कोरोना : न्यूझीलंडच्या उच्चायोगाने ऑक्सिजनसाठी काँग्रेसकडे मागितली मदत, मग म्हणाले 'सॉरी'

ऑक्सिजन मदत

फोटो स्रोत, @srinivasiyc

भारतातील न्यूझीलंड उच्चायोगाने रविवारी (2 मे) एक ट्वीट केलं आणि बघता बघता या ट्वीटची सोशल मीडियावर बरीच चर्चा सुरू झाली.

न्यूझीलंड उच्चायोगाच्या अधिकृत ट्वीटर हँडलवरून हे ट्वीट करण्यात आलं होतं. त्यांनी ट्वीटवरून दिल्लीचे युवक काँग्रेस अध्यक्ष श्रीनिवास बीव्ही यांच्याकडे मदतीची याचना केली होती.

या ट्वीटमध्ये म्हटलं होतं, "श्रीनिवासजी, तुम्ही न्यूझीलंड उच्चायोगासाठी तात्काळ एका ऑक्सिजन सिलेंडरची व्यवस्था करू शकता का?"

मात्र, थोड्याच वेळात हे ट्वीट डिलीट करण्यात आलं.

जुनं ट्वीट डिलीट केल्यानंतर उच्चायोगाने काही वेळातच नवीन ट्वीट केलं. या नवीन ट्वीटमध्ये म्हटलं होतं, "आम्ही ऑक्सिजनची व्यवस्था करण्यासाठी सर्व प्रकारचे प्रयत्न करतोय. दुर्दैवाने आम्ही केलेल्या आवाहनाला चुकीच्या संदर्भात सादर करण्यात आलं. यासाठी आम्ही माफी मागतो."

X पोस्टवरून पुढे जा, 1
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

X पोस्ट समाप्त, 1

न्यूझीलंड उच्चायोगाने जुनं ट्वीट काढून टाकलं असलं तरी काही वेळातच युवक काँग्रेस ऑक्सिजन सिलेंडर घेऊन उच्चायोगात पोहोचले आणि उच्चायोगानेही मदतीचा स्वीकार केला.

X पोस्टवरून पुढे जा, 2
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

X पोस्ट समाप्त, 2

परराष्ट्र मंत्रालयाचं निवेदन

या संपूर्ण प्रकरणावर परराष्ट्र मंत्रालयाने निवेदन प्रसिद्ध करत उच्चायोग किंवा दूतावासाने ऑक्सिजनसह आवश्यक सामुग्रीचा साठा करू नये, असा सल्ला दिला आहे.

निवेदनात म्हटलं आहे, "प्रोटोकॉलचे प्रमुख आणि अधिकारी सातत्याने उच्चायोग आणि दूतावासांच्या संपर्कात आहेत. परराष्ट्र मंत्रालय त्यांच्या गरजांकडे लक्ष ठेवून आहे. विशेषतः कोव्हिड संबंधी गरजांकडे. सर्वांना विनंती आहे की त्यांनी ऑक्सिजनसह आवश्यक सामानाचा साठा करू नये."

X पोस्टवरून पुढे जा, 3
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

X पोस्ट समाप्त, 3

यापूर्वी फिलिपिंस उच्चायोगानेही युवक काँग्रेसकडे ऑक्सिजन सिलेंडरसाठी मदत मागितली होती. त्यावेळी परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर आणि यूपीए सरकारमध्ये पर्यावरण मंत्री असलेले जयराम रमेश यांच्यात ट्वीटरवरून खडाजंगीही झाली होती. एस. जयशंकर यांनी त्याला 'चीप पब्लिसिटी स्टंट' म्हटलं होतं.

देशाची राजधानी असलेल्या दिल्लीत ऑक्सिजनचा मोठा तुटवडा आहे. दररोज हॉस्पिटलकडून ऑक्सिजन तुटवड्याचे SOS जारी केले जातात. गेल्या शनिवारी दिल्लीतल्या बत्रा हॉस्पिटलमध्ये ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे 12 रुग्णांचा मृत्यू झाला होता.

दिल्लीत ऑक्सिजन तुटवड्यामुळे रुग्णांचा मृत्यू होण्याची ही तिसरी वेळ होती. त्याआधी दिल्लीतल्या नामांकित सर गंगाराम हॉस्पिटल आणि जयपूर गोल्डन हॉस्पिटलमध्ये ऑक्सिजन पुरवठा थांबल्याने रुग्णांचा मृत्यू झाला होता.

हे वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)