हसन मुश्रीफ-समरजीत घाटगे : 'रामा'च्या नावावरून कोल्हापुरात राजकारण का तापलंय?

हसन मुश्रीफ

फोटो स्रोत, Facebook

महाराष्ट्रात सध्या मशिदींवरील भोंगे आणि हनुमान चालिसावरून वाद सुरू असतानाच, कोल्हापुरात नाव वाद पेटला आहे. महाराष्ट्राचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्या नावात श्रीरामाचं नाव घातल्यावरून कोल्हापुरात या नव्या वादाला सुरुवात झाली.

यावरून कागलचे भाजप नेते समरजित घाटगे यांनी हसन मुश्रीफ यांच्यावर जोरदार टीका केली आहे.

तसंच, हा संपूर्ण प्रकार निंदनीय असून पोलिसात तक्रार दाखल करणार असल्याचं ही त्यांनी यावेळी सांगितलं आहे.

नेमकं घडलं काय?

10 एप्रिलला देशभरात रामनवमी साजरी करण्यात आली. याच दिवशी ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांचा वाढदिवसदेखील होता. त्यांच्या वाढदिवसानिमित्त अनेक कार्यकर्त्यांनी पोस्टरच्या माध्यमातून तसेच वर्तमानपत्रातील जाहिरातींच्या माध्यमातून मुश्रीफ यांना शुभेच्छा दिल्या होत्या.

या वाढदिवसाच्या शुभेच्छांच्या निमित्ताने कोल्हापूर दूध उत्पादक संघाच्या वतीने तयार करण्यात आलेल्या पोस्टरवर हसन मुश्रीफ यांचे नाव श्रीरामांसोबत जोडले होतं आणि नवमीच्याही शुभेच्छा देण्यात आल्या होत्या.

यावरून भाजप नेते समरजीत घाटगे यांनी त्यांच्यावर टीका केली आहे. हसन मुश्रीफ स्वत:ला रामाच्या बरोबर समजू लागले आहे का? असा सवाल घाटगे यांनी केला आहे. तसेच प्रभू श्री रामाचा एकेरी उल्लेख करत हसन मुश्रीफ यांनी बहुजन समाजाच्या श्रद्धेचा अपमान केला आहे. त्यामुळे आपण ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफांविरोधात मोर्चा काढणार असून पोलिसांत तक्रारदेखील दाखल करणार असल्याचे त्यांनी म्हटलं आहे. या मोर्चात भाजप कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी आहेत.

'रामनवमीला वाढदिवस साजरा केल्यानं पोटात दुखतंय'

दुसरीकडे ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांनी या पोस्टरबद्दल आपल्याला माहिती नसल्याचं सांगितलंय.

हसन मुश्रीफ

फोटो स्रोत, Facebook/Hasan Mushrif

फोटो कॅप्शन, हसन मुश्रीफ

हसन मुश्रीफ म्हणाले, "समरजीत घाटगे अडीच वर्षे अज्ञातवासात असल्यामुळे लोकांच्या समोर येण्यासाठी त्यांना संधी पाहिजे आहे. मुळात रामनवमीला वाढदिवस साजरा केल्यानं यांच्या पोटात दुखतंय."

"ही गोकुळच्या संचालकांनी दिलेली जाहिरात आहे. या जाहिरातीसोबत माझा काही संबंध नाही. कदाचित माझ्या प्रेमापोटी जाहिरात दिली असावी. लोकांनी मोठ्या मोठ्या जाहिराती दिल्यात म्हणून त्यांची असूया असावी, द्वेष असावा, त्या न झेपल्यामुळे त्यांनी ही स्टंटबाजी केलीय," असंही मुश्रीफ म्हणाले.

"आणि वास्तविक माझ्यावर गुन्हा कशासाठी नोंदवायचा आहे? कुणीतरी त्यांना उचकवलेले आहे. त्यामुळे ते अशापद्धतीने धाडस करतायत, हे धाडस त्यांना पुढच्या काळात महागात पडणार आहे," असा इशाराही मुश्रिफांनी दिला.

हेही वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)