पुणे : मटण, बिर्याणी मोफत घरी आणून द्या म्हणणाऱ्या पोलीस अधिकाऱ्याची ऑडिओ क्लिप व्हायरल

प्रातिनिधिक फोटो

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, प्रातिनिधिक फोटो

पुणे पोलीस दलातील झोन एकच्या पोलीस उपायुक्त प्रियंका नारनवरे यांची एक कथित ऑडिओ क्लिप सध्या व्हायरल होत आहे. ज्यात त्या त्यांच्या कार्यक्षेत्रात येणाऱ्या एका हॉटेलमधून बिर्याणी आणि प्रॉन्स मोफत घरी पाठवून द्यायला सांगत असल्याचं ऑडिओ क्लिपमध्ये ऐकू येत आहे.

दरम्यान, ही ऑडिओ क्लिप मॉर्फ केलेली आहे. याविरोधात सायबर क्राईमकडे तक्रार करणार असल्याचं प्रियंका नारनवरे यांनी बीबीसी मराठीला सांगितलं आहे.

ऑडिओ क्लिलमध्ये काय आहे?

कथित ऑडिओ क्लिपमध्ये महिला पोलीस अधिकारी आणि पोलीस कर्मचाऱ्यांमध्ये संवाद आहे.

त्यात महिला अधिकारी विश्रामबागच्या हद्दीत नॉन व्हेज चांगलं कुठे मिळतं असं विचारतात. त्यावर पोलीस कर्मचारी एका बिर्याणी हॉटेलबाबत माहिती सांगतो. त्यावर ती पाठवून द्या, असे त्या पोलीस अधिकारी म्हणतात.

त्यावर आपण पैसे देऊन गोष्टी घेतो असं तो कर्मचारी म्हणतो.

त्यावर पीआयला सांगा. आपल्या हद्दीतील असेल तर पे का करायचं? आपल्या हद्दीतील गोष्टीसाठी कोण पे करतं का? असं त्या महिला अधिकारी कर्मचाऱ्याला म्हणतात.

त्यानंतर कर्मचाऱ्याला मटण बिर्याणी आणि प्रॉन्स घरी पाठवून द्यायला सांगतात.

एका वरिष्ठ पोलीस अधिकारी महिलेची ही ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्याने पुणे पोलीस दलात हा चर्चेचा विषय झाला आहे. महिला पोलीस अधिकाऱ्याची तक्रार एका कर्मचाऱ्याने डीजीपी ऑफिसला सुद्धा केली होती.

यावर प्रतिक्रिया देताना गृहमंत्री दिलीप वळसे पाटील म्हणाले, "ती ऑडिओ क्लिप मी ऐकली आहे. ही बाब गंभीर आहे. मी पोलीस आयुक्तांना चौकशी अहवाल तयार करायला सांगितला आहे. तो आल्यानंतर राज्य सरकार निर्णय घेईल"

याबाबत पुण्याचे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांना पुण्यातील आढावा बैठकीनंतर पत्रकारांनी विचारले असता त्यांनी बोलण्यास नकार दिला.

हे वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)