धनंजय महाडिकांना पहिल्या पसंतीची 27 मतं, अपक्षांची 9-10 मतं फुटल्याचा अंदाज #5मोठ्या बातम्या

फोटो स्रोत, Facebook/Dhananjay Mahadik
विविध वृत्तपत्रं आणि वेबसाइट्सवरील पाच महत्त्वाच्या बातम्या...
1. धनंजय महाडिकांना पहिल्या पसंतीची 27 मतं, अपक्षांची 9-10 मतं फुटल्याचा अंदाज
राज्यसभा निवडणुकीवरुन महाराष्ट्रामध्ये मोठे नाट्य पाहण्यास मिळाले आहे. अखेरीस 9 तासांच्या प्रतिक्षेनंतर निकाल हाती आला आहे. कोल्हापूरमधून धनंजय महाडिकच हे कोल्हापूरचे 'पैलवान' ठरले आहे. धनंजय महाडिक विजयी झाले आहे. शिवसेनेचे उमेदवार संजय पवार पराभूत झाले आहे. लोकमत न्यूज 18 ने ही बातमी दिली आहे.
पीयूष गोयल, अमरावतीमधून अनिल बोंडे आणि कोल्हापूरमधून यांना उमेदवारी दिली होती. भाजपचे दोन्ही उमेदवार विजयी झाले आहे. तर धनंजय महाडिक सुद्धा विजयी झाले आहे.
भाजपचे संख्याबळ 122 इतकी होते. राज्यसभेचे दोन उमेदवार निवडून आणल्यानंतर भाजपकडे 28 मते राहत होती. पण, पीयूष गोयल यांना 48 मतं मिळाली आणि अनिल बोंडे यांनाही 48 मतं मिळाली.
त्यानंतर पहिल्या पसंतीची 27 मतं ही धनंजय महाडिक यांना मिळाली आहे. तर महाडिक यांच्याविरोधात उभे असलेले शिवसेनेचे उमेदवार संजय पवार यांना 33 मतं मिळाली आहे. त्यामुळे अपक्षांची 9 ते 10 मतं फुटली असल्याचा अंदाज वर्तवला जात आहे.
2. सुहास कांदेंचे मत बाद, संजय राऊतांना सरासरीपेक्षा एक मत कमी
राज्यसभा निवडणुकीवरुन राज्यात मोठे राजकीय नाट्य पाहण्यास मिळाले. भाजपने घेतलेल्या आक्षेपानंतर शिवसेनेचे आमदार सुहास कांदे यांचे मत बाद ठरवण्यात आले आहे, महाराष्ट्र टाइम्सने ही बातमी दिली आहे.

फोटो स्रोत, Twitter
संदय राऊत यांना सरासरीपेक्षा एक मत कमी पडले. सुहास कांदेंचे मत बाद झाल्याचा फटका संजय राऊतांनाच बसला आहे.
भाजपने घेतलेल्या आक्षेपानंतर शिवसेनेचे आमदार सुहास कांदे यांचे मत बाद ठरवण्यात आले आहे. तर राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड, काँग्रेसच्या नेत्या यशोमती ठाकूर यांचे मत वैध धरण्यात आले आहे. तर महाविकास आघाडीने भाजपचे नेते सुधीर मुनगंटीवार आणि अपक्ष आमदार रवी राणा यांच्या मतावर आक्षेप घेतला होता.
3. मोहम्मद पैगंबर अवमानप्रकरणी निदर्शनांना हिंसक वळण
भाजपच्या निलंबित प्रवक्त्या नूपुर शर्मा आणि नवीन जिंदल यांनी प्रेषित मोहम्मद यांच्यावर केलेल्या आक्षेपार्ह शेरेबाजीच्या निषेधार्थ राजधानी दिल्ली, उत्तर प्रदेश, गुजरातसह अनेक राज्यांत शुक्रवारी निदर्शने करण्यात आली. पश्चिम बंगालमध्ये पोलिसाने केलेल्या गोळीबारात एक महिला ठार, तर दोनजण जखमी झाले. या घटनेनंतर गोळीबार करणाऱ्या पोलिसानेही डोक्यात गोळी झाडून आत्महत्या केली, लोकसत्ताने हे वृत्त दिले आहे.

