'शरद पवार हे प्रभारी मुख्यमंत्री झाले आहेत का?'

शरद पवार, उद्धव ठाकरे

फोटो स्रोत, Getty Images

    • Author, प्राजक्ता पोळ
    • Role, बीबीसी मराठीसाठी

हा प्रश्न आम्ही नाही तर विरोधी पक्ष असलेल्या भाजपच्या नेत्यांनी उपस्थित केला आहे. हा प्रश्न उपस्थित करण्यामागे काय पार्श्वभूमी आहे?

तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर सप्टेंबर महिन्यात शस्त्रक्रिया झाली. या शस्त्रक्रियेनंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे सार्वजनिक ठिकाणी उपस्थित राहीलेले दिसले नाहीत.

हिवाळी अधिवेशनातही मुख्यमंत्री गैरहजर राहिले. त्यांनी काही ऑनलाइन बैठकांना उपस्थिती लावली. पण ते राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीतही प्रत्यक्षात उपस्थित राहताना दिसत नाहीत.

नुकत्याच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतलेल्या कोरोनाच्या आढावा बैठकीतही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याऐवजी आरोग्य मंत्री राजेश टोपे उपस्थित राहीले.

"डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार मुख्यमंत्र्यांना एकाच जागी फार काळ बसणं शक्य नसल्याने बैठकीला त्यांच्या जागी मी उपस्थित राहील्याचं" राजेश टोपे यांनी सांगितलं.

ही पार्श्वभूमी सांगण्याचा हेतू इतका की, दरम्यानच्या कालावधीत शरद पवारांची अनेक बैठकांमधली प्रत्यक्ष उपस्थिती वाढल्याच चित्र आहे. मुख्यमंत्र्यांच्या अनुपस्थितीत शरद पवार अधिक सक्रिय झाले आहेत का? याची काय कारणं असू शकतात? यासंदर्भातला हा आढावा...

शरद पवारांचा कोणकोणत्या बैठकांमध्ये सहभाग?

शरद पवार हे महाविकास आघाडी सरकारचे मुख्य नेते आहेत. त्यामुळे या सरकारच्या निर्णयांमध्ये ते लक्ष घालत होते. पडद्यामागून सर्व सूत्र शरद पवारच हलवतात असं बोललं जात होतं. परंतु त्यांचा थेट सहभाग या सरकारच्या बैठकांमध्ये दिसत नव्हता. गेल्या काही महिन्यांपासून सरकारी बैठका, तसंच दौर्‍यांमध्ये शरद पवार प्रत्यक्षात दिसून आलेत.

शरद पवार यांनी 17 जानेवारीला पुणे मेट्रोमधून प्रवास दौरा केला. या दौऱ्यातून पुणे मेट्रोच्या कामाची चाचणी चाचणी घेण्यात आली. या दौऱ्यावेळी प्रशासकीय अधिकारी आणि पुणे मेट्रो प्रकल्पाचे अधिकारी उपस्थित होते.

पुणे मेट्रोच्या या चाचणी दरम्यान स्थानिक आमदार, खासदार, महापौरांना न बोलवता हा दौरा शरद पवारांनी कसा केला? यावर भाजपने टीका केली.

"पुण्याचे खासदार हे गिरीश बापट आहेत. मग शरद पवार हा दौरा परस्पर कसा करू शकतात? हे आयत्या पिठावर रेघोट्या मारल्यासारखं आहे" असं भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी टीका करताना म्हटलं आहे.

X पोस्टवरून पुढे जा, 1
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

X पोस्ट समाप्त, 1

राज्यात कोरोनाच्या तिसऱ्या लाटेला सुरुवात झाली. ओमिक्रॉनच्या रूग्णांची संख्या वेगाने वाढत होती त्यादरम्यान 6 जानेवारीला शरद पवार यांनी आरोग्य मंत्री राजेश टोपे आणि आरोग्य विभागाचे सचिव प्रदीप व्यास यांची बैठक घेतली. या बैठकीत पवारांकडून राज्यातील कोरोना परिस्थितीचा आढावा घेण्यात आला. त्याचबरोबर काही सूचनाही करण्यात आल्या.

शरद पवार, उद्धव ठाकरे

फोटो स्रोत, Getty Images

10 जानेवारीला शरद पवार हे एसटी संपाबाबत चर्चा करण्यासाठी परिवहन मंत्री अनिल परब यांच्यासह कृती समितीच्या बैठकीत सहभागी झाले.

सह्याद्री अतिथीगृहावर पार पडलेल्या या बैठकीत शरद पवार यांनी तोडगा काढण्याचा प्रयत्न केला. त्याचबरोबर दोन महिन्यांपासून सुरू असलेल्या एसटी कर्मचाऱ्यांना संप सुरूच ठेवण्यासाठी पाठिंबा देत असलेल्या वकील गुणरत्न सदावर्ते यांना हटवून अॅड. सतिश पेंडसेंची निवड करण्यात आली.

या बैठकीनंतर शरद पवार यांनी या संपाचं कोणीही राजकारण करू नये आणि कर्मचार्‍यांनी कामावर रुजू व्हावं असं आवाहन केलं.

