गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांच्याविरोधात मुंबईत गुन्हा दाखल #5मोठ्याबातम्या

फोटो स्रोत, Getty Images
आज सकाळी वृत्तपत्रं आणि वेबसाइट्सवर प्रसिद्ध झालेल्या बातम्यांपैकी 5 मोठ्या बातम्या थोडक्यात पाहूया.
1. गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांच्याविरोधात गुन्हा दाखल
मुंबई पोलिसांनी गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. कोर्टाच्या आदेशानंतर पोलिसांनी पिचाई यांच्याविरोधात कॉपी राईटच्या कलमांखाली गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत चित्रपट निर्माते आणि दिग्दर्शक सुनील दर्शन यांनी न्यायालयात तक्रार केली होती. एबीपी माझानं ही बातमी दिली आहे.
सुनील दर्शन यांनी बनवलेला चित्रपट यूट्यूबवर अपलोड करण्यात आला आहे. त्यानंतर कोर्टाने मुंबई पोलिसांना गुन्हा नोंदवून तपास करण्याचे आदेश दिले होते. याच आदेशानंतर एमआयडीसी पोलिसांनी पिचाई यांच्यासह सहा जणांवर गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.
सुनील दर्शन यांनी सांगितलं की, त्यांच्या 'एक हसीना थी एक दिवाना था' या चित्रपटाचे कॉपीराइट कोणालाही दिलेले नाहीत. असे असूनही या चित्रपटाची गाणी आणि व्हीडिओ अनेकांनी गुगल आणि यूट्यूबवर अपलोड केले आहेत.
चित्रपटाची गाणी आणि व्हीडिओ अपलोड होत असतानाच यूट्यूब आणि गुगलनेही अपलोड करण्याची परवानगी दिल्याचे त्यांनी सांगितले. ज्यामुळे त्यांनी करोडो रुपये कमावले आणि त्यांचे (चित्रपट निर्मात्यांचे) करोडो रुपयांचे नुकसान झाले.
दरम्यान, सुंदर पिचाई यांच्याव्यतिरिक्त इतर Google च्या अधिकार्यांवर कॉपीराइट कलम 51, 63 आणि 69 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
2. मुंबईत तब्बल 7 कोटींच्या बनावट नोटा जप्त
मुंबईत भारतीय चलनाच्या बनावट नोटा छापून वितरित करण्याच्या उद्देशाने आलेल्या एका आंतरराज्यीय टोळीला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.
या टोळीकडून सात कोटी रुपये, सात वेगवेगळ्या कंपन्यांचे मोबाईल फोन्स, एक लॅपटॉप आणि काही कागदपत्रं जप्त करण्यात आली आहे. दहिसर परिसरात या टोळीला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.
लोकसत्तानं ही बातमी दिली आहे.

फोटो स्रोत, Barcroft Media
मुंबई शहरात बनावट चलनी नोटा छापून त्या दैनंदिन व्यवहारात आणल्या जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी आपल्या गोपनीय बातमीदारामार्फत या प्रकाराची संपूर्ण माहिती काढली.
चार व्यक्ती 2000 रुपये किमतीच्या बनावट नोटा विक्री करण्यासाठी दहिसरमध्ये येणार असल्याचं पोलिसांना कळलं. त्याप्रमाणे माहिती मिळालेल्या गाडीची झडती घेतली असता या गाडीमध्ये 2000 रुपयांच्या नोटांचे 250 बंडल आढळून आले.
3. रश्मी ठाकरेंवर कारवाईची मागणी
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पत्नी आणि 'सामना' दैनिकाच्या संपादिका रश्मी ठाकरे यांच्यावर कारवाई करण्यात यावी अशी मागणीवजा तक्रार अॅड. डॉ. जयश्री पाटील यांनी मुंबई पोलीस आयुक्तांकडे पत्राद्वारे केली आहे.
झी 24 तासनं ही बातमी दिली आहे.
प्रजासत्ताक दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात मुख्यमंत्री शिवाजी पार्क येथील कार्यक्रमात सपत्नीक उपस्थित होते. या कार्यक्रमात रश्मी ठाकरे यांनी राष्ट्रध्वजाचा अवमान केला आहे, असे अॅड. पाटील यांचे म्हणणे आहे.
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
X पोस्ट समाप्त, 1
"राष्ट्रगीतानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे राष्ट्रध्वजाला सलामी देत होते. मात्र, त्यावेळी रश्मी ठाकरे स्तब्ध उभ्या होत्या. त्यांनी ध्वजाला सलामी दिलेली नाही. यामुळे राष्ट्रध्वजाचा अवमान झालेला आहे.
"त्यांच्या या कृतीमुळे लोकांच्या भावना दुखावलेल्या आहेत. त्यामुळे या प्रकरणाची चौकशी करून रश्मी ठाकरे यांच्यावर कारवाई करावी," अशी मागणी अॅड. पाटील यांनी पोलिस आयुक्तांकडे केली आहे.
4. छत्तीसगढ: सरकारी कर्मचाऱ्यांसाठी 5 दिवसांचा आठवडा
प्रजासत्ताक दिनाचं औचित्य साधून छत्तीसगढ सरकारनं सरकारी कर्मचाऱ्यांना एक भेट दिली आहे.
आता या राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांना आठवड्यातून 5 दिवस काम करावे लागणार आहे. तशी घोषणा राज्याचे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांनी केली आहे.
आज तकनं ही बातमी दिली आहे.
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
X पोस्ट समाप्त, 2
सरकारी कर्मचाऱ्यांची कार्यक्षमता वाढवण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं आहे.
5. हिजाब वादाप्रकरणी तज्ज्ञांची समिती स्थापन
कर्नाटकातील एका कॉलेजात हिजाब परिधान केल्यामुळे 6 विद्यार्थ्यांना वर्गात प्रवेश नाकारण्यात आला होता. यामुळे मोठ्या प्रमाणावर वाद निर्माण झाला होता.
आता याप्रकरणाची चौकशी करण्यासाठी सरकारनं तज्ज्ञांची समिती स्थापन केली आहे.
हिंदुस्तान टाईम्सनं ही बातमी दिली आहे.

फोटो स्रोत, KARIM SAHIB
ही समिती विविध राज्यांमध्ये पाळल्या जाणार्या ड्रेस कोड आणि गणवेशाच्या नियमांचा अभ्यास करेल तसंच राज्य सरकारला अहवाल सादर करण्यापूर्वी अनेक न्यायालयांनी दिलेल्या आदेशांचाही अभ्यास करेल, असं सरकारी आदेशात नमूद करण्यात आलं आहे.
हेही वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)








