मुंबई पाऊस: मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत

पाऊस

फोटो स्रोत, Getty Images

शनिवार आणि रविवारप्रमाणेच सोमवारीही (19 जुलै) बरसणाऱ्या पावसामुळे राज्यातील अनेक ठिकाणी जनजीवन विस्कळीत झालं आहे.

मुसळधार पावसामुळे चिखल वाहून आल्यामुळे कोकण रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे.

गोवा राज्यात कारवारजवळ करमाळी आणि थिविम स्थानकांदरम्यानच्या ओल्ड गोवा बोगद्यात माती, चिखलगाळ रेल्वे मार्गावर वाहून आलं आहे.

यामुळे या मार्गावरील ट्रेन्सचं वेळापत्रक कोलमडलं आहे.

या मार्गावर धावणाऱ्या ट्रेन्स विविध स्थानकांमध्ये नियंत्रित करण्यात आल्याची माहिती कोकण रेल्वेने दिली आहे. काही ट्रेन्स पर्यायी मार्गाने वळवण्यात येणार आहेत तर काही ट्रेन्सच्या वेळांमध्ये बदल करण्यात येतील अशी माहिती कोकण रेल्वने दिली आहे.

हझरत निझामुद्दीन-एर्नाकुलम, अमृतसर-कोचूवेली, एर्नाकुलम-एलटीटी, कोचूवेली-पोरबंदर, एर्नाकुलम-अजमेर या ट्रेन्स पर्यायी मागाने धावतील.

X पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

X पोस्ट समाप्त

दरम्यान मुंबई आणि उपनगरांमध्ये आजही पावसाचा जोर राहील असा अंदाज वेधशाळेने वर्तवला आहे.

पावसामुळे मध्य रेल्वेवरील विक्रोळी-कांजुरमार्ग स्थानकांदरम्यान पाणी साचलं आहे. वाहतूक 15-20 मिनिटांसाठी खोळंबली होती मात्र आता पूर्ववत सुरू झाल्याची माहिती मध्य रेल्वेने दिली आहे.

मुंबई, कोकण, पाऊस

फोटो स्रोत, PUNIT PARANJPE

फोटो कॅप्शन, प्रातिनिधिक फोटो

ठाणे-कल्याण, कल्याण- कर्जत तसंच खोपोली, कल्याण-कसारा या मार्गावरील वाहतूक सुरू आहे.

हार्बर, ट्रान्स हार्बर, बेलापूर-नेरुळ मार्गावरील वाहतुकही सुरू असल्याचं मध्य रेल्वेने स्पष्ट केलं आहे.

पाऊस

फोटो स्रोत, Getty Images

19 ते 22 जुलै या कालावधीसाठी मुंबई, ठाणे, पालघरला ऑरेंज अलर्ट देण्यात आलाय.

सोलापूर, लातूर, उस्मानाबाद, पुणे, सातारा, सांगली, नांदेड, बीड, जालना, औरंगाबाद, नाशिक, धुळे, जळगाव आणि परभणीत मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आलीय.

सातारा जिल्ह्यात काल दिवसभरापासून आज सोमवार सकाळी 10 वाजेपर्यंत सरासरी एकूण 8.2 मि.मी.पाऊस पडला असून आतापर्यंत सरासरी 90.7 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे.

मुंबई, कोकण, पाऊस

फोटो स्रोत, BBC/ Shahid Shaikh

फोटो कॅप्शन, मुंबईत सोमवारीही पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्राला पाणीपुरवठा करणारा विहार तलाव रविवारी सकाळी ९ वाजता भरुन‌‌ वाहू लागला आहे‌. तुळशी तलाव तीन दिवसांपूर्वी म्हणजे 16 जुलैला भरुन वाहिला होता.

मुंबईत पश्चिम उपनगरांमध्ये पाऊस सुरू आहे. यामुळे पश्चिम द्रुतगती महामार्गावर वाहतूक कोंडी पाहायला मिळते आहे. रस्त्यातले खड्डे आणि पाणी यामुळे वाहतूक कूर्म गतीने सुरू आहे.

हे वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)