नुपूर शर्मा प्रकरणी कतार, कुवैत आणि इराणचं भारतीय राजदुतांना समन्स, भारतानं म्हटलं...

फोटो स्रोत, Getty Images
भाजप नेत्यांनी पैगंबर मोहम्मद यांच्यासंबंधी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यानंतर कतार आणि कुवेतने रविवारी (5 जून) त्यांच्या देशातील भारतीय राजदूतांना बोलावून घेतलं आणि आपला निषेध व्यक्त केला.
कतारच्या परराष्ट्र मंत्रालयानं दोहा या ठिकाणी असलेले भारताचे राजदूत दीपक मित्तल यांना बोलावून घेतलं.
कतारचे परराष्ट्र मंत्री सुल्तान बिन साद अल-मुराइथी यांनी भारतीय राजदूतांना कतारच्या अधिकृत प्रतिक्रियेचं निवेदनच सोपवलं. मंत्रालयानं यासंबंधीची माहिती दिली आहे. या निवेदनात भाजपनं संबंधित नेत्यांवर केलेल्या कारवाईचं स्वागत करण्यात आलंय.
भारत सरकारकडून याप्रकरणी जाहीर माफी मागितली जाईल आणि अशाप्रकारच्या विधानांचा निषेध केला जाईल, अशी अपेक्षा असल्याचंही कतारकडून देण्यात आलेल्या निवेदनात म्हटलं आहे.
भारताचे उपराष्ट्रपती एम वैंकया नायडू सध्या कतार दौऱ्यावर आहेत. रविवारी (6 जून) त्यांनी कतारचे पंतप्रधान आणि गृहमंत्री शेख खालिद बिन खलिफा बिन अब्दुल अजीज अल-थानी यांच्यासोबत चर्चा केली.
कतारमधील भारतीय दूतावासाच्या प्रवक्त्यांनी स्पष्ट केलं की, अपमानास्पद विधानं करणाऱ्यांवर आधीच कठोर कारवाई करण्यात आली आहे.
पैगंबर मोहम्मद यांच्याविषयी भाजपा नेत्या नुपूर शर्मा यांच्या वादग्रस्त विधानानंतर कतारनं नाराजी व्यक्त केली होती, त्यावर दोह्यामधील भारतीय दूतावासाकडून प्रतिक्रिया व्यक्त करण्यात आली.
केवळ कतार आणि कुवेतच नाही तर नुपूर शर्मा यांच्या विधानानंतर ऑर्गनायझेशन ऑफ इस्लामिक कोऑपरेशननेही (OEC) आक्षेप घेतला आहे आणि भारतातील सत्ताधारी पक्षाशी संबंधित असलेल्या एका व्यक्तिनं केलेल्या वादग्रस्त विधानावर कठोर शब्दांत टीका केली आहे.
एकापाठोपाठ केलेल्या ट्वीट्समध्ये OECने म्हटलं की, भारतात मुस्लिमांविरोधात सुनियोजित पद्धतीने हिंसाचार वाढत आहे. त्यावर बंधनं लादली जात आहेत. OECने आपल्या ट्वीटमध्ये हिजाब बॅन आणि मुसलमानांच्या मालमत्तेच्या नुकसानासंबंधीच्या बातम्यांचाही उल्लेख केला.
OECने म्हटलं की, पैगंबर मोहम्मद यांच्या विरोधात वक्तव्यं करणाऱ्या आणि मुस्लिमांविरोधात हिंसाचार करणाऱ्यांविरोधात कारवाई केली जावी.
कतारच्या भारतीय दूतावासानं काय म्हटलं?
भारतीय दूतावासाच्या प्रवक्त्यांनी यासंदर्भात माध्यमांनी विचारलेल्या प्रश्नांचं उत्तर देताना म्हटलं, "दोन्ही देशाच्या राजदूतांदरम्यान बैठक झाली. या बैठकीत धार्मिक व्यक्किमत्त्वांवर भारतातील काही जणांकडून केल्या गेलेल्या आक्षेपार्ह ट्वीटसंबंधीही चिंता व्यक्त करण्यात आली.

फोटो स्रोत, Getty Images
भारतीय राजदूतांनी स्पष्ट केलं की, हे ट्वीट कोणत्याही पद्धतीने भारत सरकारच्या विचारांचं प्रतिनिधीत्व करत नाही. हे 'समाजविघातक तत्त्वां'चे विचार आहेत.
