महाराष्ट्र पाऊस : राज्यात अतिवृष्टीमुळे गेल्या 24 तासात 57 जणांचा मृत्यू

फोटो स्रोत, Defense PRO
महाराष्ट्रात पावसामुळे झालेल्या दुर्घटनांमध्ये गेल्या 24 तासात 57 जणांचा मृत्यू झाला आहे.
यात रायगड 47, सातारा 4, मुंबई उपनगर 4, सिंधुदुर्ग 2 जणांचा मृत्यू झाला आहे.
राज्यात गेल्या 24 तासात 45 जण बेपत्ता आहेत. त्यात सातारा 4, रायगड 39 आणि ठाण्यातील 2 जणांचा समावेश आहे
राज्यात गेल्या 24 तासात रत्नागिरी 1200, सातारा मधून 27 तर ठाणे जिल्ह्यातून 2681 अशा एकूण 3908 जणांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलं आहे.
राज्यात गेल्या 24 तासात आठ जिल्ह्यांना अतिवृष्टीमुळे फटका बसला आहे. यात कोल्हापूर, रायगड, सांगली, सातारा, रत्नागिरी, ठाणे,मुंबई उपनगर, सिंधुदुर्ग या जिल्ह्यांचा समावेश आहे.
तळये गावात दरड कोसळून 36 जणांचा मृत्यू
रायगड जिल्ह्यातील महाड तालुक्यातील तळये गावात दरड कोसळून 36 जणांचा मृत्यू झाला आहे, तर पोलादपुरातील सुतारवाडी गावात दरड कोसळून 11 जणांचा मृत्यू झाला आहे.
राज्यातील अतिवृष्टीमुळे दरड कोसळून दुर्घटनेत मृत्यूमुखी पडलेल्यांच्या वारसांना प्रत्येकी 5 लाख रुपयांची मदत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जाहीर केली आहे. तर जखमींवर शासकीय खर्चाने उपचार करण्यात येईल, असंही त्यांनी जाहीर केलं आहे.
रायगड जिल्ह्यात तळीये मधलीवाडी (ता. महाड), गोवेले साखरसुतारवाडी, केवनाळे (दोन्ही ता. पोलादपूर) येथे त्याचप्रमाणे, रत्नागिरी जिल्हयात खेड, सातारा जिल्ह्यात पाटण तालुक्यातील मिरगांव, आंबेघर, हुंबराळी, ढोकवळे तसेच वाई तालुक्यातील कोंडवळी आणि मोजेझोर अशा एकूण 10 ठिकाणी दरडी कोसळून मृत्यू झाले आहेत.

या मृतांच्या वारसांना प्रत्येकी पाच लाख रुपये मदत जाहीर करण्यात आली आहे. तसेच या दुर्घटनांमधील जखमींच्या उपचाराचा खर्च शासनातर्फे करण्यात येईल.
रायगड जिल्हा माहिती कार्यालयानं पावसामुळे झालेल्या नुकसानीची माहिती देताना सांगितलं,
- महाड तालुक्यातील आकले भोराव मध्ये जीवितहानी झालेली नाही, सर्व सुरक्षित आहेत. परंतु अंदाजे 20 गुरे वाहून गेलीत. नुकसान जास्त झाले आहे, कपडे,अन्नधान्य काहीच राहिले नाही.
- महाड तालुक्यातील तळीये गावामध्ये काल रात्री दरड कोसळली होती. आज सकाळी येथे एनडीआरएफ आणि स्थानिक नागरिकांच्या मदतीने बचावकार्याला सुरुवात झाली.
- आतापर्यंत मातीच्या ढिगाऱ्याखालून 36 मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. तर आणखी 30 ते 40 जण या ठिकाणी अडकले असण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.
- या दरडीखाली 30 ते 35 घरे दबल्याची भीती होती. मात्र पूरपरिस्थितीमुळे सर्व रस्ते बंद असल्याने बचावकार्य सुरु करण्यात आले नव्हते. आज सकाळी पूराचे पाणी ओसरायला लागल्यानंतर लगेचच या ठिकाणी स्थानिकांच्या व एनडीआरएफच्या मदतीने बचावकार्य सुरु करण्यात आले.
- कर्जत तालुक्यातील कोंडिवडे-पशुवैद्यकीय दवाखाना-2 यांच्या कार्यक्षेत्रातील सांगवी गावातील 4 खेचर, 17 बकऱ्या 2 वासरु, पाण्यात बूडून मृत्यूमुखी पडले आहेत.
या घटनास्थळी दहा ते बारा रुग्णवाहिका, तसंच एनडीआरएफची पथकंही इथं दाखल झाली आहेत.
मुख्यमंत्र्यांनी घेतला आढावा
कोकण किनारपट्टी, पश्चिम महाराष्ट्र तसंच राज्यात ठिकठिकाणी अतिवृष्टीमुळे निर्माण झालेल्या आपत्कालीन परिस्थितीचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मंत्रालयातील नियंत्रण कक्षास भेट देऊन आढावा घेतला.
रायगड जिल्ह्यातील महाड तालुक्यातील दरड कोसळण्याच्या दोन दुर्घटनेतील मृतांबाबत त्यांनी शोक व्यक्त केला.

