लॉकडाऊन किंवा पार्शियल लॉकडाऊनची चर्चा राज्य सरकारनं बंद करावी - देवेंद्र फडणवीस

भारतीय जनता पक्षाचा सरकारच्या लॉकडाऊनला पाठिंबा आहे. पक्ष कार्यकर्त्यांनी सरकारला याबाबत सहकार्य करावं, असं आवाहन विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे.

असं असलं तरी, राज्य सरकारनं लॉकडाऊनची किंवा पार्शियल लॉकडाऊनची चर्चा बंद करावी आणि आरोग्य व्यवस्था उभी करण्याकरता आपण काय करणार आहोत, ते सांगावं, असंही ते म्हणालेत.

उद्धव ठाकरे सरकारनं राज्यात उद्या रात्री 8 वाजल्यापासून निर्बंध लादण्याचा तसंच वीकेंडला लॉकडाऊन लावण्याचा निर्णय घेतला आहे. सरकारच्या या निर्णयानंतर फडणवीस बोलत होते.

फडणवीस यांनी मांडलेले मुद्दे -

  • कोरोनापासून सर्वसामान्य जनतेला दिलासा देण्यासाठी सरकारनं पॅकेज जाहीर करावं, असंही फडणवीस म्हणाले.
  • सध्या कोरोनाची परिस्थिती अत्यंत गंभीर बनली आहे. आज महाराष्ट्रात 57 हजार नवे रुग्ण नोंदवण्यात आले.
  • यादरम्यान, लसीकरण मोहिम वाढवली पाहिजे. आरोग्य व्यवस्था सुधारण्यावर राज्य सरकारने भर द्यावा.
  • राज्यातील लॉकडाऊन आणि अंशतः लॉकडाऊन लावल्याचा वाईट परिणाम हातावर पोट असणाऱ्या लोकांवर पडणार आहे. सरकारने त्यांच्या मदतीसाठी पॅकेज जाहीर केलं पाहिजे. वीज कनेक्शन तोडण्याची मोहीम महाराष्ट्रात सुरू आहे. ही मोहीम आता थांबवली पाहिजे.
  • राज्य सरकारने सातत्याने केंद्र सरकारकडे बोट दाखवणं आता थांबवलं पाहिजे. आम्ही त्यांना सहकार्य करत आहोत, त्यामुळे राज्य सरकारनेही जबाबदारीने काम केलं पाहिजे, असं फडणवीस म्हणाले.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)