महाराष्ट्र पाऊस: चिपळूण-खेडमध्ये पूरपरिस्थिती, राज्यात अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाचं थैमान

चिपळूण

फोटो स्रोत, SACHIN SHINDE

गेल्या चोवीस तासांमध्ये रत्नागिरी, कोल्हापूर, अकोला अशा विविध जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस झाला आहे. कोकणात चिपळूण आणि खेड परिसरात पुराचा तडाखा बसला असून नागरिकांना सुरक्षित बाहेर काढण्यासाठी NDRF आणि हवाई मार्गाने बचाव कार्य सुरू झाले आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्रातील पावसाच्या परिस्थितीबद्दल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा केली. केंद्राकडून आवश्यक मदत पुरवण्याबाबत त्यांनी मुख्यमंत्र्यांना आश्वासन दिलं आहे.

X पोस्टवरून पुढे जा, 1
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

X पोस्ट समाप्त, 1

मुसळधार पावसामुळे आपत्ती व्यवस्थापन सतर्क झाले आहे. NDRF ची 9 पथके रवाना करण्यात आली आहेत.

रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण आणि खेड शहरामध्ये पुराचा पाणी शिरलं आहे. भरती आणि अतिवृष्टीची वेळ एकत्र आल्यामुळे खेड आणि चिपळूणमध्ये परिस्थिती गंभीर झाली. अनेक लोक अपार्टमेंटमध्ये अडकले आहेत.

X पोस्टवरून पुढे जा, 2
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

X पोस्ट समाप्त, 2

चिपळूण आणि खेडमधील सद्य:स्थिती

  • बचाव कार्यासाठी सध्या खाजगी 6, कस्टम 1, पोलीस 1, नगरपरिषद 2, तहसील कार्यालयाच्या 5 बोटी मदत करत आहेत.
  • हवाई दलाचे दोन हॅलिकॉप्टर तैनात असून हवामान अनुकूल झाल्यास हॅलिकॉप्टरद्वारे तात्काळ बचावकार्य करण्यात येणार आहे.
  • नौदलालाही मदतीसाठी विंनती करण्यात आली असून त्यांची टिम लवकरात लवकर पोहोचेल असं सांगण्यात येत आहे.
  • एनडीआरएफचे 5 बोटींसह 23 जणांचे पथक चिपळूण येथे पोहोचत आहे. रत्नदुर्ग माऊंटेनिअर्सचे 12 जणांचे पथक रस्सी, लाईफ जॅकेटसह बचाव कार्यासाठी चिपळूण येथे हजर आहे. 'राजू काकडे हेल्प फाऊंडेशन' चे 10 जणांचे पथक खेड व चिपळूण येथे पोहोचत आहे. जिद्दी माऊंटेनिअर्सचे पथकही बचावकार्यासाठी पोहोचत आहे.
चिपळूण

फोटो स्रोत, SACHIN SHINDE

  • प्रशासनाकडून ट्रकद्वारे रत्नागिरीहून 2, दापोलीहून 2, गुहागरवरुन 2 बोटी चिपळूणकडे बचावकार्यासाठी रवाना झाल्या आहेत.
  • आतापर्यंत पुरामध्ये अडकलेल्या सुमारे 100 नागरिकांची सुटका करण्यात आली असून पुराच्या पाण्यातून सुरक्षित बाहेर आलेल्या नागरिकांसाठी चिपळूण व सावर्डे येथील शैक्षणिक संस्थांच्या इमारतीमध्ये निवारा व्यवस्था करण्यात आली आहे.
  • चिपळूणच्या आजूबाजूची 7 गावं पुराच्या पाण्याखाली असून सदर गावातील नागरिकांना पुराच्या पाण्यातून बाहेर काढण्याचे काम एनडीआरएफ व बचाव पथकाद्वारे सुरु आहे.
  • सद्यस्थितीमध्ये चिपळूण व खेड तालुक्यात कोणतीही मनुष्यहानी नाही. परशुराम घाट तसेच मुंबई-गोवा महामार्गावर पुराचे पाणी असल्याने तेथील वाहतूक बंद करण्यात आली आहे.
  • खारेपाटण येथील रस्त्यावर पुराच्या पाण्याची पातळी जास्त असल्याने सिंधुदूर्ग जिल्ह्याकडे जाणारी वाहतूक बंद करण्यात आली आहे.
  • भरती साधारण रात्री 11 वाजता सुरु होणार असल्याने सद्यस्थितीत पुराखाली नसलेल्या भागांना सर्तकतेचा इशारा देण्यात आला आहे.

