You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
वृद्धिमान साहाचं ट्वीट चर्चेत- 'क्रिकेटसाठी दिलेल्या योगदानानंतर मला हे मिळालं'
श्रीलंका विरुद्धच्या कसोटी सामन्यासाठी भारतीय संघांत निवड न झालेला यष्टीरक्षक आणि गोलंदाज वृद्धिमान साहाने एका पत्रकारावर धमकी दिल्याचा आरोप केला आहे.
पत्रकाराच्या टेक्स्ट मेसेजचा स्क्रिनशॉट पोस्ट करत वृद्धिमान साहाने ट्वीट केलं आहे. तो म्हणाला, "भारतीय क्रिकेटसाठी आतापर्यंत मी केलेल्या योगदानानंतर मला तथाकथित 'सन्मानित' पत्रकाराकडून हे मिळालं आहे. पत्रकारिता कुठे पोहचलीय, पाहा."
संघात निवड न झाल्यातंर वृद्धिमानने हे ट्वीट केलं
भारतीय संघाची निवड प्रक्रिया पार पडल्यानंतर वृद्धिमान साहाचं हे ट्वीट समोर आलं आहे. साहाने ट्वीटरवर पोस्ट केलेल्या टेक्स्ट मेसेजमध्ये कथित पत्रकार म्हणतात, "मला एक मुलाखत द्या. हे चांगलं होईल. तुम्ही 11 पत्रकारांना निवडण्याचा प्रयत्न करता, जे माझ्यानुसार सर्वाधिक चांगले नाहीत. जो सर्वाधिक सहाकार्य करेल त्याची निवड केली पाहिजे."
"तुम्ही मला कॉल केला नाही. मी तुमची मुलाखत आता कधीच घेणार नाही. मी माझा झालेला अपमान विसरत नाही आणि मी हे लक्षात ठेवेन. तुम्ही हे करायला नको होतं,"
साहाच्या समर्थनार्थ अनेक क्रिकेटर
रिद्धिमान साहाच्या या ट्वीटनंतर अनेक क्रिकेटर्सने त्याला समर्थन दिलं आहे. माजी फलंदाज विरेंद्र सहवागनेही ट्वीट केलं आहे. तो म्हणाला, "मी दु:खी आहे. ते ना सन्मानित आहे ना पत्रकार आहेत. फक्त चमचागिरी आहे. मी तुमच्यासोबत आहे रिद्धि."
हरभजन सिंहने ट्वीट करत म्हटलं, "वृद्धिमान त्या व्यक्तीचे नाव जाहीर करा. यामुळे क्रिकेट कम्युनिटीमध्ये अशाप्रकारे कोण काम करत आहे ते समोर येऊ शकेल. तुम्ही सांगितलं नाहीत तर चांगले पत्रकारही संशयाच्या भोवऱ्यात येतील. ही कोणती पत्रकारिता आहे?"
माजी वेगवाने गोलंदाज आरपी सिंह म्हणाला, "बीसीसीआय आणि क्रिकेटरची चर्चा सुरू असते, तेव्हा पत्रकारांकडून आपण सर्वप्रकारच्या 'सूत्रां'बाबत ऐकतो. आम्हाला कोणी सांगू शकेल का की साहाला धमकी देणारा पत्रकार कोण आहे?"
क्रिकेटर आकाश चोप्रा म्हणाले, "मित्रा त्याचे नाव सांग. परिस्थिती खूप वाईट आहे. क्रिकेट कम्युनिटीला या तथाकथित पत्रकाराला बॉयकॉट करण्यासाठी एक मनिटही लागणार नाही, जेणेकरुन वातावरण चांगले होईल."
प्रज्ञान ओझानेही संबंधित पत्रकाराचे नाव जाहीर करण्यासाठी आग्रह केला.
दरम्यान, भारतीय संघात निवड न झाल्याने वृद्धिमानचे एक आक्रमक वक्तव्य सुद्धा चर्चेत आहे. आमच्याकडे या बातमीची पुष्टी नसल्याने याचा उल्लेख आम्ही इथे करत नाही.
रिद्धिमान साहाने गेल्यावर्षी न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यात संघात कमबॅक केले होते. वृद्धिमान साहा आयपीएल 2022 साठी गुजरात टायटंसकडून खेळताना दिसतील.
37 वर्षीय वृद्धिमान साहाने भारतासाठी आतापर्यंत 40 टेस्टमॅच आणि 9 वनडे खेळल्या आहेत. आयपीएलमध्ये 133 सामने खेळलेल्या रिद्धिमान साहाला भारताकडून आंतरराष्ट्रीय T-20 मॅच खेळण्याची एकही संधी आतापर्यंत मिळाली नाही.
मी दुखावलो नाही-द्रविड
"मी अजिबात दुखावलो गेलो नाही. साहाने भारतीय क्रिकेटसाठी जे काही केले त्याबद्दल मला खूप आदर आहे. मला त्याच्याबद्दल आदर होता म्हणून मी त्याच्याशी बोललो होतो. प्रामाणिकपणा आणि स्पष्ट भूमिका हा त्याचा हक्क आहे. त्याने माध्यमांकडून हे ऐकावे अशी माझी इच्छा नव्हती. मी नेहमीच खेळाडूंशी संवाद साधतो. मी जे काही बोलतो ते त्याला आवडेल आणि तो सहमत असेल असे नेहमीच होत नाही", असं भारतीय संघाचे प्रशिक्षक राहुल द्रविड यांनी म्हटलं आहे.
हे वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)