Reliance: 'लवकरच खूप स्वस्त फोन बाजारात आणू'

फोटो स्रोत, ANI
रिलायन्स इंडस्ट्रीजच्या वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये जिओफोन नेक्स्टची घोषणा करण्यात आली.
गुगलच्या सोबतीने विकसित करण्यात आलेला हा फोन 'मोस्ट अफोर्डेबल' म्हणजे सर्वांत परवडण्याजोगा असेल, असं रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांनी म्हटलंय.
ते म्हणाले, "देशातील डिजिटल डिव्हाईड म्हणजेच तंत्रज्ञानातील गरीब आणि श्रीमंतीची दरी मिटवण्यासाठी आम्ही जिओ फोन घेऊन आलो होतो. आता गुगलसोबत मिळून जिओ एक स्वस्त स्मार्टफोन घेऊन येत आहे, ज्याचं नाव असेल जिओफोन नेक्स्ट. या फोनमध्ये जिओ आणि गुगलचे सगळे अॅप्लिकेशन्स असतील."
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
X पोस्ट समाप्त
या फोनमध्ये अँड्रॉईड ऑपरेटिंग सिस्टीम असेल आणि 10 सप्टेंबरपासून हा फोन उपलब्ध होईल, असंही त्यांनी सांगितलं.
रिलायन्सच्या वार्षिक सर्वसाधारण सभेमधील प्रमुख मुद्दे-
- रिलायन्स इंडस्ट्रीज नवीन ऊर्जा उद्योगामध्ये पुढच्या 3 वर्षांमध्ये 10 अब्ज डॉलर्सची गुंतवणूक करेल. यासाठी 5000 एकरांवर 'ग्रीन एनर्जी गिगा कॉम्प्लेक्स'ची स्थापना करण्यात येईल. जगातल्या अनेक अक्षय्य ऊर्जा उत्पादक प्रकल्पांपैकी हा एक प्रकल्प असेल.
- गेल्या काही काळापासून चर्चेत असलेला सौदी अरामकोसोबतचा 15 अब्ज डॉलर्सचा करार यावर्षी नक्की होईल. यानंतर सौदी अरामकोचे अध्यक्ष आणि यासिर अल-रुमाय्यान हे रियायन्स इंडस्ट्रीच्या संचालक मंडळात स्वतंत्र संचालक म्हणून सहभागी होतील.
- गेल्या काही वर्षांत जिओ फायबर 20 लाखांहून अधिक नवीन परिसरापर्यंत पोहोचलं आहे. 30 लाख वापरकर्त्यांसह जिओ फायबर हे देशातील सर्वाधिक मोठं आणि वेगानं वाढणारं ब्रॉडबॅण्ड ऑपरेटर ठरलं आहे.
रिलायन्स फाऊंडेशनच्या संस्थापक नीता अंबानी यावेळी म्हणाल्या. "रिलायन्सनं कर्मचाऱ्यांसाठी राबवलेली लसीकरणाची मोहीम ही देशातील सगळ्यात मोठी कॉर्पोरेट लसीकरण मोहीम होती. यात 20 लाखांहून अधिक कर्मचारी, निवृत्त कर्माचरी आणि त्यांच्या कुटुंबीयांचं मोफत लसीकरण करण्यात आलं."
हेही पाहिलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)








