अवनी लेखरानं पॅरा शूटिंग वर्ल्ड कपमध्ये जिंकलं सुवर्णपदक

अवनि लेखारा

फोटो स्रोत, REUTERS/Issei Kato

टोकियो पॅरालिम्पिक चॅम्पियन अवनी लेखरा हिने पॅरा शूटिंग वर्ल्ड कपमध्ये सुवर्णपदक जिंकलं आहे. अवनीने फ्रान्समध्ये महिला 10 मीटर एअर रायफल स्पर्धेतलं हे सुवर्णपदक 250.6 स्कोअरसह जिंकलं आहे.

20 वर्षीय अवनीने स्वतःचाच 249.6 स्कोअरचा जागतिक विक्रम मोडला. या विजयासह अवनीने 2024च्या पॅरिस पॅरालिम्पिकमध्ये स्थान मिळवलं आहे.

फ्रान्सच्या ज्या पॅरा शूटिंग वर्ल्ड कपमध्ये सुवर्णपदक जिंकलं, त्याच स्पर्धेत पोलंडच्या एमिला बाबस्कानं रौप्यपदक जिंकलं आहे. एमिलाचा स्कोअर 247.6 होता. ब्रॉन्झ मेडल स्वीडनच्या अना नोर्माननं जिंकलं आहे. तिचा स्कोअर 225.6 होता.

टोकियो पॅरालिम्पिकमध्ये पदकाची कमाई

टोकियो पॅरालिम्पिकमध्ये भारताच्या अवनी लेखराने दोन पदकांची कमाई केली होती. 50 मीटर एअर रायफल प्रकारात तिनं कांस्य पदक जिंकलं होतं आणि 10 मीटर एअर रायफलमध्ये सुवर्ण पदक जिंकलं होतं.

19 वर्षीय अवनी पॅरालिम्पिकमध्ये सुवर्ण पदक मिळवणारी पहिली भारतीय महिला ठरली. अवनीने संयम राखत 249.6 पॉईंटसह विश्व विक्रमाची बरोबरी केली आणि पदकही जिंकलं.

चीनच्या कुइपिंग झांगने 248.9 पॉईंट मिळवत रजत पदक जिकलं आणि यूक्रेनच्या इरियाना शेकेत्निकने कांस्य पदक जिंकलं होतं.

अवनी लेखराने सामन्याची सुरुवात वेगवान केली. तिने 10 पॉईंटसह आपल्या खेळात सातत्य राखलं.

स्पर्धेच्या पहिल्या फेरीत केवळ दोन वेळेला अवनीला 10 पॉईंटपेक्षा कमी स्कोअर करता आला. यामुळे ती पहल्या फेरीत दुसऱ्या क्रमांकावर होती.

नॉक आऊट राऊंडमध्ये अवनी अव्वल राहिली आणि तिने आपल्या प्रतिस्पर्ध्यांवर चांगली मात केली. अखेर 249.6 पॉईंटसह अवनीने सामना जिंकला.

यापूर्वी पात्रता फेरीत 621.7 स्कोअर करत अवनी सातव्या क्रमांकावर राहिली.

कोण आहे अवनी?

अवनी मूळची जयपूर शहरात राहणारी आहे. तिने कायद्याचे शिक्षण घेतलं आहे.

2012 मध्ये झालेल्या एका कार अपघातानंतर ती स्पायनल कॉर्डसंदर्भातील एका आजाराने ग्रस्त आहे. या अपघातानंतर ती केवळ व्हिलचेअरनेच चालू शकते. पण ती थांबली नाही. शूटिंगसाठी तिने आपल्या प्रयत्नांत सातत्य राखलं.

साधारण 2015 पासून अवनीने शूटिंगचा सराव सुरू केला. जयपूरमधील जगतपूरा क्रीडा संकुलात अवनी सराव करत होती.

अवनीने क्रीडा क्षेत्रात जावं ही तिच्या वडिलांची इच्छा होती. सुरुवातीला अवनीने शूटींग आणि तिरंदाजी दोन्हीसाठी प्रयत्न केला. पण तिला शूटिंगमध्ये अधिक रस होता. अभिनव बिंद्रा यांच्या कामगिरीमुळे तिला प्रेरणा मिळाल्याचं ती सांगते.

टोकियो पॅरालिम्पिकमध्ये सुवर्ण पदक जिंकणं ही तिची इच्छा होती जी आता पूर्ण झाली आहे.

हे वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)