बिपीन रावत यांच्या Mi-17V5 हेलिकॉप्टरचे हे आधीचे 4 अपघात माहिती आहेत?

फोटो स्रोत, Getty Images
बिपीन रावत ज्या Mi-17V5 हेलिकॉप्टरमधून प्रवास करत होते ते भारतीय हवाई दलाच्या सेवेतलं रशियन बनावटीचं हेलिकॉप्टर आहे. प्रामुख्यानं लष्करी वाहतुकीसाठी Mi-17V5 हेलिकॉप्टर्सचा वापर केला जातो.
भारताप्रमाणेच जगभरातील अनेक देश - इराण, म्यानमार, इराकसह अगदी अमेरिकेनंही Mi-17 गटातील हेलिकॉप्टर्सचा वापर केला आहे.
गेल्या काही वर्षांत या गटातील हेलिकॉप्टर्सना झालेले अपघातही चर्चेत आले होते. त्यानंतर भारतीय हवाई दलानं एप्रिल 2019मध्ये Mi-17V-5 हेलिकॉप्टर्सच्या रिपेअरिंग आणि देखरेखीसाठी चंदीगडमध्ये एक केंद्रही स्थापन केलं होतं.

फोटो स्रोत, Getty Images
जगातल्या सर्वांत अत्याधुनिक मिलिट्री ट्रान्सपोर्ट हेलिकॉप्टर्समध्ये Mi-17V-5 चा समावेश केला जातो. भारतासह रशिया, इराण, आणि अनेक देशांमध्ये या हेलिकॉप्टर्सचा वापर केला जातो. अमेरिकन सैन्यानंही या हेलिकॉप्टर्सचा वापर केला आहे, अफगाणिस्तान आणि इराकमध्येही यांचा वापर झाला आहे.
मोठ्या प्रमाणात वापर होत असल्यानं या हेलिकॉप्टर्सना काहीवेळा अपघातांनाही सामोरं जावं लागलं होतं. भारतात गेल्या काही वर्षांत झालेल्या अपघातांमुळे Mi-17V5 हेलिकॉप्टर्स चर्चेत आली होती.
25 जून 2013 - उत्तराखंडमध्ये आलेल्या पुरानंतर मदतकार्यात सहभागी झालेल्या Mi-17V-5 हेलिकॉप्टरला अपघात झाला होता, तेव्हा त्यावरील 20ही जणांचा मृत्यू झाला होता.
6 ऑक्टोबर 2017 - अरुणाचल प्रदेशात Mi-17 V5 हेलिकॉप्टरच्या अपघातात सात जणांचा मृत्यू झाला होता.
3 एप्रिल 2018 - Mi-17 V5 हेलिकॉप्टरचं केदारनाथमध्ये क्रॅश लँडिंग करावं लागलं होतं, त्यात काही जणांना किरकोळ दुखापती झाल्या होत्या.
Mi-17 V5 आधुनिक बनावटीची असून, त्यातील रडार आणि इतर यंत्रणाही अत्यंत अद्ययावत आहेत. त्यामुळेच व्हीआयपी स्क्वाड्रनमध्येही त्यांचा समावेश केला जातो - म्हणजे अतिमहत्त्वाच्या व्यक्तींच्या प्रवासासाठीही त्यांचा वापर केला जातो. एवढी ही सुरक्षित मानली जातात. एवढ्या सर्रास वापर होत असल्यानंच अपघातांमध्येही या हेलिकॉप्टर्सचं नाव येणं साहजिक असल्याचं तज्ज्ञ सांगतात.
दरम्यान, भारतीय हवाई दलानं एप्रिल 2019मध्ये Mi-17V-5 हेलिकॉप्टर्सच्या रिपेअरिंग आणि देखरेखीसाठी चंदीगडमध्ये एक केंद्रही स्थापन केलं होतं.
लष्कराच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या होलिकॅाप्टर प्रवासाचे नियम
- दोन पेक्षा जास्त जनरल रॅंकचे अधिकारी एकत्र प्रवास करू शकत नाहीत.
- दोन इंजिन असलेलं हेलिकॅाप्टर प्रवासासाठी आवश्यक.
- सुरक्षा तपासणी अत्यंत महत्त्वाची.
- ठराविक आणि ठरलेल्या वेळीच प्रवासाची परवानगी. ही वेळ बदलली जात नाही.
- हवामान आणि महिन्या प्रमाणे प्रवास निश्चित असतो.
- ज्या ठिकाणी उतरणार किंवा तिथून उड्डाण घेणार त्या ठिकाणी इंधनाचा यांचा पुरेसा असावा.
- आपात्कालीन परिस्थितीत ambulance आणि वैद्यकीय मदतीची तयारी असावी.
हे वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)