'आमचा सांस्कृतिक वारसा आणि विविधतेत एकता या परंपरेला अनुसरून भारत सरकार सर्व धर्मांचा सन्मान करतं. अपमानास्पद विधान करणाऱ्यांविरोधात आधीच कठोर कारवाई करण्यात आली आहे. भारत-कतारच्या संबंधाबद्दल गैरहेतू मनात असलेल्यांकडून या अपमानास्पद विधानांचा वापर लोकभावना भडकविण्यासाठी केला जात आहे,' असंही भारतीय दूतावासानं म्हटलं आहे.
नुपूर शर्मा यांच्यावर कारवाई
मोहम्मद पैगंबरांसंदर्भात आक्षेपार्ह उद्गारांप्रकरणी भाजपने नुपूर शर्मा यांना पक्षातून निलंबित केलं आहे. एका टेलिव्हिजन शो दरम्यान नुपुर यांनी हे उद्गार काढले होते. पीटीआयने दिलेल्या वृत्तानुसार भाजपने नुपुर शर्मा यांचं पक्षाचं प्राथमिक सदस्यत्व रद्द केलं आहे.

फोटो स्रोत, Getty Images
नुपुर शर्मा यांच्याव्यतिरिक्त भाजपने दिल्लीतील एक नेते नवीन कुमार जिंदाल यांचंही पक्षाचं प्राथमिक सदस्यत्व रद्द केलं आहे.
गेल्या महिन्यात नुपुर शर्मा टाईम्स नाऊ या वृत्तवाहिनीवर एका कार्यक्रमात पॅनेलिस्ट म्हणून सहभागी झाल्या होत्या. ज्ञानव्यापी मशिदीसंदर्भात या कार्यक्रमात चर्चा आयोजित करण्यात आली होती.
टीव्ही कार्यक्रमात नुपुर शर्मा मोहम्मद पैगंबरांबाबत असं काही बोलल्या की वादाला तोंड फुटलं. या उद्गारांसाठी नुपुर यांच्यावर कारवाईची मागणी समाजाच्या विविध स्तरातून करण्यात येत होती.
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
X पोस्ट समाप्त, 1
नुपुर यांचे कार्यक्रमातील उद्गार, पत्रकार आणि फॅक्ट चेकिंग वेबसाईट Alt newsचे सहसंस्थापक मोहम्मद जुबैर यांनी ट्वीटर अकाऊंटवरून शेअर केले. त्यांनी नुपुर यांच्यावर मोहम्मद पैगंबर यांच्याबाबत आक्षेपार्ह उद्गार काढल्याचा आरोप केला.
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
X पोस्ट समाप्त, 2
यानंतर नुपुर यांच्यावरील टीकेचा जोर वाढत गेला. भारतासह पाकिस्तानमध्येही नुपुर शर्मा यांच्यावर जोरदार टीका करण्यात आली.
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
X पोस्ट समाप्त, 3
हे सगळं सुरू असताना भाजप दिल्लीचे प्रवक्ते नवीन कुमार जिंदाल यांनी अल्पसंख्याक समाजासंदर्भात ट्वीट करून वादात भर घातली. या ट्वीटवरही जोरदार टीका झाली. जीवे मारण्याच्या धमक्या मिळत असल्याप्रकरणी जिंदाल यांनी दिल्ली पोलिसात तक्रार दाखल केली आहे.
भाजपने दिली प्रतिक्रिया
भारतीय जनता पक्षाने रविवारी दुपारी या प्रकरणावर पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिली आहे.
भाजपच्या दोन प्रवक्त्यांनी पैगंबर मोहम्मद यांच्या विरोधात केलेल्या वक्तव्यामुळे वाद निर्माण झाला. यावर भाजप सर्व धर्मांचा आदर करीत असून कोणत्याही धार्मिक महापुरुषाचा अपमान हा निषेधार्ह असल्याचं भाजपने म्हटलं आहे.
भाजपच्या प्रवक्त्या नुपूर शर्मा आणि नवीन कुमार जिंदाल यांनी पैगंबर मोहम्मद यांच्यावर केलेल्या वक्तव्यावरून निर्माण झालेल्या वादावर भाजपचे सरचिटणीस अरुण सिंग म्हणाले की, त्यांचा पक्ष कोणत्याही पंथाचा किंवा धर्माचा अपमान करणाऱ्या कोणत्याही विचारसरणीच्या विरोधात आहे.
पीटीआय या वृत्तसंस्थेनुसार, अरुण सिंह म्हणाले, "भारताच्या हजारो वर्षांच्या इतिहासात अनेक धर्म उदयास आले. भारतीय जनता पक्ष प्रत्येक धर्माचा आदर करतो. भारतीय संविधानाने नागरिकांना कोणत्याही धर्माचे पालन करण्याचे स्वातंत्र्य दिले आहे. सर्वांचा आदर आणि सन्मान करण्याचा अधिकारही दिला आहे."