मुख्यमंत्र्यांच्या बैठकीत काय झाले?

यासंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नुकतीच बैठक बोलावली होती. या भागातील परिस्थितीचा आढावा यावेळी घेण्यात आला. मुख्यमंत्र्यांनी आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा आणि इतर विभागांना तातडीने बचाव कार्य सुरू करण्याच्या सूचना दिल्या आहेत.

रत्नागिरी जिल्ह्यात पुराचा तडाखा

फोटो स्रोत, BBC/MUSHTAQ SHEIKH

फोटो कॅप्शन, रत्नागिरी जिल्ह्यात पुराचा तडाखा

तसंच नद्यांच्या पातळीत वाढ होत असल्याने स्थानिकांनी खबरदारी घेत प्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहन उद्धव ठाकरे यांनी केलं आहे.

कोव्हिड रुग्णांसाठी पर्यायी व्यवस्था केली जाईल असंही ते म्हणाले.

चिपळूण
फोटो कॅप्शन, चिपळूण शहराला पावसाचा जोरदार तडाखा बसला आहे.

या बैठकीत नद्यांच्या पातळीची परिस्थिती सुद्धा सांगण्यात आली. रत्नागिरी जिल्ह्यातील जगबुडी नदीची धोका पातळी 7 मीटर असून सध्या ती 9 मीटरवरुन वाहते आहे.

वशिष्ठी नदीची धोका पातळी 7 मीटर असून ती 7.8 मीटरवरुन वाहते आहे.

काजळी नदी धोका पातळीच्या 1.74 मीटरवरुन वाहत असून कोदवली, शास्त्री, बावनदी या नद्यांनीही धोक्याची पातळी ओलांडली आहे.

यामुळे खेड, चिपळूण, लांजा, राजापूर, संगमेश्वर या भागातील स्थानिकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

रत्नागिरी जिल्ह्यात पुराचा तडाखा

फोटो स्रोत, BBC/MUSHTAQ SHEIKH

रायगड जिल्ह्यातही कुंडलिका नदीनेही धोका पातळी ओलांडल्याने पूरजन्य परिस्थिथी आहे.

रत्नागिरीमधून 1, पोलीस विभागाकडील 1 व कोस्टगार्डची 1 बोट अश्या 3 बोटी रेस्क्यू ऑपरेशनसाठी पाठवल्या आहेत.

'आतापर्यंतचा सर्वात भयानक पूर'

पुण्यातून NDRF च्या दोन टीम पुणे ( खेड साठी 1 व चिपळूण साठी 1)येथून रेस्क्यू ऑपरेशनसाठी निघालेल्या आहेत.

आतापर्यंतचा हा सर्वाधिक भयानक पूर असल्याचं चिपळूणचे आमदार भास्कर जाधव यांनी सांगितलं आहे. ते म्हणाले, "NDRF आणि इतर सुरक्षा पथकं पोहचत आहेत. नगरपालिकेच्या बोटी आता पोहचत आहे. वीज नाहीय. अनेर रुग्ण रुग्णालयात अडकून पडले आहेत. पाण्याची पातळी कमी होण्याची गरज आहे.

तर दुसऱ्या बाजूला पाऊस आणि पाण्याची पातळी अधिक असल्याने NDRF पथकांना पोहचण्यास विलंब होत असल्याची माहिती पालकमंत्री उदय सामंत यांनी दिली.

