युक्रेन-रशिया: प्रियंका चतुर्वेदी कडाडल्या, 'भारतीयांच्या निष्ठेवर कधी शंका घेऊ नका'

प्रियंका चतुर्वेदी

फोटो स्रोत, Getty Images

युक्रेनमधून आतापर्यंत सहा विमानांद्वारे 1400 भारतीय नागरिकांना मायदेशी आणल्याची माहिती भारताच्या परराष्ट्र मंत्रालयानं सोमवारी (28 फेब्रुवारी) दिली.

परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अरिंदम बागचींनी सोमवारी संध्याकाळी पत्रकार परिषदेदरम्यान सांगितलं की, चार विमानं बुखारेस्ट (रोमानिया) आणि दोन विमानं बुडापेस्ट (हंगेरी) इथून भारतात आली.

यावेळी त्यांनी सांगितलं की, "युक्रेनमधून भारतीयांना बाहेर काढण्यासाठीची परिस्थिती अत्यंत कठीण आणि अडचणीची आहे. मात्र, तरीही या प्रक्रियेत वेग आणला जात आहे. भारतानं 8,000 भारतीय युक्रेनमध्ये होते."

मात्र, भारत सरकारच्या प्रयत्नांवर शिवसेनेच्या राज्यसभेतील खासदार प्रियंका चतुर्वेदींनी प्रश्न उपस्थित केले आहेत. प्रियंका चतुर्वेदींनी उपस्थित केलेल्या या प्रश्नावर पोलंडच्या राजदूतांनी उत्तर दिलं.

प्रियंका चतुर्वेदी आणि पोलंडच्या राजदूतांमध्ये ट्विटरवरच तू-तू-मैं-मैं सुरू झालं.

प्रियंका चतुर्वेदी आणि भारतातील पोलंडच्या राजदूतांमध्ये नेमका काय वाद झाला?

युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीय विद्यार्थ्यांच्या मुद्द्यावरून सध्या मोठ्या प्रमाणात चर्चा सुरू आहे. यावरून सोमवारी संध्याकाळी प्रियंका चतुर्वेदी आणि भारतातील पोलंडचे राजदूत अॅडम बुराकोव्स्की यांच्यात ट्विटरवर वाद झाला.

प्रियंका चतुर्वेदी

फोटो स्रोत, Getty Images

युक्रेनमध्ये अडकलेल्या विद्यार्थ्यांचा मुद्दा प्रियंका चतुर्वेदी ट्विटरवरून मांडत होत्या. मात्र, त्यांनी सोमवारी संध्याकाळी पाच वाजण्याच्या सुमारास पोलंड आणि लिथुआनियाचं दूतावास, तसंच भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाला टॅग करून ट्वीट केलं.

यात प्रियंका चतुर्वेदींनी म्हटलं की, "नमस्कार @IndiaInPoland, अनेक भारतीय विद्यार्थ्यांना पोलंडमध्ये प्रवेश करण्यापासून रोखण्यात आलं. रविवारी काही विद्यार्थ्यांना परवानगी देण्यात आली होती, त्यांना परत पाठवण्यात आलं. परिणामी त्यांचे कुटुंबीय घाबरले. ऑपरेशन गंग (युक्रेनमधून भारतीयांना मायदेशी आणण्याचं अभियान) आणि भारतीय परराष्ट्र मंत्रालयाला विनंती करते की, यात लक्ष घालावं."

X पोस्टवरून पुढे जा, 1
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

X पोस्ट समाप्त, 1

त्यानंतर भारतातील पोलंडचे राजदूत अॅडम बुराकोव्स्कींनी प्रियंका चतुर्वेदींच्या ट्वीटला उत्तर देत म्हटलं की, हे आरोप अजिबात खरे नाहीत.

बुराकोव्स्कींनी उत्तरात म्हटलं की, "मॅडम, हे अजिबात खरं नाहीय. पोलंडच्या सरकारनं युक्रेनच्या सीमेवरून प्रवेश करण्यास कुणालाही रोखलं नाही. कृपया, तुम्ही तुमच्या सूत्रांकडून पुन्हा तपासून घ्या. कृपया, चुकीच्या बातम्या पसरवू नका."

