स्विगीच्या कर्मचाऱ्याला मारहाण केल्याप्रकरणी ट्रॅफिक कॉन्स्टेबल निलंबित

तामिळनाडूच्या कोईम्बतूर शहरातील एका व्हीडिओची सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर चर्चा सुरू आहे.
या व्हीडिओत शहरातील एका पोलीस कर्मचारी फूड डिलिव्हरी एजंटवर हल्ला करत असताना कॅमेऱ्यात कैद झाला आहे. या प्रकरणाचा व्हीडिओ समोर आल्यानंतर सोशल मीडियावर अनेकांनी रोष व्यक्त केला आहे.
त्यानंतर संबंधित कर्मचाऱ्याला अटक करण्यात आली असून त्याला निलंबित करण्यात आलं आहे.
व्हीडिओ काय?
इंटरनेटवर फिरत असलेल्या या व्हीडिओमध्ये स्विगीचा टी-शर्ट घातलेल्या एका तरुणाला एक ट्रॅफिक कॉन्स्टेबल फुटपाथवर कानाखाली मारताना दिसत आहे. या व्हीडिओ क्लिपमध्ये पोलीस कर्मचारी डिलिव्हरी एजंटला दोनदा तोंडावर मारताना, त्याचा मोबाईल फोन हिसकावून घेताना दिसत आहे.
या घटनेचा व्हीडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर सिंगनाल्लूर पोलीस ठाण्याशी संलग्न असलेल्या कॉन्स्टेबल सतिश यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे.
व्हीडिओमध्ये कॉन्स्टेबल सतिश हे मोहनसमुद्रम या कर्मचाऱ्याला शिवीगाळ करताना आणि त्याला अनेक वेळा चपराक मारताना दिसत आहेत. मोहनसमुद्रम यांनी एका खासगी शाळेच्या बसच्या चालकाला निष्काळजीपणे चालवण्यापासून रोखण्याचा प्रयत्न केल्यानंतर शुक्रवारी, 3 जून रोजी ही घटना घडली आहे.

फोटो स्रोत, SOCIAL MEDIA
ही घटना तिथल्याच एका व्यक्तीने रेकॉर्ड केली आणि सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाली. त्यानंतर हा प्रकार ज्येष्ठ अधिकाऱ्यांच्या लक्षात आला.
38 वर्षीय मोहनसुंदरम गेल्या दोन वर्षांपासून फूड एग्रीगेटर स्विगीसोबत डिलिव्हरी पार्टनर म्हणून काम करत आहेत. शुक्रवारी संध्याकाळी मोहनसुंदरम यांनी सांगितलं की, एका खाजगी शाळेचा बस चालक बेदरकारपणे गाडी चालवताना दिसला.
काय घडलं?
द हिंदूशी बोलताना तो म्हणाला की, "या बसनं एका महिलेला धडक दिली - जी स्कूटरवर जात होती. तरीही बस थांबली नाही. मग मी आणि ज्यांनी ही घटना पाहिली त्या इतर वाहनधारकांनी बसच्या चालकाला जाब विचारण्यासाठी बस अडवली.
"लोक जमले तेव्हा एका पोलिसानं प्रश्न केला की मी या प्रकरणात हस्तक्षेप का केला आणि मला अनेक वेळा थप्पड लगावली. त्यानं माझा मोबाईल फोन, इअरफोन्स आणि माझ्या दुचाकीची चावीही काढून घेतली."
"नंतर मी माफी मागितली. कारण मी जेवणाची ऑर्डर देण्यासाठी जात होतो. माफी मागितल्यानंतर मला चावी परत करण्यात आली," तो पुढे म्हणाला.
सतिशने कथितरित्या मोहनसुंदरम यांना विचारलं की, "स्कूल बसचा मालक कोण आहे हे तुला माहीत आहे का आणि जर वाहनांची वाहतूक समस्या उद्भवली तर पोलीस त्याकडे लक्ष देतील, ते तुझं काम नाही."
या घटनेनंतर मोहनसमुद्रम यांनी सतिशविरोधात तक्रार दाखल केल्यानंतर त्यांच्यावर कारवाई करण्यात आली.
सोशल मीडियावर प्रतिक्रिया
हा व्हीडिओ व्हायरल झाल्यानंतर अनेकांनी सोशल मीडियीवर प्रतिक्रिया दिल्या.
We Love Covai नावाच्या ट्विटर हँडलनं लिहिलं,"हे काल संध्याकाळी फन मॉल सिग्नलवर घडलं. या डिलिव्हरी बॉयमुळे थोडा ट्रॅफिक ब्लॉक झाला. तेव्हा अचानक या पोलिसाने डिलिव्हरी करणार्याला मारहाण करण्यास सुरुवात केली".
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
X पोस्ट समाप्त, 1
सुरेश कुमार यांनी ट्विट केलंय की, "कोइम्बतूर शहर वाहतूक पोलिसांनी स्विगी डिलिव्हरी करणार्या व्यक्तीला कानाखाली मारली. काही पोलिसांच्या या अशा वर्तनामुळे संपूर्ण पोलिसांची वाईट प्रतिमा निर्माण होते."
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
X पोस्ट समाप्त, 2
मधू नावाच्या ट्विटर वापरकर्त्यांना म्हटलं, "खाजगी शाळेच्या बसने महिलेला धडक दिली. तेव्हा स्विगीचा कर्मचारी न्याय मागत असताना त्याच्यावर कोइम्बतूर येथे वाहतूक पोलिसाने हल्ला केला. भयानक कृत्य. तो एवढ्या वाईट पद्धतीने कसा मारहाण करू शकतो? हे अत्यंत निषेधार्ह आहे."
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
X पोस्ट समाप्त, 3
हे वाचलंत का?

YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)