महाराष्ट्र लॉकडाऊन : रेल्वेसाठी सरकारची नवी नियमावली काय आहे?

फोटो स्रोत, Getty Images
राज्य सरकारच्या 'ब्रेक द चेन' या उपक्रमाअंतर्गत आता रेल्वे प्रवासासाठी नवी नियमावली जाहीर करण्यात आली आहे.
त्यानुसार, केरळ, गोवा, राजस्थान, गुजरात, दिल्ली आणि उत्तराखंड या सहा राज्यांतून महाराष्ट्रात येणाऱ्यांना कोरोनाचा निगेटिव्ह रिपोर्ट दाखवावा लागणार आहे.
ही सहा राज्ये कोरोना संवेदनशील जाहीर करण्यात आली आहेत. या राज्यातून महाराष्ट्रात येणाऱ्या रेल्वे प्रवाशांना 48 तासांपूर्वीचे RT- PCR टेस्ट बंधनकारक करण्यात आले आहेत.
महाराष्ट्र सरकारनं जारी केलेली संपूर्ण नियमावली पुढीलप्रमाणे -
- प्रवाशांनी संपूर्ण प्रवासात मास्क घालणे बंधनकारक आहे. मास्क न घालणाऱ्यांना 500 रूपयांचा दंड होऊ शकतो.
- प्रवाशांनी रेल्वे स्टेशनात प्रवास करताना थर्मल चाचणी करण्यात येईल. रेल्वेने महाराष्ट्रातल्या स्टेशन्सच्या प्रवेशव्दारांवर थर्मल स्कॅनर्स उपलब्ध करून देणं आवश्यक आहे.
- गाडीत चढताना तसंच उतरताना सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचं पालन करणं आवश्यक आहे.
- प्रवाशांनी स्टेशनमध्ये लवकर येणं अपेक्षित आहे जेणेकरून थर्मल स्कॅनिंगसाठीची गर्दी टाळता येईल, तसंच प्रवाशांना या सगळ्या प्रक्रिया पार पाडण्यासाठी वेळ मिळेल.
- रेल्वेत प्रवास करणाऱ्यांनी मोबाईल तिकीट किंवा ई-तिकीट बाळगणं गरजेचं आहे म्हणजे मोबाईल नंबर व्दारे त्यांचं ट्रेसिंग करता येईल.
- संवेदनशील ठिकाणाहून येणाऱ्या प्रवाशांची RT-PCR चाचणी आवश्यक. या नवीन नियमांअतर्गत कोव्हिड हॉटस्पॉटमधून येणाऱ्या प्रवाशांची 48 तासांच्या आत RT-PCR चाचणी केलेली असणं आणि ती निगेटिव्ह गरजेचं आहे.
- संवेदनशील ठिकाणांहून महाराष्ट्रात येणाऱ्या प्रवाशांची माहिती प्रवासी जाणाऱ्या जिल्ह्यातील आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाला देणं बंधनकारक करण्यात आलं आहे. तसंच ट्रेनची तपशीलवार माहितीदेखील प्राधिकरणाला देणं गरजेचं आहे.
- अशा संवेदनशील ठिकाणाहून येणाऱ्या कोणत्याही प्रवाशाला आरक्षित तिकीटाशिवाय महाराष्ट्रात प्रवास करता येणार नाही.
- कोरोनाच्या नियमांची घोषणा सगळ्या रेल्वे स्टेशन्समध्ये सतत होणं गरजेचं आहे. नियमांचं छापील पत्रकही प्रवाशांना रेल्वेने द्यायला हवं. या घोषणा आणि हे पत्रकं कमीत कमी हिंदी आणि मराठी या दोन भाषांमध्ये हवं.
- इच्छित स्थळी उतरल्यानंतर प्रवाशांच्या RT-PCR चाचणीचा अहवाल पाहून त्यांना सोडण्यात येईल.
- प्रवाशांच्या हातावर होम क्वारंटाईनचा शिक्काही मारण्यात येईल. अशा प्रवाशांना पुढचे 15 दिवस वैद्यकीय इमर्जन्सीखेरीज घराबाहेर पडण्यावर बंदी असेल.
- पॉझिटीव्ह चाचणी किंवा थर्मल स्क्रीनिंगमध्ये कोरोनाची लक्षणं आढळल्यास अशा प्रवाशांना कोव्हिड सेंटरमध्ये हलवण्यात येईल.
- अनेक प्रवाशांकडे RT-PCR चे रिपोर्ट नसू शकतात, अशा परिस्थिती रेल्वेने रॅपिड अँटीजेन टेस्टची सुविधा उपलब्ध करावी असंही या नियमांमध्ये म्हटलं आहे.
हेही वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)