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
X पोस्ट समाप्त, 4
नुपूर शर्मांच्या वक्तव्यावरून निर्माण झालेल्या वादाचा थेट उल्लेख भाजपने केला नसला तरी वृत्तसंस्था पीटीआय आणि एएनआयने दिलेल्या बातमीनुसार पक्षाने नुपूर शर्मा यांचं प्राथमिक सदस्यत्व रद्द केलं आहे. तर नवीन जिंदाल यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे.
या प्रकरणावर सौदीतले लोक काय म्हणतायत?
आपल्या ट्विटर हँडलवर नुपूर शर्माचं वक्तव्य शेअर करणारे मोहम्मद जुबेर यांनी रविवारी पुन्हा एक ट्विट शेअर केलं आहे. ते म्हणतात, कतार, ओमान, सौदी अरेबिया आणि इजिप्त या मध्य पूर्व देशांमध्ये ही घटना सोशल मीडियावर ट्रेंड करत आहे.
मुहम्मद मक्की नावाच्या एका ट्विटर युजरने लिहिलंय की, "मुहम्मद पैगंबर यांचा आणखी एक अपमान, अल्लाह यावर शांतता कायम ठेवेल. लोकांकडून इतक्या तिखट प्रतिक्रिया आल्या असत्या तर इतर कोणी हिम्मत ही केली नसती! परंतु दुर्दैवाने या प्रतिक्रिया ही पुरेशा नाहीत."

फोटो स्रोत, Twitter
त्याचवेळी रेहान लिहितात की, "भाजपच्या प्रवक्त्यांचं ट्वीट मागच्या काही तासांपासून सौदी अरेबियामध्ये टॉप ट्रेंडवर आहे. भारतात मुस्लिम आणि इस्लामविरोधात जे गुन्हे घडत आहेत त्याकडे जगाने लक्ष दयायला हवं."
तर युजर जहानजेब लिहितात की, "मोदींच्या भारतात मुस्लिमांविरुद्ध द्वेष आणि हिंसाचार एक आवश्यक गोष्ट बनली आहे. त्यांच्या सरकारने केलेल्या निंदेवर कठोर कारवाईची गरज आहे. मुस्लिमांनी यावर त्वरित बहिष्कार टाकावा."
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
X पोस्ट समाप्त, 5
स्वतःची डॉक्टर अशी ओळख करून देणारे सफीउल्ला सिद्दीकी लिहितात, "आमच्या प्रिय, आदरणीय, अल्लाहच्या आणि शेवटच्या पैगंबराचा अनादर करणाऱ्या सर्वांचा कायमचा अंत करण्याची ताकद अरब राष्ट्रातील सर्व मुस्लिमांमध्ये आहे.
भारतात होतेय अटकेची मागणी
मुस्लिम सामाजिक संस्था रझा अकादमीने नुपूर शर्मांच्या कथित वादग्रस्त वक्तव्यावर, 28 मे 2022 रोजी ट्विट करून त्यांना अटक करण्यासाठी मोहीम सुरू केली होती.
त्यांनी #ArrestNupurSharma हा हॅशटॅग चालवला होता. तसेच लोकांना या हॅशटॅगसह जास्तीत जास्त संख्येने आपला निषेध नोंदवावा असं ही आवाहन केलं होतं.
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
X पोस्ट समाप्त, 6
"पैगंबरांचा अपमान करणाऱ्या नुपूर शर्माला अटक करा," अशा आशयाचं ट्वीट त्यांनी केलं होतं
यासोबतच रझा अकादमीने भाजपच्या प्रवक्त्या नुपूर शर्मा यांच्याविरुद्ध मुंबईत आयपीसीच्या कलम 153 ए, 295 ए आणि 505 (2) या कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे.
रझा अकादमीनेही यासंदर्भात ट्विट करून माहिती दिली आहे. त्यांनी केलेल्या ट्वीटनुसार, "रझा अकादमीने 'वादग्रस्त वक्तव्या' प्रकरणी भाजपच्या प्रवक्त्या नुपूर शर्मा यांच्या विरोधात मुंबईच्या पोलिस आयुक्तांकडे औपचारिक तक्रार दिली आहे. रझा अकादमीच्या तक्रारीनंतर पोलिस आयुक्तांनी तातडीने एफआयआर नोंदवण्याचे आदेश दिले. आता या प्रकरणी एफआयआर नोंदवण्यात आली आहे."
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
X पोस्ट समाप्त, 7
याशिवाय महाराष्ट्रातील टिपू सुलतान पार्टीने ट्विट करून नुपूर शर्मा यांच्यावर गुन्हा नोंद करण्यात आल्याची माहिती दिली आहे.
