाला असला तरी पूर्वीप्रमाणे झोपेचा पॅटर्न कायम ठेवणं गरजेचा आहे असं केव्हिन यांचं मत आहे.

"काहीही झालं तरी तुमच्या नेहमीच्या वेळेला उठणं आणि नेहमीच्या वेळेला झोपणं कायम ठेवा", असं ते सांगतात.

दिवसा डुलक्या घेऊन आपल्या झोपेचा पॅटर्न बिघडवण्यापेक्षा रात्री योग्य झोप घेणं चांगलं असं ते सुचवतात.

2. उजेड

कोरोना काळानंतर अनेकांच्या हालचालींवर मर्यादा आल्या. बाहेर पडणं कमी केल्यामुळे उजेडाशी, सूर्यप्रकाशाशी संपर्क कमी झाला. पण उजेडाशी संबंध कमी आल्यामुळे झोपेवर परिणाम होतो.

आपल्या शरीरात मेलोटोनिन नावाचं हार्मोन असतं. तेच आपला झोपण्याचा आणि सकाळी उठण्याचा क्रम नियंत्रित करत असतं. त्यासाठी आपल्य़ा डोळ्यांचा बाहेरच्या प्रकाशाशी संबंध येणं गरजेचं आहे.

आता उजेड आहे की अंधार हे आपल्याला शरीराला फक्त याच माध्यमातून कळतं.

झोप येत नाहीये? मग या 5 टिप्स वाचा

फोटो स्रोत, Getty Images

जर आपण घरातच राहिलो तर सूर्यप्रकाशाशी संबंध कमी येईल त्यामुळे मेलोटोनिनचं प्रमाण कमी होईल.

केव्हिन सांगतात, "यासाठी बाहेर जाऊन व्यायाम करणं किंवा बाहेरची कामं करणं आवश्यक आहे. जर बाहेर फारच सूर्यप्रकाश असेल तरीही काळे चष्मे लारवण्याची गरज नाही. सूर्यप्रकाश डोळ्यांपर्यंत येऊ द्या, त्यामुळे तुमच्या झोपेचा पोत आणि तुमचा मूडही सुधारेल."

जर याचा चांगला परिणाम दिसून यायचा असेल तर बाहेर जाण्याची एक वेळ ठरवून घ्या, म्हणजे तो तुमच्या दिनक्रमाचाच एक भाग होईल.

3. ताण कमी करा

मानसिक ताणाचा आपल्या झोपेवर परिणाम होत असतो. केव्हिन सांगतात, "हा ताण आपण बिछान्यापर्यंत अंगावर वागवू नये. रात्री झोपताना ताण कमी करण्यासाठी आपण सर्व शक्य ते केलं आहे, या पलिकडे फार काही करण्यासारखं नाही; अशी स्वतःला खात्री करुन द्यावी. झोप झाल्यावर दुसऱ्या दिवशी त्यावर विचार करता येईल."

4. जागा ठरवून घ्या

जर तुम्ही वर्क फ्रॉम होम करत असाल तर चांगलंच आहे, तुम्ही तुमची काम करायची जागा स्वतः निवडू शकता. फक्त बेडरुममधून काम करू नये. कारण ती जागा झोपेशी निगडीत आहे.

झोप येत नाहीये? मग या 5 टिप्स वाचा

फोटो स्रोत, Getty Images

"खरंच झोपायचं नसेल तर बेडजवळ जाऊ नये. बेडवर बसू नये, पडून राहू नये." असं केव्हिन सुचवतात.

5. दारू

दीर्घकाळाचा विचार करता दारू ही आपल्या झोपेसाठी घातक आहे. झोपेची गुणवत्ता आणि झोपेची रचना बिघडून जाते.

हे वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)