अहमदाबाद साखळी बॉम्बस्फोट प्रकरण : कोर्टाने 49 दोषींपैकी 39 ना सुनावली फाशीची शिक्षा

अहमदाबाद सत्र न्यायालय

फोटो स्रोत, ANI

फोटो कॅप्शन, अहमदाबाद सत्र न्यायालय

2008 साली अहमदाबादमध्ये झालेल्या साखळी बॉम्बस्फोट प्रकरणाची सुनावणी करणाऱ्या विशेष न्यायालयाने ऐतिहासिक निकाल दिला आहे.

या प्रकरणी कोर्टाने 49 दोषींपैकी 38 दोषींना फाशीची शिक्षा जाहीर केली आहे. तर 11 जणांना कोर्टाने जन्मठेपेची शिक्षा दिलीय.

X पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

X पोस्ट समाप्त

2008मध्ये अहमदाबादमध्ये झालेल्या साखळी स्फोटांमध्ये 56 जणांचा मृत्यू झाला होता तर 200 जण जखमी झाले होते.

अहमदाबाद साखळी स्फोट

अहमदाबाद साखळी स्फोट

फोटो स्रोत, KALPIT BHACHECH

तो दिवस 26 जुलै 2008 चा होता. गुजरातच्या अहमदाबाद शहरात 70 मिनिटांमध्ये एका पाठोपाठ 21 स्फोट झाले होते. या एकापाठोपाठ झालेल्या स्फोटांमुळं अहमदाबादमध्ये खळबळ माजली होती. इंडियन मुजाहिद्दीन आणि हरकत-उल-जिहाद-अल-इस्लामी नावाच्या कट्टरतावादी संघटनांनी याची जबाबदारी घेतली होती. गुजरात एटीएस म्हणजे दहशतवादी विरोधी पथकानं स्फोटांतील संशयित मुफ्ती अबू बशीर यांच्यासह नऊ जणांचा अटक केली होती. 2016 मध्ये जवळपास आठ वर्षांच्यानंतर स्फोटांमधील आणखी एक आरोपी नासीर रंगरेज यांनाही पकडण्यात आलं होतं.

अहमदाबाद साखळी स्फोट

फोटो स्रोत, AFP

स्फोटांच्या लगेच नंतर गुजरातच्या सुरेंद्रनगर जिल्ह्यातील तीन जणांना अटक करण्यात आली होती. त्यात हुसैन इब्राहीम, हासील मोहम्मद आणि अब्दुल कादीर यांची समावेश आहे. या स्फोटांप्रकरणी दाखल करण्यात आलेल्या आरोप पत्रामध्ये सिमीचे मुफ्ती बशर बशर, सफदर मन्सुरी आणि सफदर नागोरी यांच्याशिवाय इतर 50 जणांनाही आरोपी बनवण्यात आलं होतं. स्फोटांप्रकरणी गुजरात पोलिसांच्या विशेष पथकानं एकूण 70 आरोपींनी आटक केली होती.

ISWOTY

हेही वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)