कोरोना: मनमोहन सिंग यांना कोरोनाची लागण, एम्समध्ये दाखल

डॉ. मनमोहन सिंह

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, भारताचे माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह

माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना कोरोनाची लागण झाली आहे. सध्या ते दिल्लीतील एम्स रुग्णालयात दाखल आहेत.

काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी ते लवकरात लवकर बरे व्हावेत अशी सदिच्छा व्यक्त केली आहे.

काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांनी म्हटले आहे की मनमोहन सिंग हे रुग्णालयात दाखल आहेत. ते लवकरात लवकर बरे होऊन घरी परतावेत अशी सदिच्छा मी पूर्ण काँग्रेसच्या वतीने व्यक्त करते.

X पोस्टवरून पुढे जा, 1
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

X पोस्ट समाप्त, 1

मनमोहन सिंग यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र लिहिले होते त्यात त्यांनी कोरोनाविरोधातल्या लढ्याबाबत सूचना दिल्या होत्या. त्यांच्या पत्राला केंद्रीय आरोग्य मंत्री हर्षवर्धन यांनी उत्तर दिले आहे.

'तुमच्या पक्षातले नेते गुपचूप लस घेतात आणि नंतर निंदा करतात'

माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी रविवारी (18 एप्रिल) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून काही सूचना दिल्या होत्या. कोरोनाविरोधातली लढाई कशी जिंकता येईल याबाबत मनमोहन सिंग यांनी पंतप्रधान मोदींना पाच सूचना दिल्या होत्या.

त्या सूचनांना केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी प्रत्युत्तर दिले आहे. सर्वप्रथम त्यांनी मनमोहन सिंग यांचे आभार मानले.

कोरोनाविरोधातल्या लढाईत लसीकरण हे महत्त्वाचं शस्त्र आहे या तुमच्या सूचनेशी आम्ही सहमत आहोत असं हर्षवर्धन म्हणाले.

X पोस्टवरून पुढे जा, 2
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

X पोस्ट समाप्त, 2

लसीकरणाच्या बाबतीत केवळ आकड्यांकडे लक्ष देऊ नका तर लोकसंख्येच्या प्रमाणात करण्यात आलेल्या लसीकरणाची टक्केवारी काढा हा तुमचा सल्ला देखील योग्य आहे, पण तुमच्याच पक्षातील लोक आम्हाला सहकार्य करत नाहीत, अशी खंत हर्षवर्धन व्यक्त केली.

हर्षवर्धन काय म्हणाले?

"तुम्हाला कोरोनाविरोधातल्या लढाईबाबतची समज आहे. पण तुमच्या पक्षातील महत्त्वाच्या पदावरील व्यक्ती तसेच तुमच्या पक्षाने राज्यात स्थापन झालेल्या सरकारमधील व्यक्ती तुमच्या मताशी सहमत नसल्याचं दिसत आहे.

"काही काँग्रेस नेत्यांनी तर सार्वजनिकरीत्या केंद्र सरकारच्या लसीकरण मोहिमेची निंदा केली पण त्यांनी गुपचूप स्वतः लस घेतली. काही नेत्यांच्या लसीबाबतच्या बेजबाबदार व्यक्तव्यांमुळे असं आढळलं आहे, की त्या भागातील वरिष्ठ नागरिकांच्या लसीकरणाचे प्रमाण सरासरीहून कमी आढळले आहे. काँग्रेसकडून आम्हाला सहकार्याची अपेक्षा आहे पण ते होताना दिसत नाहीये.

"तुम्ही देशाचं हित समोर ठेऊन हे पत्र लिहिलं आहे पण ज्या व्यक्तीने हे पत्र ड्राफ्ट केलं आहे त्या व्यक्तीने त्याची जबाबदारी योग्यरीत्या सांभाळली नसल्याचं लक्षात येत आहे. जसं की तुम्ही म्हणालात की कोरोना लसीची आयात करावी. हा निर्णय आमच्या सरकारने 11 एप्रिल रोजीच घेतला आहे. तसेच तुम्ही म्हणालात त्यावर सवलतही देण्यात यावी. याबाबतही आम्ही आधीच निर्णय घेतला आहे.

"पत्रातील काही तथ्यं चुकली जरी असली तरी आम्हाला तुमच्या सद्भावना समजल्या आहेत. तुमच्या विचारांशी आम्ही याबाबत सहमत आहोत. यापुढेही तुम्ही सहकार्य करत राहावे अशी आमची अपेक्षा आहे. पण त्याचबरोबर तुम्ही तुमच्या पक्षातील लोकांनाही चार समजुतीच्या गोष्टी सांगाव्यात अशी अपेक्षा आम्ही ठेवतो."

मनमोहन सिंग यांचं मोदींना पत्र

भारतात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता, माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र पाठवून कोरोनाशी लढण्यासाठी 5 सल्ले दिले.

भारतातील अनेक राज्यांमध्ये हॉस्पिटलमधील बेड्स, ऑक्सिजन सुविधा इत्यादी आरोग्य सुविधांची कमतरता भासू लागली आहे. त्यामुळे दिवसेंदिवस परिस्थिती बिकट होत चालली आहे.

