उन्नाव : बेपत्ता मुलीचं शव माजी मंत्र्याच्या जमिनीत पुरलेलं सापडलं

उन्नाव

फोटो स्रोत, ANI

उत्तर प्रदेशातील उन्नाव जिल्ह्यातील दोन महिन्यांपासून बेपत्ता असलेल्या तरुणीचं प्रेत सापडलं आहे.

उन्नावच्या कब्बा खेडा गावात समाजवादी पक्षाच्या सरकारमध्ये मंत्री राहिलेले दिवंगत नेते फतेह बहादुर सिंह यांच्या ओसाड पडलेल्या जमिनीत हे प्रेत पुरलेलं होतं.

उन्नाव पोलिसांच्या माहितीनुसार, तरुणी 8 डिसेंबरपासून बेपत्ता होती. तिच्या आईनं पोलिसात याबाबत तक्रार केली होती. मात्र, या प्रकरणात भारतीय दंड संहितेच्या कलम 366, 323, 504 आणि 506 अन्वये एफआयआर 10 जानेवारी 2022 रोजी दाखल करण्यात आला.

पोलिसांनी सांगितलं की, "आतापर्यंत या प्रकरणी जितकं समोर आलंय, त्यानुसार एक तरुणी गेल्यावर्षी आठ डिसेंबरला बेपत्ता झाली होती. बेपत्ता झाल्याची तक्रार पोलीस ठाण्यात नोंदवण्यात आली होती. मात्र, 24 तासांत जो एफआयआर नोंदवणं आवश्यकत होता, तो झाला नाही. याला कारणीभूत असलेल्याला निलंबित करण्यात आलंय."

अप्पर पोलीस अधीक्षकांनी सांगितलं की, बेजबाबदारपणाचा ठपका ठेवत प्रभारी निरीक्षकाला निलंबित करण्यात आलंय.

"या प्रकरणात कारवाई सुरू आहे. आणखी एका आरोपीला अटक करण्यात आलीय. याआधी राजोल सिंह यांना ताब्यात घेण्यात आलं आहे," अशी माहिती त्यांनी दिली.

राजोल सिंह हे दिवंगत नेते फतेह बहादुर सिंह यांचे पुत्र आहेत.

तरुणीचं प्रेत सापडल्यानंतर पोस्टमार्टम करण्यात आलं आणि आता पोस्टमार्टमच्या अहवालावर आधारित पुढील कारवाई करण्यात येईल, अशी माहिती अप्पर पोलीस अधीक्षकांनी दिली.

X पोस्टवरून पुढे जा, 1
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

X पोस्ट समाप्त, 1

अप्पर पोलीस अधीक्षकांनी दुजोरा दिलाय की, आठ डिसेंबर रोजी बेपत्ता म्हणून तक्रार नोंदवण्यात आलेल्या तरुणीचंच हे प्रेत आहे.

तरुणीचे आईने केले आरोप

तरुणीच्या आईने 24 जानेवारी 2022 रोजी एएनआयला दिलेल्या मुलाखतीत आरोप केले होते की, जवळपास 50 दिवसांआधी राजोल सिंह मुलीला जबरदस्तीने उचलून घेऊन गेला होता.

त्याच दिवशी म्हणजे 24 जानेवारीला उन्नावचे एएसपी शशी शेखर सिंह यांनी प्रतिक्रिया दिली होती की, 22 वर्षीय तरुणीच्या अपहराणाची तक्रार नोंदवण्यात आलीय. आरोपांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आलं आहे आणि त्यासोबतच तपासासाठी दोन पथकांची स्थापनाही करण्यात आलीय.

इंडियन एक्स्प्रेसने प्रसिद्ध केलेल्या वृत्तात म्हटलंय की, 25 जानेवारीला लखनऊमध्ये समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव यांच्या गाडीसमोर तरुणीच्या आईने आत्मदहनाचा प्रयत्न केला होता.

राजकीय आरोप-प्रत्यारोपही सुरू

या प्रकरणी राजकीय आरोप-प्रत्यारोपही सुरू झाले आहेत. सर्वांत पहिलं ट्वीट बसपाच्या प्रमुख मायावती यांनी केलंय.

"उन्नाव जिल्ह्यात समाजवादी पक्षाच्या नेत्याच्या शेतात दलित तरुणीचं पुरलेलं प्रेत सापडलं. हे प्रकरणं अत्यंत दु:खदायक आहे. या तरुणीचे कुटुंबीय सपा नेत्यावर अपहरण आणि हत्येची शंका घेत आहेत. राज्य सरकारनं पीडित कुटुंबाला न्याय देण्यासाठी दोषींविरोधात तातडीनं कठोर कारवाई करावई," असं मायावती म्हणाल्या.

X पोस्टवरून पुढे जा, 2
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

X पोस्ट समाप्त, 2

उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य म्हणाले की, "श्री अखिलेश यादव यांच्या पक्षाच्या नेत्याच्या शेतात दलित मुलीचं प्रेत सापडलं. तरुणीची आई तुमच्या गाडीसमोर न्याय मागत असताना, तुम्ही तिच्याशी बोलला नाहीत आणि सपा नेत्याचं रक्षण करताय. नव्या सपात सपा नेत्यांच्या प्रत्येक वाईट कृत्याला माफ करणार का? चौकशीअंती दोषींना शिक्षा देऊन पीडितांना न्याय देण्यात कसर सोडणार नाही."

यावर अखिलेश यादव यांनीही एका वृत्तवाहिनीशी बोलताना त्यांची भूमिका मांडलीय. ते म्हणाले, "फतेह बहादुर समाजवादी पक्षात होते. त्यांचं निधन झालंय. आरोपीचा आणि समाजवादी पक्षाचे काहीच संबंध नाहीत. आरोपी पक्षाचा सदस्यही नाहीय."

"पोलीस कशाची वाट पाहत होते? पोलीस झोपा काढत होते का? यूपीचे पोलीस कायदा-सुव्यवस्थेला नीट करणार की नाही?" असा प्रश्नही अखिलेश यादव यांनी उपस्थित केला.

ISWOTY

हे वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)