महाराष्ट्र पाऊस: पुराने कशी केली नागरिकांची वाताहत, बचावकार्य कसं सुरू आहे? पाहा फोटो गॅलरी

कोल्हापूर बचावकार्य

फोटो स्रोत, Swati patil/bbc

महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून जोरदार पाऊस होत आहे. परिणामी, नद्या-नाले तुडुंब भरून वाहत असून काही ठिकाणी पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे.

पश्चिम महाराष्ट्र आणि विशेषतः कोकण भागाला पाऊस आणि पुराचा जोरदार फटका बसलेला आहे.

चिपळूणमध्ये वशिष्ठी नदीने धोक्याची पातळी ओलांडल्याने शहरात 8 ते 10 फूट पाणी शिरल्याचं दिसून आलं. गेल्या वर्षीप्रमाणेच यंदाही पंचगंगा नदीला आलेल्या पुराने कोल्हापूर शहराला विळखा घातला.

पाणी राष्ट्रीय महामार्गावर पसरल्याने पुणे-बंगळुरू वाहतूक ठप्प झाली आहे. वाहनाच्या रांगांच्या रांगा या परिसरात पाहायला मिळत आहे.

या पार्श्वभूमीवर नागरिकांची मदत आणि बचावकार्यासाठी NDRF ला पाचारण करण्यात आलं आहे.

कशी आहे या भागातील नेमकी परिस्थिती? पाहूया फोटोंच्या माध्यमातून...

कोल्हापूरच्या शिवाजी पूल परिसराला पुराच्या पाण्याने वेढले आहे. पाण्यात अडकलेल्या नागरिकांचं बचावकार्य वेगाने सुरू आहे. NDRF ने पाण्यातून सोडवलेल्या आजीबाईंना सुरक्षित स्थळी नेतानाचं हे छायाचित्र.

कोल्हापूर

फोटो स्रोत, Swati patil/bbc

एका खांद्यावर मुलाला बसवून एका हातात पिशवी पकडून त्याला सुरक्षित स्थळी पोहोचवणाऱ्या जवानाचं कौतुक करावं तेवढं कमी आहे.

कोल्हापूर

फोटो स्रोत, Swati patil

चिपळूण शहराला यंदाच्या वर्षी पुराचा जोरदार फटका बसला. काही ठिकाणी 10 ते 15 फूट पाणी साचलं होतं. पूर आता ओसरू लागला आहे. पण पुरामुळे झालेली विदारक स्थिती पूर्ववत करण्यास आणखी काही वेळ लागू शकतो.

चिपळूण पूर

फोटो स्रोत, Mushtaq khan/bbc

पुराचं पाणी घरात शिरल्याने चिपळूणमध्ये अनेक घरांमधील सामानाचं नुकसान झालं आहे. पूर ओसरल्यानंतर नागरीक घरांकडे परतत असून अशा प्रकारे सामान बाहेर काढत आहेत.

चिपळूण पूर

फोटो स्रोत, Mushtaq khan/bbc

पुराचा फटका बसलेल्या भागातील घरांमध्ये अशा प्रकारे सर्वत्र चिखलाचं साम्राज्य पसरल्याचं दिसून येतं.

चिपळूण पूर

फोटो स्रोत, Mushtaq khan/bbc

घरात ठिकठिकाणी जमा झालेला चिखल, राडारोडा आता स्वच्छ कसा करायचा, हा प्रश्न नागरिकांना पडला आहे.

चिपळूण पूर

फोटो स्रोत, Mushta khan/bbc

पुराने शहरातील घरांची अशी वाताहत केली आहे.

चिपळूण पूर

फोटो स्रोत, Mushta khan/bbc

पुणे-बंगळुरू महामार्गाला पाण्याचा विळखा बसल्याने वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली. महामार्गावर वाहनांच्या अशा प्रकारे रांगा लागल्या आहेत.

वाहनांच्या रांगा

फोटो स्रोत, Swati patil/bbc

पुराचा फटका बसून अनेक ठिकाणी घरांची पडझड झाल्याचंही पाहायला मिळालं.

चिपळूण पूर

फोटो स्रोत, Mushtaq khan/bbc

नागरिकांना यामुळे प्रचंड नुकसानीला तोंड द्यावं लागलं आहे.

चिपळूण पूर

फोटो स्रोत, Mushtaq khan/bbc

परिसरातील नागरिक या संकटकाळी एकत्र येऊन एकमेकांची मदत करताना दिसत आहेत. परिस्थिती पूर्ववत करण्यासाठी सर्वजण अहोरात्र मेहनत घेत आहेत.

चिपळूण पूर

फोटो स्रोत, Mushtaq khan/bbc

हेही वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)