X पोस्टवरून पुढे जा, 3
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

X पोस्ट समाप्त, 3

डॉ. मनमोहन सिंग यांनी लिहिलेल्या पत्रात प्रामुख्यानं लसीकरणाच्या मुद्द्यावर भर दिला. कोरोनाच्या संकटाला दूर करण्यासाठी लसीकरणाचा वेग वाढवण्याची आवश्यकता डॉ. सिंग यांनी व्यक्त केली.

"गेल्या वर्षभरात इतर शहरात राहणाऱ्या आपल्या मुलांना अनेक पालकांनी पाहिलं नाहीय, नातवंडांना आजोबांनी पाहिलं नाहीय, शाळेत मुलांना शिक्षकांनी पाहिलं नाही, अनेकांनी या साथीत आपला जीव गमावला, लाखो लोंना पुन्हा गरिबीच्या खाईत लोटलं गेलंय," असं डॉ. मनमोहन सिंह यांनी पत्रात म्हटलंय.

X पोस्टवरून पुढे जा, 4
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

X पोस्ट समाप्त, 4

एकीकडे देशातली चिंता व्यक्त करतानाच, डॉ. मनमोहन सिंग यांनी पुढे म्हटलंय की, या आरोग्य संकटाशी लढण्यासाठी मी काही सूचना देऊ इच्छित आहे.

डॉ. मनमोहन सिंग यांनी कोणते 5 सल्ले दिलेत?

1) लशींचे नियोजन कसे करावे?

वेगवेगळ्या लसनिर्मिती कंपन्यांकडे किती डोसेसची ऑर्डर देण्यात आलीय आणि पुढच्या सहा महिन्यांसाठी किती लशी डिलिव्हरी करण्यासाठी मंजूर करण्यात आलंय, याची माहिती केंद्र सरकारनं जाहीर केली पाहिजे.

आपण पुढच्या काळात विशिष्ट संख्येत लोकांचं लसीकरण करू इच्छित आहोत, तर आपल्याकडे आधीच लशीच्या डोसेसची संख्या असायला हवी.

2) केंद्र सरकार आणि राज्य सरकार समन्वय

लशींचा संभाव्य पुरवठ्याचं राज्यांमध्ये पारदर्शक फॉर्म्युल्यानुसार कसं वाटप होईल, याचे सरकारने संकेत द्यायला हवेत.

कोरोना टेस्ट

फोटो स्रोत, Getty Images

केंद्र सरकार 10 टक्के लशी आपत्कालीन स्थितीत वाटपासाठी राखून ठेवू शकतं, मात्र त्याव्यतिरिक्त राज्यांना स्पष्ट सांगावं, जेणेकरून ते तसं नियोजन करू शकतील.

कोरोना
लाईन

3) फ्रंटलाईन वर्कर्सची व्याख्या विस्तृत करावी

राज्यांना थोडी सवलत द्यावी, जेणेकरून ते फ्रंटलाईन वर्कर्सची कॅटेगरी तयार करू शकतील. त्यात 45 वर्षे वयाहून कमी वयाचे लोकही असतील. उदाहरणार्थ, शालेय शिक्षक, बस, तीन चाकी आणि टॅक्सीचे चालक, महापालिका आणि पंचायत कर्मचारी, वकील इत्यादींना फ्रंटलाईन वर्कर्स मानलं पाहिजे.

4) एक परवाना तरतूद लागू करावी

गेल्या काही दशकात भारत सर्वांत मोठा लसनिर्माता देश म्हणून पुढे आलाय. मात्र, ही क्षमता अधिकाधिक खासगी क्षेत्रात आहे. सार्वजनिक आरोग्याच्या या आपत्कालीन स्थितीत सरकारनं निधी आणि काही सवलत देऊन लसनिर्मात्यांना अधिकाधिक मदत केली पाहिजे.

लस

यामुळे ते उत्पादन सुविधा वाढवू शकतील. त्याशिवाय, मला वाटतं की, ही वेळ एक अनिवार्य परवाना तरतूद लागू करण्याची आहे, यामुळे कंपन्या एका परवान्यानुसार लस बनवू शकतील. HIV/AIDS शी लढण्यासाठी अशी पद्धत वापरली गेलीय.

5) लशींची आयात करावी

देशांतर्गत पुरवठा मर्यादित असल्यानं, युरोपियन मेडिकल एजन्सी किंवा USFDA यांनी मंजुरी दिलेल्या लशीच्या आयातीसाठी परवानगी दिली पाहिजे.

आपण एका अभूतपूर्व आणीबाणीचा परिस्थितीचा सामना करत आहोत. आपत्कालीन स्थितीत लशींच्या आयातीवर सवलत द्यावी. ही सवलत काही काळासाठीच असावी. यादरम्यान भारतातील ट्रायल्स पूर्ण होतील. या लशी घेणाऱ्यांना इशारा दिला जाऊ शकतो की, परदेशी प्राधिकरणानं या लशीला मंजुरी दिलीय.

हे वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)