कोरोना लस : हाफकिनमध्ये वर्षभरात लस निर्मितीचा प्रयत्न - डॉ. संदीप राठोड

फोटो स्रोत, Getty Images
महाराष्ट्रात कोरोनाचा कहर दिवसेंदिवस वाढतोय. देशभरात झपाट्याने पसरणाऱ्या कोरोनासंसर्गाच्या नियंत्रणासाठी लसीकरण एक महत्त्वाचा उपाय आहे असं तज्ज्ञांचं मत आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मागणीनंतर केंद्राने हाफकिन इन्स्टिट्युटला भारत बायोटेककडून हस्तांतरण पद्धतीने 'कोव्हॅक्सीन' लस निर्मितीची परवानगी दिली आहे.
केंद्र सरकारच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाच्या सचिव डॉ. रेणू स्वरूप यांनी राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे यांना याबाबत पत्र लिहून माहिती दिली आहे.
हाफकिन बायोफार्मामध्ये 'कोव्हॅक्सिन'चं उत्पादन कसं केलं जाईल? याला किती कालावधी लागण्याची शक्यता आहे? याबाबत बीबीसीने हाफकिन बायोफार्माचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. संदीप राठोड यांच्याशी चर्चा केली.

फोटो स्रोत, Getty Images
'कोव्हॅक्सीन'चं उत्पादन कधीपर्यंत सुरु होईल?
'कोव्हॅक्सीन' लशीच्या निर्मितीसाठी किमान एक वर्षाचा कालावधी लागण्याचा अंदाज आहे. पण, सर्व आवश्यक परवानग्या मिळवून, भारत बायोटेकसोबत सामंजस्य करार लवकरात-लवकर करून वर्षभराच्या आत लस निर्मिती करण्याचा आमचा प्रयत्न आहे.
केंद्र सरकारच्या कोव्हिड सुरक्षा योजनेअंतर्गत डिपार्टमेंट ऑफ बायटेक्नॉलॉजीकडून आम्हाला परवानगी मिळाली आहे.
प्रश्न - हाफकिनमध्ये वर्षाला किती लशी तयार केल्या जातील?
हाफकिनमध्ये लसनिर्मिती सुरू झाल्यानंतर वर्षाला 22.8 कोटी डोसेस तयार करण्याची आमची क्षमता आहे. हाफकिन बायोटेकच्या परळ मुख्यालयातच लसनिर्मिती केली जाणार आहे.
लस निर्मिती सुरू झाल्यानंतर राज्याला किती डोस मिळतील आणि इतर राज्यांना किती दिले जातील याबाबत अजून निर्णय झालेला नाही.

फोटो स्रोत, Getty Images
लसनिर्मितीसाठी तयारी कशी सुरू आहे?
हा एक महत्वाकांक्षी प्रोजेक्ट आहे. यासाठी एक इंटर्नल टीम असेल. टेक्निकल टीम बनवण्यात येईल.
लस निर्मितीत दोन टप्पे असतात. लशीसाठी लागणाचा कच्चा माल आणि लसनिर्मिती झाल्यानंतर बाटलीमध्ये भरणं. यासाठी सुरक्षा अत्यंत महत्त्वाची आहे. सेफ्टी तीन लेव्हलची लॅब लागते.

- वाचा -कोरोना व्हायरसची लक्षणं कोणती? त्याच्यापासून संरक्षण कसं करायचं?
- वाचा-लहान मुलांमध्ये कोव्हिड-19ची कोणती लक्षणं आढळतात? MIS-C म्हणजे काय?
- वाचा-कोरोनाची लक्षणं जाणवल्यावर कोणती टेस्ट करायची?
- वाचा-लस घेण्यासाठी Co-Win वर नोंदणी कशी करायची?
- वाचा- कोरोना लसीकरणाबाबत तुम्हाला पडलेले 15 प्रश्न आणि त्यांची उत्तरं

लशीसाठी लागणारा कच्चा माल तयार BSL-3 लॅबमध्ये तयार केला जाईल. याच्या उभारणीसाठी सहा ते आठ महिने लागतील. अत्यंत उच्चदर्जाचं तंत्रज्ञान वापरून ही लॅब तयार करावी लागेल. यासाठी शास्त्रज्ञ आणि तंत्रज्ञान विशेषज्ञांची मदत घेणार आहोत.
लशीचा दर्जा उत्तम ठेवण्यासाठी सुरक्षा महत्त्वाची आहे?
लस तयार केल्यानंतर त्याचं प्रमाणीकरण (validation) करण्यात येईल. लशीची सुरक्षा सर्वात महत्त्वाची आहे.
लशीचा दर्जा उत्तम ठेवण्यासाठी विविध टप्प्यात सुरक्षेवर खास लक्ष दिलं जाईल. वेळोवेळी तज्ज्ञांकडून याची तपासणी केली जाईल.
हाफकिनने बनवलेली लस परवडणाऱ्या दरात मिळेल?
हाफकिन बायोफार्मा ही पब्लिक सेक्टर युनिट (सरकारी संस्था) असल्याने आमच्याकडे तयार झालेली लस लोकांना परवडणाऱ्या दरात मिळेत. ही लस महाग असणार नाही.
लसनिर्मिती झाल्यानंतर याचा राज्याला खूप फायदा होईल.
हेही वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)








