कोरोना : जपाननं मॉडर्ना लशीचा वापर रोखला, 15 लाख डोस परत मागवले

फोटो स्रोत, Getty Images
मॉडर्नाच्या कोरोना लशीच्या डोसमध्ये संक्रमणाचे संकेत मिळाल्यानंतर जपाननं या ओकिनावा प्रांतात या लशीचा वापर रोखला आहे.
गेल्या आठवड्यात मॉडर्ना लशीमुळे संभाव्य संक्रमाणाची शंका आल्यानं जपाननं या लशीचे 15 लाख डोस परत मागवले होते. या लशी लसीकरण केंद्रापर्यंत पोहोचल्याही होत्या. मात्र, त्यानंतर त्या पुन्हा मागवण्यात आल्या.
जपानमध्ये मॉडर्ना लशीचा दुसरा डोस घेतल्यानंतर दोन जणांचा मृत्यू झाल्याची घटना घडलीय. या दोन्ही व्यक्तींचं वय 30 वर्षांच्या आसपास होतं.
या मृत्यूच्या कारणांची चौकशी संबंधित अधिकारी करत आहेत. मात्र, लशीमुळेच हे मृत्यू झालेत की आणखी कुठल्या कारणाने हे अद्याप स्पष्ट झाले नाहीय.
मॉडर्ना लशीला भारतात मर्यादित वापरासाठी परवानगी
मॉडर्ना या आंतरराष्ट्रीय लशीला भारतामध्ये आणीबाणीच्या काळातल्या मर्यादित वापरासाठीची जूनच्या शेवटच्या आठवड्यात परवानगी देण्यात आली आहे. नीति आयोगाचे सदस्य डॉ. व्ही. के. पॉल यांनी याविषयीची घोषणा केली होती.
या लशीचे दोन डोस घ्यावे लागतील.

फोटो स्रोत, Getty Images
मॉडर्ना लशीला परवानगी मिळाल्यामुळे आता भारतामध्ये कोव्हिड-19 साठीच्या एकूण 4 लशी उपलब्ध असतील.
कोव्हिशील्ड आणि कोव्हॅक्सिन लशींचा वापर करत भारतातली लसीकरण मोहीम आधीच सुरू झाली होती. त्यानंतर रशियातल्या गामालयाने तयार केलेल्या स्पुटनिक - व्ही लशीलाही भारतात परवानगी देण्यात आलेली आहे.
मॉडर्ना ही देशातली चौथी लस असेल.
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
X पोस्ट समाप्त
भारतामध्ये सिप्ला ही औषध उत्पादक कंपनी मॉडर्ना लशींची आयात करणार आहे.
अमेरिका किंवा इतर देशांमध्ये चाचण्या केलेल्या ज्या लशींना तिथे मान्यता देण्यात आलेली आहे, अशा लशींना भारतातल्या वापरासाठीची परवानगी देताना भारतात वेगळ्याने चाचण्या करणं गरजेचं ठेवणार नसल्याचं भारत सरकारने म्हटलं होतं.
मॉडर्ना लशीला त्यानुसारच मर्यादित वापरासाठीची परवानगी देण्यात आली आहे.
ही लस देण्यात येणाऱ्या पहिल्या 100 व्यक्तींविषयीची माहिती औषध नियामकांकडे सादर करावी लागेल आणि त्यानंतरच या लशीला मोठ्या प्रमाणावरच्या वापरासाठीची परवानगी मिळेल.

कोव्हिड -19 रोखण्यामध्ये मॉडर्ना लस 90% परिणाामकारक असल्याचं चाचण्यांमध्ये आढळलं होतं. ही एक mRNA प्रकारची लस आहे. म्हणजे ही लस कोरोना विषाणूच्या जेनेटिक कोडचा एक भाग शरीरात इंजेक्ट करते.
हा भाग व्हायरल प्रोटीन्स तयार करायला सुरूवात करतो, जे शरीराच्या प्रतिकारशक्तीला विषाणू संसर्गाविरुद्ध प्रशिक्षित करण्यासाठी पुरेसे असतात.
अमेरिकेमध्ये डिसेंबर 2020 मध्ये या लशीला परवानगी देण्यात आली.
अमेरिकेसह अनेक इतर देशांनी या मॉडर्नाच्या लशीच्या चाचण्या सुरू असतानाच डोसेसची ऑडर्र दिलेली होती.
मॉडर्नाच्या लशीचं बहुतांश उत्पादन केंब्रिज आणि मॅसेच्युसेट्समध्ये होतंय.
हे वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)