पाकिस्तानात ही गोंधळ
नुपूर शर्मा यांनी अटक करावी अशी मागणी पाकिस्तानातून ही सुरू आहे. पाकिस्तानमध्येही #ArrestNupurSharma हा हॅशटॅग वापरून ट्विट करत होते. हा हॅशटॅग तिथं दोन दिवस टॉप ट्रेंड मध्ये होता.
जहांगीर खान नावाचे ट्विटर युजर ट्विट करतात की, "या इस्लामोफोबिक महिलेला अटक करावी. तिने आमच्या पैगंबराचा अपमान केला आहे. सर्व मुस्लिम देशांनी भारतावर बहिष्कार टाकावा."
त्याचवेळी आसिफ नावाचे युजरने ट्विट करतात की, "अभिव्यक्ती स्वातंत्र्यात हा अधिकार येत नाही. भारतातील सत्ताधारी पक्षाच्या प्रवक्त्याने थेट प्रेषित मुहम्मद यांचा अपमान केला आहे. हे विधान करून त्यांनी जगभरातील मुस्लिमांच्या भावनेची चेष्टा केली आहे."
जीवे मारण्याच्या धमक्या येत असल्याचं नूपुर सांगतात. नुपूर शर्मा म्हणतात की त्यांच्या विधानाचा विपर्यास करण्यात आला आहे. जेव्हा पासून हे प्रकरण सुरू झालंय त्यांना आणि त्यांच्या कुटुंबाला इस्लामिक कट्टरपंथीयांकडून जीवे मारण्याच्या धमक्या येत आहेत.
त्या ट्विटरवर लिहितात की, "मला आणि माझ्या कुटुंबाला सतत जीवे मारण्याच्या, शिरच्छेदाच्या धमक्या येत आहेत. हे सर्व @zoo_bear (मुहम्मद झुबेरचं ट्विटर अकाउंट) च्या जातीय भावना भडकवण्याच्या आणि खोटी कहाण्या रचून वातावरण खराब करण्याच्या प्रयत्नांमुळे सुरू झालं आहे. मी इथे काही फोटो टाकत आहे. कृपया नोंद घ्या."
एएनआय या वृत्तसंस्थेशी बोलताना नुपूर शर्मा यांनी दावा केला होता की, "स्वत:ला फॅक्ट चेकर म्हणवून घेणाऱ्या मोहम्मद जुबेरने माझ्या एका टीव्ही डिबेटचा व्हिडिओ मनमानी पद्धतीने एडिट करून माझ्याविरुद्ध वातावरण निर्माण केलं आहे. तेव्हापासून माझ्या कुटुंबीयांना जीवे मारण्याच्या आणि बलात्काराच्या धमक्या मिळत आहेत."
नुपूर शर्मा कोण आहेत?
नुपूर शर्मा या भारतीय जनता पक्षाच्या राष्ट्रीय प्रवक्त्या आहेत. 2015 च्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी दिल्लीचे विद्यमान मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्याविरुद्ध नवी दिल्ली मतदारसंघातून निवडणूक लढवली होती. मात्र, त्यांना निवडणूकीत यश मिळालं नाही. मोठ्या फरकानं त्यांचा पराभव झाला. नुपूर दिल्ली भाजपच्या प्रदेश कार्यकारिणीच्या सदस्याही आहेत.
नुपूर शर्मा या भारतीय जनता युवा मोर्चाच्या सदस्य होत्या.
नुपूर शर्मा यांचा जन्म 23 एप्रिल 1985 रोजी झाला. दिल्लीच्या मथुरा रोड येथील दिल्ली पब्लिक स्कूलमधून त्यांनी आपलं शालेय शिक्षण पूर्ण केलं आहे. त्यांनी दिल्लीतील हिंदू कॉलेजमधून पदवी शिक्षण पूर्ण केलं. त्या इकॉनॉमिक ऑनर्समध्ये पदवीधर आहे. 2010 मध्ये त्यांनी दिल्लीच्या लॉ फॅकल्टीमधून एलएलबी पदवी पूर्ण केली.
त्यांनी लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समधून एलएलएम पूर्ण केलं. त्यांच्या कुटुंबाला राजकीय आणि व्यावसायिक पार्श्वभूमी आहे.
नुपूर शर्मा कॉलेजमध्ये असल्यापासून राजकारणात सक्रिय आहेत. अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या तिकिटावर निवडणूक लढवून त्या DUSU (दिल्ली विद्यापीठ विद्यार्थी संघ) च्या अध्यक्षा झाल्या. त्यानंतर त्या राष्ट्रीय पातळीवरील राजकारणात सक्रिय झाल्या.
त्यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात भाजपमधून केली. त्यांनी आजवर विविध पदांवर काम केलं आहे.
हे वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)