MPSC: टॉपर प्रमोद चौगुले म्हणतो, 'पूर आणि कोरोनातही मी अभ्यास करणं सोडलं नाही'

2015 पासून त्यांनी स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करायला सुरुवात केली. यशा अपयशांच्या अनेक फेऱ्यानंतर अखेर यावर्षी त्यांना यश मिळालं आहे. गेल्या परीक्षेत त्यांचा क्रमांक एक मार्काने हुकला होता. आता ते थेट राज्यातून पहिले आले आहेत.
हा प्रवास नक्कीच सोपा नव्हतं असं ते सांगतात. कोरोना काळात सांगलीत पूर आला होता. तेव्हाच त्यांच्या घरचे सगळे कोरोना पॉझिटिव्ह आले होते. प्रमोद एकटे अभ्यास करत होतो. अशा बिकट परिस्थितीत मार्ग काढून त्यांनी हे यश मिळवलं आहे.
या प्रवासात अनेकदा त्यांना सगळं सोडून द्यावंसं वाटलं. मात्र त्यांनी हिंमत सोडली नाही. घरच्यांनी त्यांनी खूप पाठिंबा दिला. स्वत:पेक्षा घरच्यांच त्यांना जास्त पाठिंबा होता.
घरच्यांनीही माझ्या निराशेच्या सुरात सूर मिसळले असते तर आज हा दिवस पहायल मिळाला नसता असं ते सांगतात.
आज लागला निकाल
राज्यसेवा मुख्य परीक्षा 2020 चा निकाल आज जाहीर झाला आहे. त्यात प्रमोद चौगुले राज्यात पहिला आला आहे. तर मुलींमधून रुपाली माने हिने प्रथम क्रमांक पटकावला आहे
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून डिसेंबर 2019 मध्ये 200 पदांसाठीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती. कोरोनामुळे ही परीक्षा चार वेळा पुढे ढकलण्यात आली होती.
मार्च 2021 मध्ये पूर्व परीक्षा झाली. त्यात 2 लाख 62 हजार उमेदवारांनी नोंदणी केली. तर 1 लाख 71 हजार लोकांनी प्रत्यक्ष परीक्षा दिली.
पूर्व परीक्षेचा निकास सप्टेंबर 2021 मध्ये जाहीर झाला. 3 हजारापेक्षा मुख्य परीक्षेसाठी निवड झाली. 18 ते 29 एप्रिल दरम्यान मुलाखती झाल्या होत्या. प्रमोद चौगुले मुळचे सांगलीचे. त्यांचं शिक्षण नवोदय विद्यालयातून झालं आहे. त्यानंतर त्यांनी सांगलीच्या वालचंद कॉलेजमधून इंजिनिअरिंगचं शिक्षण घेतलं. त्यानंतर ते भारत पेट्रोलियममध्ये कामाला होते.
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून डिसेंबर 2019 मध्ये 200 पदांसाठीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती. कोरोनामुळे ही परीक्षा चार वेळा पुढे ढकलण्यात आली होती.
मार्च 2021 मध्ये पूर्व परीक्षा झाली. त्यात 2 लाख 62 हजार उमेदवारांनी नोंदणी केली. तर 1 लाख 71 हजार लोकांनी प्रत्यक्ष परीक्षा दिली.
पूर्व परीक्षेचा निकास सप्टेंबर 2021 मध्ये जाहीर झाला. 3 हजारापेक्षा मुख्य परीक्षेसाठी निवड झाली. 18 ते 29 एप्रिल दरम्यान मुलाखती झाल्या होत्या. राज्यसेवा मुख्य परीक्षा 2020 चा निकाल आज जाहीर झाला आहे. त्यात प्रमोद चौगुले राज्यात पहिला आला आहे. तर मुलींमधून रुपाली माने हिने प्रथम क्रमांक पटकावला आहे.
हे वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)








