रशिया-युक्रेनः व्लादिमीर पुतीन यांनी ताजमहाल पाहिला तेव्हा... पाहा 10 दुर्मिळ फोटो

1. जपानमध्ये ज्युडो खेळताना

5 सप्टेंबर 2000 रोजी रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी टोक्योला भेट दिली तेव्हा त्यांनी नात्सुमी गोमी नावाच्या 10 वर्षे वयाच्या मुलीविरोधात ज्युडो कुस्ती खेळली.

2. रशियाचे शहाजहान

4 ऑक्टोबर 2000 रोजी व्लादिमीर पुतीन भारताच्या भेटीवर आले होते. त्यावेळी पुतीन यांनी त्यांची पत्नी ल्युडमिलासह आग्र्याच्या ताजमहालाला भेट दिली.

3. पुतीनरहस्य भारतीयांना सांगताना

2000 साली भारतात व्लादिमीर पुतीन यांनी भाषण केलं होतं. पुढच्या 20 वर्षांमध्ये जगात काय घडामोडी होणार आहेत याचा अंदाज त्यावेळेस कोणाला आला असेल काय?

4. गोष्टी सांगेन युक्तीच्या चार

अमेरिकेला झुंजवण्यात अख्खी हयात घालवलेल्या, शीतयुद्धात 'महत्त्वाची' भूमिका बजावणाऱ्या फिडेल कॅस्ट्रो यांनी पुतीन यांना कोणता बरा गुरुमंत्र दिला असेल?

5. आता क्रेमलिनची चिंता तुम्ही करू नका...

बोरिस येल्तसिन यांच्याकडून व्लादिमीर पुतीन यांनी रशियाची सूत्रं स्वीकारली.1953 साली निधन झालेले सोव्हिएत संघाचे नेते जोसेफ स्टॅलिन यांच्यानंतर रशियाचं राष्ट्राध्यक्षपद सर्वाधिक काळ सांभाळणारे नेते पुतीन आहेत.

6. नृत्य

सेंट पिटर्सबर्ग येथे शिकत असताना वर्गमैत्रिण एलेनाबरोबर नृत्य करणारे व्लादिमीर पुतीन

7. 10 डाऊनिंगवर...

2000 साली पुतीन यांनी इंग्लंडचे तेव्हाचे पंतप्रधान टोनी ब्लेअर यांची 10 डाऊनिंग स्ट्रीट येथे जाऊन भेट घेतली होती.

8. किचन नाइटमेअर

मी माझी सिक्रेट रेसिपी कोणालाच सांगत नाही, असं तर पुतीन म्हणत नसावेत ना?

9. महासत्तांचे प्रमुख

अमेरिकेचे तत्कालीन राष्ट्राध्यक्ष बिल क्लिंटन आणि व्लादिमीर पुतीन यांचे मॉस्को भेटीतले छायाचित्र

10. 'शेजार'धर्म

व्लादिमीर पुतीन यांचे कोरियातील भेटीचे छायाचित्र. त्यांच्याबरोबर किम जोंग इल (दु) दिसत आहेत.

हेही वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)