SSC Result Maharashtra Board : दहावीच्या निकालात मुलींची बाजी, एकूण निकाल मात्र घसरला

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, पुणे (महाराष्ट्र बोर्ड) SSC बोर्डाचा निकाल जाहीर झाला आहे. यंदा राज्याचा निकाल 96.94 टक्के लागला आहे.

दरवर्षीप्रमाणे या वर्षीही मुली आघाडीवर आहेत. मुलींचा निकाल 97.96 टक्के जाहीर झालाय आणि मुलांचा निकाल 96.06 टक्के आहे. राज्यात एकूण 9 विभागीय मंडळांअंतर्गत परीक्षा पार पडली.

गेल्यावर्षी निकालाची टक्केवारी 99.95 होती. तसंच 2020 मध्ये 95.30 टक्के निकाल जाहीर झाला.

गेल्या वर्षी कोरोना आरोग्य संकटामुळे अंतर्गत मुल्यमापनानुसार निकाल लावण्यात आला होता. त्यामुळे 99.95 टक्के निकाल लागला होता. यावर्षी उत्तीर्ण विद्यार्थ्यांची टक्केवारी थोडी कमी झाली आहे.

कोणत्या विभागाचा निकाल किती?

कोकण विभागाचा निकाल सार्वाधिक असून नाशिक विभागाचा निकाल सर्वात कमी आहे.

  • पुणे: 96.96%
  • नागपूर: 97
  • औरंगाबाद: 96.33%
  • मुंबई: 96.94%
  • कोल्हापूर: 98.50%
  • अमरावती: 96.81 %
  • नाशिक: 95.90%
  • लातूर: 97.27%
  • कोकण: 99.27%

दहावीचं वर्ष शैक्षणिक जीवनातील पहिला महत्त्वाचा टप्पा असतो. या परीक्षेत सर्व विद्यार्थ्यांना यश मिळावं, अशी शुभेच्छा गायकवाड यांनी दिल्या आहेत.

SSC Result 2022: असा पाहा निकाल

दहावीचा निकाल पाहण्यासाठी खालील प्रक्रिया पूर्ण करावी लागेल.

  • निकाल जाहीर झाल्यानंतर म्हणजेच उद्या दुपारी 1 वाजता विद्यार्थ्यांनी अधिकृत वेबसाइट mahresult.nic.in किंवा mahahsscboard.in वर भेट द्यावी.
  • वेबसाइटवर SSC निकाल 2022 साठी एक लिंक दिसेल. या लिंकवर क्लिक करावे.
  • याठिकाणी क्लिक केल्यानंतर तुमचा जन्मदिनांक तसेच रोल नंबर आदी आवश्यक माहिती यामध्ये भरावी.
  • यानंतर आपला निकाल वेबसाईटवर दिसू लागेल.
  • DOB सोबत तुमचा रोल नंबर किंवा नाव भरा.
  • हा निकाल PDF स्वरुपात डाऊनलोडही करून ठेवता येऊ शकतो.

हेही वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)