फोटो स्रोत, ANI
उत्तर प्रदेशातील प्रयागराज, सहारणपूरसह अन्य चार शहरांमध्ये शुक्रवारच्या नमाजानंतर निदर्शने करण्यात आली. सहारणपूर आणि प्रयागराज शहरात पोलिसांवर दगडफेक करण्यात आली. पोलिसांनी सहा जिल्ह्यांतील शंभराहून अधिक निदर्शकांना अटक केली.
प्रयागराजमध्ये निदर्शकांनी काही वाहनांची जाळपोळ केली आणि पोलिसांची वाहनेही जाळण्याचा प्रयत्न केला. निदर्शकांना पांगवण्यासाठी पोलिसांनी लाठीमार आणि अश्रुधूराचा वापर केला.
4. मध्यप्रदेशच्या या खासदाराला मिळणार 15 हजार कोटींचा निधी, गडकरींनी घातली होती ही अट
केंद्रीय रस्ते व वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी उज्जैनमध्ये भाजपा खासदार अनिल फिरोजिया यांना वजन कमी करण्याचं आव्हान दिलं. तसेच त्यांनी कमी केलेल्या प्रत्येक एक किलो वजनामागे 1000 कोटी रुपये विकास निधी देण्याची घोषणा केली होती.

फोटो स्रोत, Getty Images
यानंतर खासदार फिरोजिया यांनी 4 महिन्यात 15 किलोग्रॅम वजन कमी केलं. त्यामुळे त्यांना गडकरींकडून 15,000 कोटी रुपयांचा निधी मिळणार आहे. नितीन गडकरी 24 फेब्रुवारीला उज्जैनला विकास कामांच्या उद्घाटनासाठी आले असताना वक्तव्य केलं होतं. गडकरींनी खासदार अनिल फिरोजिया यांना आव्हान दिलं त्यावेळी त्यांचं वजन 127 किलो होतं.
नितीन गडकरींनी आव्हान कमी होणाऱ्या प्रतिकिलो वजनामागे 1000 कोटी रुपयांचा विकास निधी देण्याचं कबूल केल्यानंतर अनिल फिरोजिया यांनी तातडीने व्यायामाला सुरुवात केली. खाण्याचे शौकीन असणाऱ्या फिरोजिया यांनी व्यायामासोबतच डायट देखील सुरू केला.
4 महिन्यांच्या सातत्यापूर्ण व्यायाम आणि आहाराच्या सतर्कतेनंतर आता फिरोजिया यांनी 15 किलो वजन कमी केलं. यासह ते 15,000 कोटी रुपये विकास निधी मिळवण्यास पात्र झाले आहेत. ही बातमी एनडीटीव्हीने दिली आहे.
5. कर्नाटकात भाजपचे तीन उमेदवार राज्यसभेवर
राज्यसभा निवडणुकीच्या निकालात कर्नाटकमधून भाजपसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. राज्यात भारतीय जनता पक्षाने 3 जागा जिंकल्या आहेत, तर काँग्रेसने 1 जागा जिंकली आहे. दुसरीकडे, जेडीएसच्या पदरी मात्र निराशा पडली आहे.
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन, लहारसिंग सिरोया आणि अभिनेता जग्गेश आता कर्नाटकातून भाजपचे राज्यसभा खासदार म्हणून निवडून आले आहेत. त्याचवेळी जयराम रमेश यांना राज्यसभेवर पाठवण्यात काँग्रेसला यश आले आहे. आज कर्नाटकात राज्यसभेच्या चार जागांसाठी मतदान पार पडले, ही बातमी सकाळने दिली आहे.
हे वाचलंत का?
- पहाटेच्या वेळी देवेंद्र फडणवीसांनी उद्धव ठाकरेंना पुन्हा धोबीपछाड कसं केलं?
- जिथे आमदारांना थांबवण्यात आलं आहे त्या हॉटेल्सचं एक दिवसाचं भाडं ऐकून थक्क व्हाल
- राज्यसभा खरंच पार्किंग स्लॉट झालीये का, या सभागृहाची आवश्यकता काय असते?
- पंकजा मुंडे, चित्रा वाघ यांना विधान परिषदेचं तिकीट नाकारण्याची 'ही' कारणं?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)








