Omicron व्हेरियंट कसा शोधला जातोय?

फोटो स्रोत, Getty Images
गेल्या एक-दोन दिवसांतल्या बातम्या ऐकल्यात? 'आफ्रिकेतून आलेल्या 100 जणांच्या पुन्हा तपासण्या करणार', 'काही जण पॉझिटिव्ह आहेत, पण त्यांना ओमिक्रॉन संसर्ग आहे का ते तपासणार' किंवा 'जीनोम सिक्वेंन्सिंग करणार'...
का करतायत या सगळ्या गोष्टी? हा ओमिक्रॉन आधीचा व्हेरियंट्सपेक्षा वेगळा कसा आहे? तो कसा शोधतात आणि जीनोम सिक्वेंन्सिगचा या सगळ्याशी काय संबंध?
या प्रश्नांची उत्तरं 7 मुद्दयांमधून समजून घेऊया.
पहिला मुद्दा - तपासणी कशी केली जाते?
कोव्हिडची लक्षणं वाटत असतील किंवा कोव्हिड झालेल्या कुणाच्या संपर्कात आपण आलो तर आपल्याला हा संसर्ग झालाय का, हे तपासण्यासाठी करावी लागते - RT PCR टेस्ट.
ज्यामध्ये नाकातून वा घशातून एका स्वॉबवर सँपल घेतलं जातं.
हे सँपल जातं लॅबमध्ये, जिथे तुम्हाला कोरोना व्हायरसचा संसर्ग झालाय का, याचा शोध घेतला जातो. ओमिक्रॉनसाठीची प्राथमिक पायरीही हीच आहे.
लॅबमध्ये यानंतर या विषाणूचा जेनेटिक म्हणजे जीन - गुणसूत्रांचा अभ्यास करून हा कोणता व्हेरियंट आहे, हे ठरवलं जातं.

फोटो स्रोत, Getty Images
ओमिक्रॉन किंवा मग डेल्टा किंवा कोणत्या व्हेरियंटचा संसर्ग झालाय हे अँटीजेन टेस्ट किंवा मग रॅपिड टेस्टिंग किटद्वारे शोधलं जाऊ शकत नाही.
जीनोम सिक्वेन्सिंग म्हणजे काय?
सॅंपल्समधल्या विषाणूंच्या गुणसूत्रांचा अभ्यास करून शास्त्रज्ञ हा कोणता व्हेरियंट आहे ते ठरवतात.
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त, 1
कोरोनाचा मूळ विषाणू, त्यामध्ये बदल म्हणजे म्युटेशन्स होऊन तयार झालेले बीटा, डेल्टा, डेल्टा प्लस यासारखे व्हेरियंट्स यांच्याबद्दल आतापर्यंतच्या अभ्यासामुळे बरीच माहिती उपलब्ध आहे.
म्हणजे या सगळ्यांची वैशिष्ट्य एकमेकांची पडताळून पाहात हा पूर्वीचा व्हेरियंट आहे की नवीन ओमिक्रॉन आहे हे शोधलं जातं. सोबतच या अभ्यासामुळे विषाणूचा हा व्हेरियंट किती धोकादायक ठरू शकतो, याचाही अभ्यास केला जातो.
डेल्टा आणि ओमिक्रॉनमध्ये काय फरक आहे?
भारत सरकारने दिलेल्या माहितीनुसार फेब्रुवारी 2021मध्ये आढळलेल्या डेल्टा व्हेरियंटमध्ये स्पाईक प्रोटीनमध्ये 8 म्युटेशन्स आढळली होती.
आता स्पाईक प्रोटीन म्हणजे काय... तर एखाद्या विषाणूच्या बाह्यभागावर असणारं टोकदार आवरण - स्पाईक्स. यालाच S Protien असंही म्हटलं जातं.
याच एस प्रोटीनच्या मदतीने व्हायरसला होस्ट सेल म्हणजे पेशीमध्ये शिरता येतं आणि त्यामुळे इन्फेक्शन होतं.
या ओमिक्रॉन व्हेरियंटमध्ये अनेक वेगवेगळ्या प्रकारची म्युटेशन्स म्हणजे बदल आढळलेत, जे पूर्वी आढळले नव्हते. आणि यातले बरेचसे बदल हे या व्हायरसच्या स्पाईक प्रोटीनवर आहेत. आणि हीच काळजीची गोष्ट आहे... कारण लशीद्वारे याच स्पाईक प्रोटीन्सना टार्गेट केलं जातं.