या बैठकीनंतरही भाजपकडून शरद पवार यांच्यावर टीका करण्यात आली. भाजपचे आमदार राम कदम याबाबत बोलताना म्हणाले, "शरद पवार हे मंत्र्यांच्या आणि अधिकार्‍यांच्या बैठका घेत आहेत. हा अधिकार फक्त मुख्यमंत्र्यांचा आहे. मग कोणत्या अधिकाराने शरद पवार या बैठका घेत आहेत? मुख्यमंत्र्यांनी त्यांचा चार्ज शरद पवारांकडे दिला आहे का?"

याबाबत शरद पवार यांना पत्रकार परिषदेत विचारलं असता ते म्हणाले, "टीकाकारांच्या ज्ञानाचं मी कौतुक करतो. लोकशाहीमध्ये सर्वांना चर्चा करण्याचा अधिकार आहे. मला परिवहन मंत्री म्हणाले, तुम्हीही बैठकीला आलं पाहीजे म्हणून मी आलो."

X पोस्टवरून पुढे जा, 2
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

X पोस्ट समाप्त, 2

राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी 13 जानेवारीला शरद पवार यांची भेट घेऊन कोरोनाच्या पार्श्वभूमीवर वैद्यकीय शिक्षण विभागाकडून जनतेला उपचारसुविधा पुरवण्यासाठी कोणकोणत्या उपाययोजना केल्या आहेत याची माहिती दिली.

त्याचबरोबर सांस्कृतिक विभागाकडून कलावंताना दिलासा देण्यासाठी कोणत्या योजना राबवणार आहोत यासंदर्भातही माहिती दिल्याचं मंत्री अमित देशमुख यांनी सांगितलं. शिवाय शरद पवार यांच्याकडून सूचना आणि मार्गदर्शन घेतल्याचही ते म्हणाले.

X पोस्टवरून पुढे जा, 3
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

X पोस्ट समाप्त, 3

राज्यातील शेती आणि संलग्न व्यवसायातील मजूर, घरकामगार, वाहन चालक, विडी कामगार, वस्त्रोद्योग, प्रसारमाध्यमे यांच्यासारख्या असंघटित कामगारांच्या सामाजिक सुरक्षेसाठी महामंडळ स्थापन करण्यासंदर्भात कामगार मंत्री हसन मुश्रीफ यांनी विभागाची बैठक घेतली. या बैठकीला शरद पवारही उपस्थित होते.

X पोस्टवरून पुढे जा, 4
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

X पोस्ट समाप्त, 4

'चर्चेत सहभागी व्हायला बंदी आहे का?'

अनेक अशा बैठका किंवा निर्णयांमध्ये शरद पवार यांचा थेट सहभाग असतो, ज्याची चर्चा प्रसारमाध्यमांमध्ये होत नाही. सरकारी बैठकांमध्ये शरद पवार प्रत्येकवेळी सहभागी होतात याचं काय कारण आहे?

याबाबत बीबीसी मराठीने राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री नवाब मलिक यांना विचारलं असता ते म्हणतात, "शरद पवार हे राज्यसभेचे खासदार आहेत. कुठल्याही बैठकीला खासदार म्हणून ते सहभागी होतात. ते सहभागी होत असले तरी बैठकीचं नेतृत्व मंत्रीच करतात. मग चर्चेत सहभागी व्हायला बंदी आहे का?"

मुख्यमंत्रिपदाचा चार्ज देण्याच्या टीकेवर नवाब मलिक पुढे म्हणतात, "शरद पवारांना मुख्यमंत्रिपदाचा चार्ज देण्याच्या विरोधी पक्षा़च्या फुटकळ टीकांना आम्ही उत्तर द्यावं असं वाटत नाही."

शरद पवार, उद्धव ठाकरे

फोटो स्रोत, Getty Images

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आजारपणामुळे नेतृत्वाची एक पोकळी निर्माण झाली आहे. ती भरून काढण्याचा राष्ट्रवादीचा प्रयत्न आहे का?

याबाबत बोलताना जेष्ठ पत्रकार सुधीर सुर्यवंशी सांगतात, "महाविकास आघाडी सरकार हे तीन पक्षांचं सरकार आहे. यामध्ये सुरुवातीपासूनच कुठल्याही श्रेयासाठी तीनही पक्षांमध्ये चढाओढ दिसून आली आहे. या तीनही पक्षांत सर्वांत चतूर आणि वरचढ समजला जाणारा पक्ष आहे राष्ट्रवादी काँग्रेस.

"या तीन पक्षांमध्ये कॉंग्रेस आपआपसातले वाद आणि वादग्रस्त वक्तव्यांमध्ये गुंतली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आजारी असल्याने या स्पर्धेत शिवसेना पक्षही मागे पडला आहे. आता राहीला पक्ष तो राष्ट्रवादी कॉंग्रेस... शरद पवार हे याआधीही सक्रिय होते. पण मुख्यमंत्र्यांच्या अनुपस्थितीत त्यांचा सरकारी प्रक्रियेत प्रत्यक्ष सहभाग हा ठळकपणे जाणवू लागला आहे. त्यामुळे राज्यातील नेतृत्वाबाबत निर्माण झालेली पोकळी ही शरद पवारांच्या माध्यमातून भरून निघतेय. याचा फायदा भविष्यात निश्चितपणे राष्ट्रवादीला होऊ शकतो."

हे वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता