वरुण सिंग यांचेही निधन, हेलिकॉप्टरमधील सर्व 14 जणांचा मृत्यू

वरुण सिंग

फोटो स्रोत, @ShivAroor

फोटो कॅप्शन, ग्रुप कॅप्टन वरुण सिंग

जनरल बिपिन रावत यांच्या हेलिकॉप्टरला झालेल्या अपघातात जखमी झालेल्या ग्रूप कॅप्टन वरुण सिंग यांचंही आज (15 डिसेंबर) निधन झालं आहे.

याबद्दलची माहिती वायूदलाने दिली आहे. गेल्या आठवड्यात जनरल रावत हेलिकॉप्टरला तामिळनाडूत अपघात झाला होता.

X पोस्टवरून पुढे जा, 1
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

X पोस्ट समाप्त, 1

वरुण सिंग यांच्या निधनाची बातमी समजल्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे.

X पोस्टवरून पुढे जा, 2
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

X पोस्ट समाप्त, 2

राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनीही ग्रुप कॅप्टन वरुण सिंग यांच्या निधनानंतर शोक व्यक्त केला आहे.

संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल आणि तिन्ही सैन्य दलांच्या प्रमुखांनीही रावत आणि जवानांना श्रद्धांजली वाहिली.

बुधवारी (8 डिसेंबर) तमिळनाडूमध्ये झालेल्या हेलिकॉप्टर दुर्घटनेत देशातील पहिले चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ यांच्यासह लष्करातील 13 जणांचं निधन झालं होतं.

या दुर्घटनेत जखमी झालेले ग्रुप कॅप्टन वरुण सिंग जिवंत होते मात्र त्यांची प्रकृती चिंताजनक होती. 10 डिसेंबरला त्यांना तामिळनाडू इथल्या वेलिंग्टन इथल्या लष्कराच्या रुग्णालयातून बेंगळुरूमध्ये एअरलिफ्ट करण्यात आलं होतं. गुरुवारी वरुण सिंग यांना अॅम्ब्युलन्सच्या माध्यमातून कुन्नूरहून कोयंबतूरला आणण्यात आलं आणि त्यानंतर बेंगळुरूला कमांड हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं होतं.

ग्रुप कॅप्टन वरुण सिंग वेलिंग्टनइथल्या डिफेन्स सर्व्हिसेस स्टाफ कॉलेज (डीएसससी)चे डायरेक्टिंग स्टाफ होते. 8 डिसेंबर रोजी वरुण सिंग जनरल बिपिन रावत यांच्या आगमनासाठी सुलुर इथे रवाना झाले होते.

जनरल रावत वेलिंग्टनस्थित डीएसएससी या संस्थेतील कॅडेट्सना संबोधित करण्यासाठी येत होते. मात्र याठिकाणी पोहोचण्याआधीच हेलिकॉप्टरर दुर्घटनेत त्यांचा मृत्यू झाला.

वरुण सिंग यांना यंदा शौर्यचक्र पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं होतं. 12 ऑक्टोबर 2020 रोजी वरुण सिंग तेजस एअरक्राफ्टच्या अभ्यासासाठी अवकाशात असताना आपात्कालीन परिस्थिती निर्माण झाली होती. कॉकपिटमधलं एक मशीन नादुरुस्त झालं. वरुण सिंग यांनी अतुलनीय साहस दाखवत सुरक्षित लँडिंग केलं होतं.

नॅशनल डिफेन्स अकादमीची परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर वरुण सिंग वायूसेनेत दाखल झाले होते. त्यांच्या बॅचमधील ते सर्वोत्तम पायलट ठरले होते. वरुण सिंग यांचे कुटुंबीयही लष्करातच कार्यरत आहेत. वरुण यांचे वडील केपी सिंग लष्करात कर्नल पदावरून निवृत्त झाले होते. वरुण यांचे बंधू नौदलात कार्यरत आहेत.

रावत

फोटो स्रोत, Getty Images

शुक्रवारी (10 डिसेंबर) 11 वाजता जनरल बिपिन रावत आणि त्यांच्या पत्नी मधुलिका रावत यांचं पार्थिव शरीर त्यांच्या सरकारी निवास स्थानी 3 कामराज मार्गमध्ये अंत्य दर्शनासाठी ठेवलं गेलं. दुपारी 2 वाजता त्यांचे मृतदेह तिन्ही सैन्य दलांच्या मिलिट्री बँडसह धौलाकुआंमधील बरार स्क्वेअरला आणले गेले. सायंकाळी 4 वाजता धौलाकुआंच्या बरार स्क्वेअरमध्येत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार झाले.

9 डिसेंबर संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी बिपीन रावत आणि त्यांच्या पत्नी मधुलिका रावत यांना श्रद्धांजली वाहिली.

X पोस्टवरून पुढे जा, 3
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

X पोस्ट समाप्त, 3

संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी लोकसभेत घटनेची माहिती सभागृहाला दिली. घटनेच्या चौकशीचे आदेश दिले असून कालच त्याचे कामकाज सुरू झाले आहे.

जनरल रावत आणि मृत पावलेल्या सर्व अधिकाऱ्यांवर लष्करी इतमामात अंत्यसंस्कार होतील असं राजनाथ सिंह यांनी सांगितले.

राजनाथ सिंह यांच्याबरोबरच लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांनी आदरांजली वाहिली, त्यानंतर लोकसभेतील सर्व सदस्यांनी दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्या सर्व अधिकाऱ्यांना श्रद्धांजली वाहिली.

नेमके काय घडले?