फोटो स्रोत, @CMOMaharashtra
अशाप्रकारे डोंगर उतारांवरील गावे व वस्त्या येथील रहिवाशांनी प्रशासनास स्थलांतर करण्यासाठी योग्य ते सहकार्य करावं, असंही आवाहन त्यांनी केलं.
पुढील दोन ते तीन दिवस हवामान विभागानं दिलेला इशारा लक्षात घेऊन प्रशासन आणि नागरीक यांनी दक्षता घ्यावी, असेही निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले.
नरेंद्र मोदींचं मदतीचं आश्वासन
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी रायगड जिल्ह्यातील दरड कोसळण्याच्या घटनांवर ट्वीट केलं आहे.
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
X पोस्ट समाप्त, 1
मोदींनी म्हटलं, "महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्यात दरड कोसळून झालेल्या जीवितहानीबद्दल अत्यंत क्लेश वाटला. मृतांच्या कुटुंबियांप्रती सहवेदना. जखमी व्यक्ती लवकर बऱ्या व्हाव्यात ही सदिच्छा.
"महाराष्ट्रातील अतिवृष्टीच्या स्थितीवर लक्ष असून पावसाचा फटका बसलेल्याना आवश्यक ती मदत पुरवली जात आहे."
पोलादपुरात दरड कोसळून 11 जणांचा मृत्यू
रायगड जिल्ह्यातील पोलादपूरमधील सुतारवाडी परिसरात दरड कोसळून 11 जणांचा मृत्यू झाला आहे, तर 13 जण जखमी झाले आहेत.

फोटो स्रोत, NDRF
महाराष्ट्र सरकारच्या विनंतीनंतर नौदलाचे जवान पूरग्रस्तांच्या मदतीसाठी हजर झाले आहेत. रत्नागिरी आणि रायगड जिल्ह्यातील लोकांच्या मदतीसाठी नौदलाचे सात चमू रवाना झाले आहेत.
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
X पोस्ट समाप्त, 2
जिल्हाधिकारी निधी चौधरी यांच्या माहितीनुसार, एनडीआरएफच्या पथकाला या घटनेबाबत माहिती दिली आहे. मुसळधार पावसामुळे मोठ्या प्रमाणात महाड तालुक्यात ठिकठिकाणी पाणी साचलं आहे. त्यामुळे घटनास्थळी पोहोचण्यास प्रशासनाला अडथळा येत असल्याचं जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितलं.

