सोनू बिहारः पैसे नकोत सर...फक्त... बिहारी मुलाच्या धाडसामुळे नितिशकुमार प्रभावित

फोटो स्रोत, ANI
बिहारसारख्या मोठ्या आकाराच्या लोकसंख्येच्या राज्याचे मुख्यमंत्री.... तेही राजकारणात स्वतःला सिद्ध करणारे, आयआयटी पदवीधर वेगवेगळ्या जबाबदाऱ्या पार पाडून मुख्यमंत्री झालेले नितिश कुमार.
एरव्ही एखाद्या ओळख असलेल्या व्यक्तीलाही मुख्यमंत्रिपदावरच्या व्यक्तीला दडपून जायला होईल. पण बिहार राज्यातल्या नालंदा जिल्ह्यातल्या सोनू नावाच्या मुलाने त्यांच्यासह सगळ्यांना चकीत केलं.
मुख्यमंत्री नितिश कुमार नेहमीसारखेच त्यांच्या कार्यकर्त्यांच्या, पोलिसांच्या, सुरक्षारक्षकांच्या गराड्यात होते. तेवढ्यात एका लहान मुलाचा आवाज आला सर सुनिए ना... सर परणाम सर... दोन्ही हात जोडून सोनू मुख्यमंत्र्यांना विनवत होता, "सर हमको पढाई के लिए हिंमत दे दिजिए... हमको गार्डियन नही पढाना चाहते..."
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त, 1
तो मुख्यमंत्र्यांना इतकंच सांगून थांबला नाही तर आपले वडील दारू पित असल्याचंही त्याने सांगितलं. कदाचित मुख्यमंत्री नितिश कुमार यांना हा दुसरा धक्का असावा कारण बिहारमध्ये दारूबंदी असूनही या मुलाचे वडील दारू मिळवून पीत आहेत.
यावेळेस मुख्यमंत्री नितिश कुमार यांच्यासह त्यांचे अधिकारी, सुरक्षारक्षक त्याच्याकडे कौतुकाने पाहात होते.
या घटनेनंतर नालंदा जिल्ह्यातल्या नीमाकोल गावातला हा सोनू चांगलाच प्रसिद्ध झाला आहे. बीबीसीनं त्याच्याशी बोलून त्याला मोठेपणी काय करायचं आहे असं विचारलं, त्यावर त्याने अत्यंत शांतपणे आणि अगदी सुस्पष्ट उत्तरे दिली.
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त, 2
आपल्याला मोठं होऊन आयएएस व्हायचं आहे त्यासाठी शिक्षण घ्यायचं आहे. आजवर आपल्याला अंगणवाडीत, शाळेत दहाच्या पुढे पाढेही शिकवले गेले नाहीत, आपण स्वतः पुढचे पाढे आणि इतर गोष्टी आत्मसात केल्याचं तो सांगतो.
त्याचप्रमाणे आपल्याला सैनिक स्कूलमध्ये प्रवेश मिळण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी पूर्ण ताकद लावावी असंही तो सांगतो. आपल्याला मदतनिधी नको. हा निधी घरातील गोष्टींसाठी सहज खर्च होऊन जाईल. पैसे नकोत फक्त सैनिकी शाळेत प्रवेश द्या अशी तो विनंती करतो.
हम किसीके अंडर काम नही करेंगे
मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर सोनू बिहारमध्ये चांगलाच प्रसिद्ध झाला आहे. बिहारमधील अनेक नेते त्याच्याशी संपर्क करत आहेत. बिहारचे माजी मंत्री आणि लालू प्रसाद यादव यांचे पुत्र तेज प्रताप यादव यांनी त्याच्याशी व्हीडिओ कॉलवर बोलण्याचा प्रयत्न केला. तुला पुढे काय व्हायचे आहे असं विचारल्यावर त्याने आपल्याला आयएएस व्हायचंय असं सांगितलं.

त्यानंतर तेजप्रताप यादव यांनी त्यापेक्षा आपलं सरकार आल्यावर माझ्या हाताखाली काम कर असं सुचवलं, त्यावर सोनूने तात्काळ 'हम किसीके अंडर काम नही करेंगे' असं उत्तर दिलं. या अचानक आलेल्या उत्तरानंतर तेजप्रताप यादव यांनी सरळ फोनच बंद करुन टाकला. आता या फोनमुळे सोनू आणखीच चर्चेत आला आहे.
हेही वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त, 3
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)