राजनाथ सिंह यांनी सांगितले की "Mi 17 V 5 या हेलिकॉप्टरने सुलूर या एअर बेसवरून सकाळी 11.48 वाजता उड्डाण घेतले. ते वेलिंगटन येथे दुपारी 12.15 पोहचणार होते. 12.08 मिनिटांनी हेलिकॉप्टरचा संपर्क तुटला.

"त्यानंतर काही लोकांनी कुन्नूरच्या जंगलात आग लागलेली पाहिली आणि ते घटनास्थळाकडे निघाले. त्या ठिकाणी हेलिकॉप्टर कोसळल्याचे त्यांना दिसले. त्यानंतर त्यांनी प्रशासनाशी संपर्क साधला आणि प्रशासनाने तिथे धाव घेतली."

8 डिसेंबर रोजी तामिळनाडूमध्ये झालेल्या एका हेलिकॉप्टर दुर्घटनेत त्यांचा मृत्यू झाला. भारतीय हवाई दलानं ट्वीट करून यासंबंधीची माहिती दिली होती.

या हेलिकॉप्टरमध्ये एकूण 14 लोक होते, ज्यांपैकी 13 जणांचा मृत्यू झाला. ग्रुप कॅप्टन वरुण सिंह हे या अपघातात जखमी झाले आहेत. त्यांच्यावर उपचार सुरु होते.

बिपीन रावत यांच्या हेलिकॉप्टरला तामिळनाडूमधील कुन्नूर इथं अपघात झाला होता.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्वीट करून जनरल बिपीन रावत यांना श्रद्धांजली वाहिली आहे.

"तामिळनाडूमध्ये झालेल्या हेलिकॉप्टर दुर्घटनेचा, ज्यामध्ये आपण जनरल बिपीन रावत, त्यांची पत्नी आणि लष्कराच्या इतर जवानांना गमावलं आहे, त्याचा मला खेद आहे. त्यांनी पूर्ण निष्ठेने देशाची सेवा केली होती. मृतांच्या कुटुंबियांप्रती मी संवेदना व्यक्त करतो."

X पोस्टवरून पुढे जा, 4
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

X पोस्ट समाप्त, 4

दरम्यान, हवाई दलाच्या हेलिकॉप्टरमधून प्रवास करणाऱ्या 14 पैकी 13 प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. तर एक पुरुष प्रवासी वाचला आहे. नीलगिरी जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्यांनी ही माहिती दिल्याचं पीटीआय वृत्तसंस्थेने सांगितलं होतं.

या घटनेच्या चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत, असं वायूसेनेने स्पष्ट केलं आहे.

X पोस्टवरून पुढे जा, 5
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

X पोस्ट समाप्त, 5

हेलिकॉप्टर क्रॅश तामिळनाडूमधील नीलगिरी जिल्ह्यातील कुन्नूरमध्ये झालं. हेलिकॉप्टर सुलुर आर्मी बेसवरून निघालं होतं. जनरल रावत यांना घेऊन हे हेलिकॉप्टप वेलिंग्टन लष्करी छावणीच्या दिशेने जात होतं.

जनरल रावत हे एक जानेवारी 2020 मध्ये देशाचे पहिले चीफ डिफेन्स ऑफ स्टाफ म्हणून नियुक्त करण्यात आले होते.

बिपिन रावत आणि त्यांच्या पत्नी

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, बिपिन रावत आणि त्यांच्या पत्नी

राजनाथ सिंह यांनी काही वेळापूर्वी जनरल रावत यांच्या दिल्लीतील निवासस्थानाला भेट देऊन त्यांच्या नातेवाईकांचीही भेट घेतली होती.

राजनाथ सिंह यांनी हा दुर्घटनेत मृत्यूमुखी पडलेल्यांच्या कुटुंबियांप्रति संवेदना व्यक्त केली आहे. त्यांनी ग्रुप कॅप्टन वरुण सिंह यांच्या आरोग्यासाठी प्रार्थना केली आहे.

जनरल बिपीन रावत यांना श्रद्धांजली

गृह मंत्री अमित शाह यांनी जनरल रावत यांच्या निधनावर दुःख व्यक्त करताना म्हटलं की, त्यांचं योगदान शब्दांत मांडता येणार नाही.

X पोस्टवरून पुढे जा, 6
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

X पोस्ट समाप्त, 6

परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी जनरल बिपीन रावत आणि त्यांच्या पत्नीच्या निधनावर दुःख व्यक्त केलं आहे.

X पोस्टवरून पुढे जा, 7
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

X पोस्ट समाप्त, 7

गेल्या काही वर्षांत आम्ही मिळून काम केलं होतं, असं म्हणतानाच जयशंकर यांनी जनरल रावत यांचं निधन हे देशाचं 'मोठं नुकसान' असल्याचं म्हटलं आहे.

काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनीही जनरल रावत आणि त्यांच्या पत्नीच्या निधनावर दुःख व्यक्त केलं आहे.

X पोस्टवरून पुढे जा, 8
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

X पोस्ट समाप्त, 8

त्यांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटलं आहे की, या अपघातात प्राण गमावलेल्या इतरांप्रति संवेदना व्यक्त केली आहे.

अमेरिका, इस्रायल आणि पाकिस्तानी लष्करानेही जनरल बिपीन रावत यांच्या निधनाबाबत दु:ख व्यक्त केलं आहे.

X पोस्टवरून पुढे जा, 9
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

X पोस्ट समाप्त, 9

पाकिस्तान लष्कराच्या प्रवक्त्यांनुसार लष्कर प्रमुख जनरल कमर जावेद बाजवा आणि जनरल नदीम रजा यांनी हेलिकॉप्टर दुर्घटनेत जनरल रावत आणि त्यांच्या पत्नीच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे.

हे वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)