फोटो स्रोत, ANI
दुसरीकडे, रायगडच्या पालकमंत्री आदिती तटकरे यांनी एएनआयला दिलेल्या माहितीनुसार, महाराष्ट्र सरकारनं केंद्र सरकारकडे मदतची मागणी केलीय.
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
X पोस्ट समाप्त, 3
महाडमध्ये पावसाच्या पाण्यात अडकलेल्यांच्या मदतीसाठी लष्कराच्या मदतीची मागणी करण्यात आलीय.
संजय मोहिते, पोलीस महानिरीक्षक, कोकण रेंज यांनी, "चिपळूण आणि महाडमधून पाणी कमी होण्यास सुरुवात झाली आहे. खेडमध्ये दरड कोसळण्याच्या तीन घटना निदर्शनास आल्या आहेत. याबाबत पुढील माहिती घेण्याचं काम सुरू आहे. महाड आणि चिपळूणमध्ये काही लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलंय. रेस्क्यू करण्यात आलं", अशी माहिती दिली आहे.
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
X पोस्ट समाप्त, 4
'कोकणात कम्युनिकेशन आणि दळणवळण पूर्णपणे थांबलेलं आहे. माणगावहून पुढे जाण्याचा आम्ही प्रयत्न करतोय, परंतु रस्त्यावर पाणी भरलेलं असल्याने पुढे जाता येत नाही! परिस्थिती पाहता, चिपळूणसह ज्या ज्या ठिकाणी जास्त पाणी भरलेलं आहे, तिथे वेळेत मदत पोहोचणं आवश्यक आहे.' असं ट्वीट विधानपरिषदेतील विरोधीपक्षनेते प्रवीण दरेकर यांनी केलं आहे
NDRF कडून बचावकार्य सुरू
NDRF कडून नागरिकांना सुखरूप वाचवण्यासाठी पूर्ण प्रयत्न केला जाईल, आमची पथकं घटनास्थळी पोहोचत आहेत, अशी माहिती एनडीआरएफचे महासंचालक सत्य नारायण प्रधान यांनी दिली. त्यांनी तसं ट्वीट केलं आहे.
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
X पोस्ट समाप्त, 5
कालपासून (22 जुलै) रायगड, रत्नागिरी, कोल्हापूर, अकोला अशा विविध जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस झाला आहे. कोकणात चिपळूण आणि खेड परिसरात पुराचा तडाखा बसला असून रायगडमधील महाड-पोलादपूर भागात मोठा फटका बसला आहे.
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
X पोस्ट समाप्त, 6
मुसळधार पावसामुळे आपत्ती व्यवस्थापन सतर्क झाले आहे. NDRF ची 9 पथके रवाना करण्यात आली आहेत. नागरिकांना सुरक्षित बाहेर काढण्यासाठी NDRF आणि हवाई मार्गाने बचाव कार्य सुरू झाले आहे.
महाड MIDC मधील कारखान्यात स्फोट
महाड MIDC मधील विनोती ऑरगॅनिक या कारखान्यात रात्रीच्या सुमारास स्फोट झाला. या स्फोटानंतर भीषण आग लागली.
रात्री आग आटोक्यात आल्यनंतर सकाळी पुन्हा आग भडकली.
अतिवृष्टीमुळे एमआयडीसीतील कारखाने बंद असताना आगीमुळे लगतच्या गावांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झालं आहे.
दरम्यन, एमआयडीसीतील अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झालं आहे.
पुरामुळे घटनास्थळी पोहोचण्यात अडथळा
मोठ्या प्रमाणात पाणी साचल्यानं रस्ते पूर्णपणे पाण्याखाली गेलेत. त्यामुळे NDRF च्या पथकांना घटनास्थळी पोहोचण्यास अडथळा येतोय, अशीही माहिती पालकमंत्री आदिती तटकरे यांनी दिली.
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
X पोस्ट समाप्त, 7
रात्री एक वाजताच्या माहितीनुसार रायगड जिल्ह्यातील कुंडलिका आणि सावित्री या दोन नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली आहे. कुंडलिका नदी प्रामुख्यानं रोहा तालुक्यातून, तर सावित्री नदी प्रामुख्यानं महाडमधून वाहते.
कोल्हापुरात पुराची काय स्थिती?
सांगली-कोल्हापूर बायपास रस्ता वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे, तर पन्हाळा रस्ता खचून वाहून गेल्यामुळे या मार्गावरील वाहतूक बंद केली आहे. पंचगंगा नदीची पातळी 51 फुटांवर गेली आहे. यमगर्णी व निपाणी येथे रस्त्यावर पाणी आल्याने पुणे बेंगलोर हायवे बंद झाला आहे. पुणे बेंगलोर हायवे वाहतुकीसाठी बंद केल्याने वाहने रस्त्यावरच थांबली आहेत.
गारगोटीकडून गडहिंग्लजकडे जाणाऱ्या मार्गावरील पालघाट या ठिकाणी अतिवृष्टीमुळे दरडी कोसळल्या आहेत.