फोटो स्रोत, Getty Images
आता डेल्टा - डेल्टा प्लस आणि ओमिक्रॉन यातला फरक म्हणजे ओमिक्रॉनमध्ये S जीन आढळत नाही. याला S - Gene Dropout असं म्हटलं जातंय. त्यामुळे जर चाचण्यांमध्ये सँपलमध्ये एस जीन आढळलं... तर तो ओमिक्रॉन नसून यापूर्वीचा कोणतातरी व्हेरियंट आहे.
पण जर एस जीन सँपलमध्ये आढळलं नाही, तर तो कदाचित ओमिक्रॉन असू शकतो. आणि मग याची खातरजमा करण्यासाठी संपूर्ण जीन अॅनालिसीस केला जातो.
डेल्टा आणि ओमिक्रॉन जास्त संसर्गक्षम कोण?
तसं पहायला गेलं तर ओमिक्रॉनबद्दल अजून खूप काही गोष्टी समजायच्या आहेत.
भारतामध्ये कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमध्ये लोकांना डेल्टा व्हेरियंटचा संसर्ग झपाट्याने झाला होता. आणि या डेल्टापेक्षा ओमिक्रॉनची लागण होण्याची भीती जास्त आहे, परिणामी जगातली रुग्णसंख्या वाढण्याची भीती असल्याचं जागतिक आरोग्य संघटनेनं म्हटलंय.
महाराष्ट्राच्या कोव्हिड टास्कफोर्सचे प्रमुख डॉ. संजय ओक बीबीसी मराठीशी बोलताना म्हणाले, "व्हायरसचे नवे-नवे व्हेरियंट येत गेले तर कदाचित अजून सहा महिन्यात संपेल असं वाटत नाही. ओमिक्रॉन व्हेरियंटने अनेक देशात डेल्टा व्हेरियंटची कमी कालावधित जागा घेतलीये. त्यामुळे आपण पुढचे दोन आठवडे पडताळून पहाणं गरजेचं आहे."
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त, 2
मात्र, त्याचबरोबर डॉ. ओक म्हणाले, "लोकांनी घाबरून जाण्याची गरज नाही. भारत आणि महाराष्ट्रात कोणतीही गोष्ट हाताबाहेर गेलेली नाही."
कोणत्या व्हेरियंटचा संसर्ग गंभीर आहे - ओमिक्रॉन की डेल्टा?
ओमिक्रॉन व्हेरियंटविषयीचं संशोधन आत्ता कुठे सुरू झालंय. त्यामुळे याविषयीची भरपूर माहिती आपल्याकडे नाही.
पण या ओमिक्रॉनची लक्षणं डेल्टा किंवा इतर व्हेरियंट्सपेक्षा वेगळी असल्याचं दक्षिण आफ्रिकेतले तज्ज्ञ म्हणतायत.
दक्षिण आफ्रिकेत सध्या ज्यांना ओमिक्रॉनची लागण झाली आहे ते बहुतेक रुग्ण तरूण आहेत आणि त्यांना सौम्य लक्षणं आढळतायत.
या रुग्णांना अंग आणि स्नायू दुखी होती, पण यापैकी कोणाच्या नाकाचा वास गेला नाही किंवा तोंडाची चव गेली नाही. ही कदाचित ओमिक्रॉनची लक्षणं असू शकतात पण सध्या हे ठामपणे म्हणता येणार नसल्याचं तज्ज्ञ सांगतायत.
ओमिक्रॉन डेल्टा व्हेरियंटची जागा घेणार का?
डेल्टा व्हेरियंट भारतात पहिल्यांदा आढळला होता. इथल्या दुसऱ्या लाटेसाठी डेल्टा व्हेरियंटच कारण असल्याचं म्हटलं गेलं. जगात सध्या आढळणाऱ्या 90 टक्के नवीन केसेससाठी डेल्टा व्हेरियंट कारणीभूत आहे.

फोटो स्रोत, Getty Images
जगातल्या 163 देशांमध्ये डेल्टा व्हेरियंट पसरलाय. तर सध्या 12 देशांमध्ये ओमिक्रॉन आढळलेला आहे.
ओमिक्रॉन डेल्टाला संपवणार का?
महाराष्ट्राच्या कोव्हिड टास्कफोर्सचे सदस्य डॉ. शशांक जोशी बीबीसी मराठीशी बोलताना म्हणाले, "शक्यता आहे की हा नवा व्हेरियंट डेल्टाला संपवून टाकेल. हा जास्त पसरणारा असला तरी खूप घातक वा गंभीर नसेल. ओमिक्रॉन डेल्टाचा प्रभाव संपवून कमी रोगकारक बनेल का ? असं झालं तर नक्कीच चांगली गोष्ट आहे. अपेक्षा करूयात की डेल्टाची जागा हा नवीन व्हेरियंट घेईल जो कमी घातक आणि कमी जीवघेणा आहे."
तर येत्या काही दिवसांतली दक्षिण आफ्रिकेतली स्थिती पाहूनच मग हा ओमिक्रॉन किती घातक आहे, तो किती भयंकर ठरू शकतो हे स्पष्ट होईल, असं इतर काही तज्ज्ञ म्हणतायत.
हे वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त, 3
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)








