You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
अनुराग कश्यप आणि तापसी पन्नू यांच्या घरावर आयकर विभागाचा छापा
प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक आणि निर्माता अनुराग कश्यप आणि अभिनेत्री तापसी पन्नू यांच्या घरावर तसेच कार्यालयांवर आयकर विभागाने छापे मारल्याचे वृत्त एएनआय या वृत्तसंस्थेनी दिले आहे.
पीटीआय या वृत्तसंस्थेनीही या वृत्ताला दुजोरा दिला आहे.
बॉलीवूड अभिनेत्री तापसी पन्नू आणि दिग्दर्शक अनुराग कश्यप यांच्यावर मुंबईत आयकर विभागाची छापेमारी सुरू आहे. मुंबई आणि पुण्यातील 20 ठिकाणी आयकर विभागाकडून छापासत्र सुरू असल्याची माहिती मिळतेय. आयकर विभागातील उच्चपदस्थ अधिकाऱ्यांनी बीबीसी मराठीशी बोलताना तापसी पन्नू आणि अनुराग कश्यप यांच्यावर छापेमारी सुरू असल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे.आयकर अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, कर चोरी प्रकरणी या अभिनेत्यांवर छापेमारी सुरू करण्यात आली आहे. याचसोबत फॅंटम फिल्मवरही छापासत्र सुरू असल्याची माहिती मिळतेय.
'यंत्रणांचा वापर दबाव टाकण्यासाठी केला जातोय'
अनुराग कश्यप आणि तापसी पन्नू यांच्या घरावर आणि कार्यालयांवर आयकर विभागाची सुरू असलेली छापेमारी ही सूडबुद्धीने केली जात असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसने केला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि अल्पसंख्याक विकासमंत्री नवाब मलिक यांनीही या प्रकरणी केंद्र सरकारवर टीका केलीय. ते म्हणाले, "ज्या पद्धतीने अनुराग कश्यम आणि तापसी पन्नू यांच्या घरी आणि आस्थापनेवर छापा मारण्यात आला यातून हे दिसते की जे लोक केंद्र सरकार विरोधात भूमिका घेतात त्यांच्यावर दबाव टाकण्याचा प्रयत्न केला जात आहे. इडी, सीबीआय, आयकर विभाग यंत्रणांचा वापर विरोधकांवर दबाव टाकण्यासाठी केला जात आहे. म्हणूनच फिल्म निर्मात्यांच्या कार्यालयांवर छापे टाकले जात आहेत. त्यांच्या मनात भीती निर्माण करण्यासाठी मोदी सरकार काम करत आहे."
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि मंत्री अशोक चव्हाण यांनीही मोदी सरकार दबावतंत्राचा वापर करत असल्याचा आरोप केला आहे.
ते म्हणाले, "हे सगळं देशाच नित्याचे झाले आहे. केंद्र सरकार विरोधात भूमिका घेतली किंवा अभिव्यक्त स्वातंत्र्य वापरून आपले मत मांडलं अशा लोकांची गळचेपी करण्यासाठी त्यांच्याकडे असलेल्या यंत्रणांचा वापर केला आहे. त्याचाच हा भाग असावा असे मला वाटते."
हे वाचलंत का?
- मुंबईला वीज पुरवठा कोण करतात? मुंबईत वीज कधीच कशी जात नाही?
- चीनी सायबर हल्ल्यामुळेच मुंबईमध्ये 12 ऑक्टोबरला लाईट गेले होते?
- फेब्रुवारीतच उन्हाने शरीराची होत आहे लाहीलाही, पुढे काय होणार?
- कोरोनाला रोखण्यासाठी काय आहे मुंबई महापालिकेचं 'मिशन झिरो'?
- कोरोनावर मात करण्यासाठी मुंबईकरांमध्ये तयार झालेली 'हर्ड इम्युनिटी' आहे काय?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता. रोज रात्री 8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा )