'नरेंद्र मोदी हिटलरच्या मार्गाने चालत राहिले तर...', सुबोधकांत सहाय यांचं धक्कादायक वक्तव्य

"नरेंद्र मोदी हिटलरच्या मार्गाने चालत राहिले तर त्यांनाही हिटलरचा मृत्यू येईल," असं वक्तव्य काँग्रेसचे नेते सुबोधकांत सहाय यांनी केलं आहे. नवी दिल्लीतल सुरू असलेल्या काँग्रेसच्या 'सत्याग्रह' आंदोलनात ते बोलत होते.

ते म्हणाले, "मोदी या देशात हुकुमशाहाप्रमाणे काम करतायत. त्यांनी हिटलरचा इतिहासही पार केला. हिटलरनेही अशीच एक संस्था बनवली होती. त्याचं नाव खाकी होतं. मोदी हिटलरच्या मार्गाने चालत राहिले तर हिटलरप्रमाणे मृत्यू होईल."

नॅशनल हेराल्ड प्रकरणी राहुल गांधींनी सुरू असलेली ईडीची चौकशी आणि 'अग्नीपथ' योजनेला विरोध करण्यासाठी सोमवारी (20 जून) दिल्लीत काँग्रेसने 'सत्याग्रह' आंदोलन पुकारलं आहे.

भाजपने अनेक राज्यात आमच्या सत्तेत आलेल्या सरकारला पाडण्याचा प्रयत्न केला, अशीही टीका सुबोधकांत सहाय यांनी केलीय.

काँग्रेसने हात झटकले

सुबोधकांत सहाय यांचं वक्तव्य समोर आल्यानंतर वाद निर्माण झाला होता. पण काँग्रेसने या प्रकरणातून अंग काढून घेण्याचा प्रयत्न केला.

सुबोधकांत सहाय यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना काँग्रेसने म्हटलं की पंतप्रधानांविरुद्ध कोणत्याही प्रकारच्या अभद्र टीकेचं काँग्रेस पक्ष समर्थन करत नाही.

काँग्रेस महासचिव जयराम रमेश यांनी ट्विटरवर लिहिलं, "काँग्रेस पक्ष मोदी सरकारच्या हुकूमशाही विचारसरणी आणि जनता विरोधी धोरणांविरुद्ध सातत्याने लढत राहील. पण पंतप्रधानांविरुद्ध कोणत्याही प्रकारच्या 'बेछूट' वक्तव्याबाबत पक्ष सहमत नाही. आमचा संघर्ष गांधीवादी सिद्धांताच्या पद्धतीनेच सुरू राहील.

हेही वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)