विधान परिषद निवडणूक : प्रसाद लाड, भाई जगताप विजयी, चंद्रकांत हांडोरे पराभूत, भाजपचे 5 उमेदवार विजयी

विधान परिषद निवडणुका, शिवसेना, भाजप, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस

फोटो स्रोत, Getty Images

विधान परिषद निवडणुकीचे निकाल हाती आलेले आहेत. त्यात महाविकास आघाडीला मोठा धक्का बसला आहे. भाजपला त्यांचा पाचवा उमेदवार निवडून आणण्यात यश आलं आहे.

भाजपचे प्रासाद लाड विजयी झाले आहेत. तर काँग्रेसचे चंद्रकांत हांडोरे हरले आहेत.

भाजपला 134 मतं मिळाल्याचा दावा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांनी केला आहे.

या निवडणुकीसाठी 285 आमदारांनी मतदान केलं होतं. काँग्रेस आणि भाजपनं आपला उमेदवार मागे घेतला नसल्यानं निवडणूक अत्यांत चुरशीची झाली. कारण 10 जागांसाठी 11 उमेदवार रिंगणात होते.

विधान परिषदेच्या 10 जागांसाठी भाजपचे 5, राष्ट्रवादीचे 2, काँग्रेसचे 2 आणि शिवसेनेचे 2 असे एकूण 11 उमेदवार निवडणूक लढत होते.

विजयी उमेदवार :

  • सचिन अहिर (शिवसेना) - विजयी
  • आमशा पाडवी (शिवसेना) - विजयी
  • भाई जगताप (काँग्रेस) - विजयी
  • चंद्रकांत हंडोरे (काँग्रेस) - हरले
  • एकनाथ खडसे (राष्ट्रवादी काँग्रेस) - विजयी
  • रामराजे निंबाळकर (राष्ट्रवादी काँग्रेस) - विजयी
  • प्रवीण दरेकर (भाजप) - विजयी
  • प्रसाद लाड (भाजप) - विजयी
  • राम शिंदे (भाजप) - विजयी
  • श्रीकांत भारतीय (भाजप) - विजयी
  • उमा खापरे (भाजप) - विजयी
उमा खापरे
फोटो कॅप्शन, उमा खापरे

महाराष्ट्रात परिवर्तनाची नांदी - देवेंद्र फडणवीस

भाजपच्या विजयावर प्रतिक्रिया देताना विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस म्हणाले, "आज विधान परिषद निवडणुकीत भाजपचे पाचही उमेदवार निवडून आले, ही अतिशय आनंदाची गोष्ट आहे. आम्ही राज्यसभेच्या निवडणुकीत 123 मते घेतली होती. आता आम्ही 134 मतं या निवडणुकीत घेतली."

ते पुढे म्हणाले, "महाविकास आघाडीमध्ये प्रचंड नाराजी आहे, हे मी सुरुवातीपासून सांगत होतो. त्यांच्यात समन्वय नाही. आमदारांचा मुख्यमंत्र्यांवर विश्वास नाही. त्यामुळे सदसदविवेकबुद्धीला स्मरून आमच्या पाचव्या उमेदवाराला आमदार मत देतील, असं आम्हाला विश्वास होता. त्यामुळे एकही मत उपलब्ध नसतानाही आमचा पाचवा उमेदवार निवडून आला."

"माझे सहकारी लक्ष्मण जगताप आणि मुक्ता टिळक इतक्या अडचणीतही याठिकाणी आले आणि त्यांनी आमच्या विजयाला हातभार लावला त्याबाबत त्यांचे आभार मानतो. आमचे नेते ंपंतप्रधान नरेंद्र मोदी भारताच्या विकासासाठी काम करत आहेत. त्यांच्या पाठिशी महाराष्ट्र उभा आहे. महाराष्ट्रात परिवर्तनाची नांदी आपल्याला पाहायला मिळत आहे. सरकारमधील असंतोष आता बाहेर आला आहे. आमचा संघर्ष असाच सुरू राहील. राज्यात आमचं लोकाभिमुख सरकार आणल्यानंतरच आमचा संघर्ष थांबेल," असंही फडणवीस म्हणाले.

हे वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)