महाराष्ट्र

तटरक्षक रक्षक दलाला हेलिकॉप्टर मदतीसाठी समन्वय करणेत येत आहे, याबद्दलची माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी दिली आहे.

'पूर्व तयारी का केली नाही?'

रत्नागिरी जिल्ह्यात पुराचा तडाखा बसू शकतो असा इशारा देण्यात आला होता तरीही प्रशासनाने आवश्यक ती खबरदारी घेतली नाही अशी टीका विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी केली आहे.

प्रवीण दरेकर, भाजप

फोटो स्रोत, Getty Images

ते म्हणाले, "कोकणात सलग मुसळधार होणार असल्याची माहिती वेधशाळेने दिली होती. तसंच पूर्वीप्रमाणे परिस्थिती उद्भवू शकते, लोक पाण्यात अडकू शकतात अशी शक्यता असून सुद्धा तयारी करण्यात आली नाही. NDRF चे काही बेसकॅम्प कोकणात असावेत अशी आम्ही मागणी केली होती. त्याची दखल घेण्यात आली नाही."

कोल्हापूरमध्ये पाण्याची पातळी वाढली

कोल्हापूर जिल्ह्यात पूर परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. पंचगंगा नदीची पाणीपातळी 36 फुटांवर पोहोचली असून अनेक सखल भागात पाणी साठायला सुरुवात झाली आहे.

अलमट्टी धरणातून 97 हजार क्यूसेक्स पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. पूरपरिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी मदत होणार आहे. पंचगंगा नदीकाठच्या काही भागात स्थलांतरला सुरुवात झाली असून नागरिकांना सुरक्षित स्थळी जाण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.

तसेच 77 बंधारे पाण्याखाली गेल्याने जिल्ह्यातील काही गावांचा संपर्क तुटला आहे. जिल्हा प्रशासनाकडून खबरदारी म्हणून NDRFला पाचारण करण्यात आले असून दुपारपर्यंत पथक जिल्ह्यात दाखल होणार आहे.

कोल्हापूर रत्नागिरी राज्यमार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. रस्त्यावर पाणी आल्याने अनेक मार्ग बंद करावे लागले आहेत. तर, ठाणे जिल्ह्यातल्या कल्याण, बदलापूर इथे उल्हास नदीचं पाणी शहरात शिरण्यास सुरुवात झाली.

रत्नागिरी जिल्ह्यात पुराचा तडाखा

फोटो स्रोत, SACHIN SHINDE

उल्हास नदीने धोक्याची पातळी ओलांडल्याने वांगणी - बदलापूर दरम्यान रेल्वे ट्रॅकवर पाणी आलं असून इथली रेल्वे वाहतूक ठप्प झालीय. कर्जतमध्ये रस्त्यावर आणि घरांमध्ये उल्हास नदीचं पाणी शिरायला लागलंय.

इथे अनेक ठिकाणी इमारतींमधली वाहनं पूर्णतः पाण्यात गेलीयत. तर, कल्याण जवळच्या खाडीतलं पाणी वाढल्याने स्थानिक म्हशीच्या गोठ्यांमध्ये पाणी शिरलं. यामुळे सगळ्याच म्हशींना रस्त्यावर आणावं लागलंय.

अकोला जिल्ह्यात शेतीचे मोठे नुकसान

काल अकोला जिल्ह्यात ढगफुटीसदृश्य पाऊस झाला. मुसळधार पावसामुळं शहरातील वस्त्यांमध्ये पाणी शिरले तर खडकी भागातील न्यू खेताण या परिसरातील 30 घरं पाण्याखाली आले आहे.

स्थानिक नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे. अकोला जिल्ह्यात गेल्या 24 तासात 202.9 मिलीमिटर पावसाची नोंद झाली आहे.