फोटो स्रोत, Twitter/@KOLHAPUR_POLICE
तसंच, पाण्याच्या मोठ्या प्रवाहामुळे दगड-धोंडे, खडक घाटातील रस्त्यावर आल्याने रस्ता वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद झालेला आहे. डोंगरातील पाण्याचे मोठे लोंढे घाटातील रस्त्यावर आडवे वाहत आहेत.
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
X पोस्ट समाप्त, 8
गारगोटी -कोल्हापूर, गारगोटी-गडहिंग्लज, गारगोटी -कडगाव हे सर्व मार्ग बंद झाले. गारगोटीचा कोल्हापूर जिल्ह्यातील इतर भागाशी संपर्क खंडित झाला आहे.
पुणे-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर पाणी आल्याने वाहतूक बंद करण्यात आलीय.
कोयना धरणातून पाण्याचा विसर्ग
कोयना धरणामधून आज (23 जुलै 2021) सकाळी 8 वाजता सांडव्यावरुन 9567 क्युसेक्स विसर्ग (2 फुट) आणि पायथा विद्युत गृहातून 2100 क्युसेक्स असा एकूण 11667 क्युसेक्स विसर्ग नदीपात्रात सोडण्यात आला आहे.
तर सकाळी 10 वाजता विसर्ग वाढवून 50000 क्युसेक(5 फुट) इतका करण्यात येणार आहे.
चिपळूण आणि खेडमधील स्थिती
रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण आणि खेड शहरामध्ये पुराचा पाणी शिरलं आहे. भरती आणि अतिवृष्टीची वेळ एकत्र आल्यामुळे खेड आणि चिपळूणमध्ये परिस्थिती गंभीर झाली. अनेक लोक अपार्टमेंटमध्ये अडकले आहेत.
- बचाव कार्यासाठी सध्या खाजगी 6, कस्टम 1, पोलीस 1, नगरपरिषद 2, तहसील कार्यालयाच्या 5 बोटी मदत करत आहेत.
- हवाई दलाचे दोन हॅलिकॉप्टर तैनात असून हवामान अनुकूल झाल्यास हॅलिकॉप्टरद्वारे तात्काळ बचावकार्य करण्यात येणार आहे.
- नौदलालाही मदतीसाठी विंनती करण्यात आली असून त्यांची टिम लवकरात लवकर पोहोचेल असं सांगण्यात येत आहे.
- एनडीआरएफचे 5 बोटींसह 23 जणांचे पथक चिपळूण येथे पोहोचत आहे. रत्नदुर्ग माऊंटेनिअर्सचे 12 जणांचे पथक रस्सी, लाईफ जॅकेटसह बचाव कार्यासाठी चिपळूण येथे हजर आहे. 'राजू काकडे हेल्प फाऊंडेशन' चे 10 जणांचे पथक खेड व चिपळूण येथे पोहोचत आहे. जिद्दी माऊंटेनिअर्सचे पथकही बचावकार्यासाठी पोहोचत आहे.

फोटो स्रोत, SACHIN SHINDE
- प्रशासनाकडून ट्रकद्वारे रत्नागिरीहून 2, दापोलीहून 2, गुहागरवरुन 2 बोटी चिपळूणकडे बचावकार्यासाठी रवाना झाल्या आहेत.
- आतापर्यंत पुरामध्ये अडकलेल्या सुमारे 100 नागरिकांची सुटका करण्यात आली असून पुराच्या पाण्यातून सुरक्षित बाहेर आलेल्या नागरिकांसाठी चिपळूण व सावर्डे येथील शैक्षणिक संस्थांच्या इमारतीमध्ये निवारा व्यवस्था करण्यात आली आहे.
- चिपळूणच्या आजूबाजूची 7 गावं पुराच्या पाण्याखाली असून सदर गावातील नागरिकांना पुराच्या पाण्यातून बाहेर काढण्याचे काम एनडीआरएफ व बचाव पथकाद्वारे सुरु आहे.
- सद्यस्थितीमध्ये चिपळूण व खेड तालुक्यात कोणतीही मनुष्यहानी नाही. परशुराम घाट तसेच मुंबई-गोवा महामार्गावर पुराचे पाणी असल्याने तेथील वाहतूक बंद करण्यात आली आहे.
- खारेपाटण येथील रस्त्यावर पुराच्या पाण्याची पातळी जास्त असल्याने सिंधुदूर्ग जिल्ह्याकडे जाणारी वाहतूक बंद करण्यात आली आहे.
- भरती साधारण रात्री 11 वाजता सुरु होणार असल्याने सद्यस्थितीत पुराखाली नसलेल्या भागांना सर्तकतेचा इशारा देण्यात आला आहे.
पंतप्रधान आणि मुख्यमंत्र्यांमध्ये चर्चा
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्रातील पावसाच्या परिस्थितीबद्दल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा केली. केंद्राकडून आवश्यक मदत पुरवण्याबाबत त्यांनी मुख्यमंत्र्यांना आश्वासन दिलं आहे.
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
X पोस्ट समाप्त, 9
हे वाचलंत का?

YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)