शौचाला जाण्याची इच्छा दाबून ठेवलीत तर 'हे' परिणाम होऊ शकतात

फोटो स्रोत, Getty Images
तुम्ही कितीदा शौचाला जाता असा प्रश्न तुम्ही गुगलवर टाकला तर त्याचे वेगवेगळे उत्तरं येतात. दिवसातून तीनदा ते तीन दिवसांतून एकदा असे काहीही उत्तरं येऊ शकतात.
पण यात एक उत्तर नसतं. ते म्हणजे, जेव्हा जायचा 'प्रसंग' येतो तेव्हा. आता हे अगदी साहजिक आहे. पण अनेकदा लोक शौचाला जाणंही टाळतात. असं करणं आरोग्याला अतिशय हानिकारक ठरू शकतं. असं केल्यास आतड्याचा कॅन्सर, मुळव्याध, फिशर, आणि आतड्याच्या आत छोटे छोटे पॉकेट्स तयार होणं असे परिणाम होऊ शकतात.
त्यामुळे जेव्हा जेव्हा शौचाला जायची वेळ येईल तेव्हा तेव्हा लगेच जाणं हा उत्तम उपाय आहे.
20 व्या शतकाच्या सुरुवातीला तज्ज्ञांच्या असं लक्षात आलं की खाण्यामुळे आतडे उघडण्यासाठी चालना मिळते. त्याला Gastrolic reflex असं म्हणतात. ही क्रिया विशेषत: उपास आणि नाश्ता केल्यानंतर वेगाने घडते.
लहान मुलांना शौचाला जाण्याची इच्छा निर्माण झाली की ते त्यांचं पोट साफ करतात. त्यासाठी त्यांना फारसे वेगळे प्रयत्न करण्याची गरज नसते. मात्र त्यावर नियंत्रण मिळवण्याच्या वयात ते आले, म्हणजेच जेव्हा ते चालायला लागतात तेव्हा शौचाला जायला टाळणं सुरू होतं.
आतड्यांवर किंवा एकूणच पचनसंस्थेवर ताबा मिळवणं हा माणसाच्या उत्क्रांतीतली महत्त्वाची प्रक्रिया आहे. मात्र काही लोक त्यावर अतीच नियंत्रण मिळवतात. अनेकदा आपल्या जायचं असलं तरी उगाच टाळतो असं लक्षात आलं कारण ती वेळ योग्य नसते असं वाटतं.
मात्र ही उर्मी दाबून ठेवण्याची अनेक कारणं दिसून येतात.
-बद्धकोष्ठता
-पोटात वेदना,
-शौचास जाण्याच्या अनियमित सवयी
-सूज
-गॅसेस
-आतड्यांपासून मलाच्या निर्मितीचा कमी वेग.
मल बाहेर जाण्याचा वेग समजून घ्या
आपण कितीदा शौचाला जातो याची आपल्याला कल्पना असते. मात्र मल शरीरातून बाहेर जाण्यासाठी किती वेळ लागतो हे समजून घेणं सुद्धा तितकंच गरजेचं आहे.
म्हणजेच आपण जेवल्यापासून मल बाहेर जाण्याची प्रकिया आणि त्या प्रकियेला लागणारा वेळ समजून घेणं गरजेचं आहे.
हा वेळ अतिशय महत्त्वाचा आहे. कारण कधीही अचानक शौचास जाण्याची इच्छा निर्माण होणं, डायरिया, बद्धकोष्ठ ही लक्षणं मल बाहेर जाण्याच्या वेळेत काहीतरी गडबड असल्याची लक्षणं आहेत.
हे मोजण्याची एक सोपी पद्धत आहे. एखादा मक्याचा तुकडा गिळा आणि दुसऱ्या दिवशी विष्ठेत तो शोधा.
तो दिसायला किती वेळ लागतो? हा वेळ आठ ते 24 तास कितीही असू शकतो.
कमी वेग
तुम्हाला जेव्हा जेव्हा शौचाला जायची इच्छा होईल तेव्हा जा असं कोणीही म्हणत नाही. मात्र प्रत्येकाला त्यांची पोट साफ होण्याची वेळ माहिती असते.
म्हणून शौचाला जाण्यास चालढकल करू नये. कारण असं केल्यास तुम्ही खालेल्या अन्नातून तयार झालेलं मल एका विशिष्ट वेळेपेक्षा शरीरात जास्त काळ राहतं.
हा वेळ वाढला, की तुमच्या अडचणीत वाढ झाली म्हणूनच समजा.
माणसाच्या संपूर्ण आयुष्यात सरासरी सहा टन मल निर्माण होतं. मलात पाणी, जीवाणू, कर्बोदकं, न पचलेले वनस्पतीजन्य पदार्थ, आणि फॅट्स असतात.

फोटो स्रोत, Getty Images
हे सगळं आपल्या पोटात जास्त काळ राहिलं तर ते आंबतात आणि कुजायला सुरुवात होते.
त्याने गॅसेस तर होतातच, मात्र मेटाबोलाईट नावाचं रसायनही तयार होतं. हे रसायन आतड्च्या भिंतीच्या संपर्कात येतं आणि ती भिंत हे रसायन शोषून घेते.
कमी वेग असल्यास संभावित धोके
मोठ्या आतड्यात आपोआप विष तयार होणं फारसं नवीन नाही.
अगदी ग्रीक लोकांच्या काळापासून आतड्यात तयार होणाऱ्या मलामुळे शरीरातल्या रक्त, पिवळं पित्त, काळं पित्त, अशा रसायनांचं असंतुलन झाल्याचं लक्षात आलं आहे. ही सगळी रसायनं उत्तम आरोग्यासाठी गरजेची असतात.
केलॉग ने 19 व्या शतकात सिरल्सची निर्मिती केली होती. या सिरल्समुळे बद्धकोष्ठ कमी होतं असा त्यांचा दावा होता. कारण शौचास जाण्याचा आणि भावनांचा संबंध असतो हे कोणीही मान्य करेल.

फोटो स्रोत, Getty Images
जर मल बाहेर निघायला वेळ लागला तर अनेक आजार होण्याची शक्यता असते. त्यात आतड्यांचा कॅन्सर, पित्ताशयात खडे, मूळव्याध असे अनेक आजार होण्याची शक्यता असते.
पोटात असलेल्या जीवाणूंच्या संख्येत असंतुलन झाल्यामुळेसुद्धा मल बाहेर जाण्यास जास्त वेळ लागू शकतो असंही एका संशोधनात समोर आलं आहे.
हे कसं टाळावं?
आहारात जास्तीत जास्त फायबर आणि द्रव पदार्थांचा वापर वाढवावा. आतड्यांची काळजी घ्यावी आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जेव्हा जेव्हा हाक येईल तेव्हा ती योग्य प्रकारे ऐकावी.
हे वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)