X पोस्टवरून पुढे जा, 2
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

X पोस्ट समाप्त, 2

मात्र, हा वाद इथेच थांबला नाही. रात्री सुमारे 10.45 वाजण्याच्या सुमारास प्रियंका चतुर्वेदींनी आणखी एक ट्वीट केलं. त्यात त्यांनी बुरोकोव्स्की, लिथुआनियाचं दूतावास, ऑपरेशन गंगा आणि भारतीय परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अरिंदम बागचींनाही टॅग केलं.

या ट्वीटमध्ये प्रियंका चतुर्वेदींनी लिहिलं की, "सर, पूर्ण आदरानं हे सांगतेय की, तुम्ही जे म्हणताय, ते विद्यार्थी सांगत नाहीत. हे दुर्दैवी आहे की, या गोष्टीला तुम्ही फेक न्यूज म्हणताय. मात्र, तिथं अडकलेल्या लोकांचे नाव आणि नंबर शेअर करताना आनंद होईल. जर एखाद्या माहितीला खोटं ठरवण्याआधी ती नीट तपासली असतीत तर बरं झालं असतं. धन्यवाद."

यावर पोलंडचे राजदूत बुराकोव्स्कींनी म्हटलं की, "मॅडम, मदतीसाठी मी कायम तयार आहे. मी माझा संपर्क क्रमांक पाठवतो, मात्र मला थेट मेसेज पाठवा."

X पोस्टवरून पुढे जा, 3
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

X पोस्ट समाप्त, 3

त्यानंतर प्रियंका चतुर्वेदींनी आणखी एक ट्वीट केलं, त्यात त्या म्हणाल्या, "नाही, मी तुम्हाला थेट मेसेज करणार नाही. पोलंडच्या दूतावासाकडे मदतीची याचना करणाऱ्या माझ्या ट्वीटला तुम्ही खोटं ठरवलंत. माझा नंबर आणि कॉन्टॅक्ट डिटेल्स जगजाहीर आहेत आणि आरोप लावण्याआधी सर्व तथ्य माझ्याकडे आहेत."

त्याआधी इतर एका ट्वीटमध्ये बुराकोव्स्कींनी म्हटलं की, "डिअर मॅडम, मला पूर्ण खात्री आहे की, असं झालं नाहीये. काँटॅक्ट्ससह यादी इथं शेअर करू शकत नाही, त्यामुळे पोलंडच्या भारतीय दूतावासासोबत शेअर करावं. जेणेकरून या प्रकरणात मदत केली जाऊ शकेल. आम्ही एचई नगमा मलिक यांच्याशी सातत्यानं संपर्कात आहोत."

त्यानंतर प्रियंका चतुर्वेदींनी लिहिलं की, "कधीही माझ्या देश आणि देशवासियांप्रती असलेल्या निष्ठेवर प्रश्न उपस्थित करू नका. जसं मी तुमच्या निष्ठेवर प्रश्न उपस्थित करणार नाही."

X पोस्टवरून पुढे जा, 4
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

X पोस्ट समाप्त, 4

त्यानंतर यावर उत्तर देताना बुराकोव्स्कींनी म्हटलं की, "मॅडम, रशियाच्या आक्रमणानंतर अनेक देशांचे जवळपास 3 लाख लोकांनी पोलंडच्या सीमेवरून प्रवेश केलाय. त्यात भारताच्या 1200 लोकांचा समावेश आहे. अजूनही लोक येत आहेत. गरजवंतांची पोलंड मदत करत आहे. आमचे अधिकारी भारताच्या अधिकाऱ्यांना सहकार्य करत आहेत."

त्यानंतर हा वाद इथंच थांबला असला, तरी प्रियंका चतुर्वेदींनी पोलंडच्या दूतावासाला टॅग करून आणखीही काही ट्वीट केले आहेत आणि तिथं अडकलेल्या भारतीयांची समस्या अधोरेखित केली आहे.

ISWOTY

हेही वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)