बिपिन रावत यांच्या पत्नी मधुलिका रावत यांच्याबद्दल या गोष्टी माहिती आहेत का?

मधुलिका रावत

फोटो स्रोत, TWITTER @ADGPI

    • Author, शुरैह नियाजी
    • Role, बीबीसी हिंदीसाठी

देशाचे पहिले चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ जनरल बिपिन रावत यांचं बुधवारी (8 डिसेंबर) हेलिकॉप्टर अपघातात निधन झालं. या अपघातात त्यांच्या पत्नी मधुलिका रावत यांचंही निधन झालं.

मधुलिका रावत मध्यप्रदेशातल्या शहडोलच्या होत्या म्हणजेच बिपिन रावत यांचं सासर शहडोलचं होतं.

अपघाताची बातमी मिळताच पूर्ण शहडोल दुःखात बुडालं. अपघात झाल्यानंतर मधुलिका रावत यांचे कुटुंबीय काय घडलं याची माहिती मिळवण्याचा प्रयत्न करत होते. काही काळाने त्यांना कळलं की जनरल रावत आणि त्यांच्या पत्नीचा मृत्यू झाला.

कुटुंबाकडून अशी माहिती मिळाली की बिपिन रावत यांच्या सासूबाई ज्योति प्रभा सिंह अजूनही शहडोलमध्येच आहे तर त्यांचे बंधु यशवर्धन सिंह दिल्लीला रवाना झाले आहे.

मधुलिका रावत शहडोलच्या सोहागपूरच्या होत्या. त्यांचे पिता मृगेंद्र सिंग काँग्रेसचे आमदार होते, पण आता त्यांचा मृत्यू झाला आहे.

कुटुंबाचं म्हणणं आहे की, बिपिन रावत शहडोलला शेवटचं 2012 साली आले होते.

मधुलिका रावत यांनी आपलं प्राथमिक शिक्षण शहडोलमधून पूर्ण केलं. पुढचं शिक्षण त्यांनी ग्वाल्हेरच्या सिंधिया स्कूलमधून पूर्ण केलं. दिल्ली विद्यापीठातून त्यांनी पदवी घेतली.

मधुलिका रावत

फोटो स्रोत, RAVI SHUKLA

मधुलिका आणि बिपिन रावत यांचा विवाह 1986 साली झाली. त्यांना दोन मुली आहेत. त्यांच्या मोठ्या मुलीचं लग्न झालंय, तर धाकटी मुलगी अजूनही शिकतेय.

मधुलिका रावत यांना हर्षवर्धन सिंह आणि यशवर्धन सिंह असे दोन भाऊ आहेत.

त्या आर्मी वाईव्स वेल्फेअर असोसिएशनच्या माजी अध्यक्ष होत्या.

मधुलिका रावत

फोटो स्रोत, TWITTER @ADGPI

या संस्थेच्या वेबसाईटवर म्हटलंय की ही संस्था सैन्यदलातील लोकांच्या पत्नी, मुलं आणि आश्रितांसाठी काम करते.

मधुलिका रावत

फोटो स्रोत, TWITTER @ADGPI

आर्मी वाईव्स वेल्फेअर असोसिएशनचा स्थापना 1965 साली केली होती आणि या वेबसाईटवर असंही म्हटलंय की देशातल्या सगळ्यांत मोठ्या स्वयंसेवी संस्थांपैकी ही एक आहे.

सैन्यदलातली व्यक्तींच्या विधवा, कॅन्सर पेशंट तसंच विकलांग मुलांसाठी काम करणाऱ्या सैन्याच्या अनेक सामाजिक मोहिमांमध्ये मधुलिका यांनी सहभाग घेतला होता.

हे वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)