पावसामुळे अकोला जिल्ह्यातील शेतीचही मोठं नुकसान झालं आहे. शेतांमध्ये पाणी साचले आहे, शेती खरडून निघाली आहे.

पूर परिस्थितीमुळे जिल्ह्यातील बहुतांश भागातील बत्ती गुल आहे. काल रात्रीपासून बचाव पथक तैनात आहे. तर नागपूरहून विशेष बचाव पथकाला पाचारण करण्यात आलं आहे.

X पोस्टवरून पुढे जा, 3
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

X पोस्ट समाप्त, 3

संततधार पावसाने नांदेडच्या सहस्त्रकुंड इथल्या धबधब्याला रौद्र रूप प्राप्त झालं आहे. सध्या नांदेड, हिंगोली आणि यवतमाळ जिल्ह्यात जोरदार पाऊस पडत आहे.

त्यामुळे पैनगंगा नदीचे पात्र दुथडी भरून वाहतेय, त्यामुळे सहस्रकुंड धबधब्याचे असे दुर्मिळ दृश्य आज सकाळपासून पाहायला मिळत आहे.

महाबळेश्वर तालुक्याला पावसाचा तडाखा

मुसळधार पावसाचा जोरदार तडाखा महाबळेश्वर तालुक्याला बसला असून तालुक्यातील जनजीवन आता विस्कळीत होऊ लागले आहे.

महाबळेश्वर परिसरांत गेल्या 48 तासांत 480 मीमी पावसाची नोंद झाली आहे. त्यामुळे सावित्री आणि इतर नद्यांची पातळी सातत्यने वाढत आहे.

मुसळधार पावसाने महाबळेश्वरचा वेण्णा तलाव काल पासूनच ओसंडून वाहू लागल्याने तलावाचे सर्व पाणी बाहेर रस्त्यावर आल्याने काल काही काळ महाबळेश्वर कडून पाचगणीकडे जाणारी वाहतूक ठप्प झाली होती नंतर ही वाहतूक संथगतीने सुरू आहे.

महाबळेश्वर तालुक्याच्या आजूबाजूला असणाऱ्या गावांमध्येसुद्धा मोठ्या प्रमाणात शेतांमध्ये पाणी शिरू लागले आहे.

प्रतापगड भागातसुद्धा पावसाचा जोर अधिक असल्याने या भागातील चतुरबेट पूल आता पाण्याखाली गेला आहे. हा पूल पाण्याखाली गेल्याने जवळपास 15 गावांचा संपर्क आता तुटला आहे.

मध्य रेल्वेची वाहतूक ठप्प

मुख्यतः मध्य रेल्वेची वाहतूक ठप्प झाल्याने अतिमहत्त्वाच्या सेवेत काम करणाऱ्यांना आपलं कार्यालय गाठणं अशक्य झालं.

21 जुलैच्या रात्री इगतपुरी ते कसारा दरम्यान रेल्वे ट्रकवर दरड कोसळली. यामुळे इथून मुंबईकडे जाणारी रेल्वे वाहतूक खोळंबली.

X पोस्टवरून पुढे जा, 4
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

X पोस्ट समाप्त, 4

उंबरमाळी रेल्वे स्थानकाजवळ ही घटना घडलीय. सध्या ही दरड हटवण्याचं काम सुरू आहे. कोकणातल्या प्रत्येक जिल्ह्यात मुसळधार पाऊस झालाय.

रेल्वे वाहतूक

पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यात रात्रभर मुसळधार पाऊस झाला. मंचर भिमाशंकर महामार्गावरील पोखरी घाटात दरड कोसळल्याने रस्ता वाहतुकीसाठी बंद करण्यात आला होता.

रस्ता मोकळा करण्याचे काम युद्ध पातळीवर करण्यात आले. दरड बाजूला करून रस्ता सुरळीत करण्यात प्रशासनाला यश आले आहे. आंबेगाव तालुक्यात 3 ठिकाणी दरड कोसळली आहे.

हे वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)