नवऱ्याचे स्पर्म मिळवण्यासाठी महिलेनं का घेतली कोर्टात धाव?

प्रातिनिधिक फोटो

फोटो स्रोत, EPA

    • Author, सुशीला सिंह
    • Role, बीबीसी प्रतिनिधी

वडोदऱ्यातील स्टर्लिंग हॉस्पिटलनं गुजरात हायकोर्टाच्या आदेशावरून कोव्हिड-19 ची लागण झालेल्या एका रुग्णाचं स्पर्म (वीर्य) त्यांच्याकडं जमा करून संरक्षित करून ठेवलं आहे.

रुग्णाच्या पत्नीनं दाखल केलेल्या याचिकेवर कोर्टानं हा आदेश दिला होता.

या रुग्णाचं वीर्य संरक्षित केल्यानंतर गुरुवारी (22 जुलै) त्यांचा मृत्यू झाला.

त्यापूर्वी महिलेचे वकील नीलय एच पटेल यांनी बीबीसीबरोबर बोलताना माहिती दिली. ''महिलेच्या पतीची तब्येत कोव्हिडमुळं खूप बिघडली होती. पतीचं वीर्य सुरक्षित जमा करून ठेवावं अशी त्यांची इच्छा होती. त्यासाठी त्यांनी रुग्णालयात तशी इच्छा व्यक्त केली. रुग्णालयानं त्यासाठी पतीची सहमती गरजेची असल्याचं म्हटलं. पण त्यांचे पती सहमती देण्याच्या अवस्थेतच नव्हते. त्यामुळं महिलेनं कोर्टात धाव घेतली.''

वकील नीलय पटेल यांच्या मते, या दाम्पत्याच्या विवाहाला जवळपास आठ महिने झाले होते. ते कॅनडामध्ये राहत होते. पण वडिलांची तब्येत खराब झाल्यानं रुग्ण पत्नीसह कॅनडाहून बडोद्याला आला होता. त्याठिकाणी त्यांना कोव्हिडची लागण झाली. त्या व्यक्तीचं वय अंदाजे 30 वर्षे होतं.

प्रातिनिधिक फोटो

फोटो स्रोत, PA Media

फोटो कॅप्शन, प्रातिनिधिक फोटो

रुग्ण 45 दिवसांपूर्वी आमच्या रुग्णालयात दाखल झाले होते, असं स्टर्लिंग रुग्णालयाचे विभागीय संचालक अनिल नांबियार यांनी बीबीसीबरोबर बोलताना सांगितलं.

''गेल्या काही दिवसांत त्यांचे अनेक अवयव निकामी झाले. रुग्णाची जिवंत राहण्याची शक्यता अत्यंत कमी होती. त्याबाबत आम्ही रुग्णाच्या कुटुंबाला वारंवार माहितीही देत होतो. त्यानंतर रुग्णाच्या पत्नीनं आम्हाला पतीचं वीर्य संरक्षित करून ठेवता येऊ शकतं का? अशी विचारणा केली.

हा प्रश्न समोर आल्यानंतर डॉक्टरांच्या पथकानं हे शक्य आहे का, याबाबत विचार केला. तसंच कायद्याच्या दृष्टीनं ते योग्य ठरेल का? याचाही विचार करण्यात आला,'' असंही नांबियार म्हणाले.

अनिल नांबियार

फोटो स्रोत, अनिल नांबियार

फोटो कॅप्शन, अनिल नांबियार

रुग्णाच्या सहमतीशिवाय असं करणं चुकीचं ठरू शकतं, असं ते म्हणाले. आम्ही चर्चा केली तर TESE प्रक्रियेद्वारे रुग्णाच्या शरिरातून वीर्य घेता येणं शक्य असल्याचं समोर आलं. पण त्याची परवानगी कशी मिळणार हा प्रश्न कायम होता. त्यानंतर या महिलेनं कोर्टात धाव घेतली. कोर्टानंही काही मिनिटांमध्येच परवानगी दिली आणि आम्हीही उशीर न लावला स्पर्म कलेक्शन करून ते संरक्षित करण्याची प्रक्रिया पूर्ण केली, असं त्यांनी सांगितलं.

आता महिला आयव्हीएफ किंवा एआरटीची प्रक्रिया केव्हा करणार याबाबत त्या निर्णय घेतील.

प्रातिनिधिक फोटो

फोटो स्रोत, Getty Images

आयव्हीएफ तंत्राद्वारे वीर्यातील शुक्राणू आणि महिलांच्या अंडाशयातील अंडी हे प्रयोगशाळेत एका परीक्षानळीत मिसळले जातात. त्यानंतर भ्रूण आईच्या गर्भात सोडलं जातं.

हेही वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)