शरद पवार म्हणतात, 'भारतातल्या सामान्य जनतेचा लोकशाहीवर प्रचंड विश्वास'

शरद पवार

फोटो स्रोत, Ncp

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी इंदिरा गांधींनी लादलेल्या आणीबाणीविषयी भाष्य केलं.

ते म्हणाले, "आणीबाणीच्या काळात देश एका वेगळ्याच परिस्थितीला सामोरा गेला. पण, या देशातल्या सामान्य जनतेच्या मनात लोकशाहीविषयी खूप विश्वास आहे.

"आणीबाणीनंतर जनतेला संधी मिळाली तेव्हा जनतेनं आपली ताकद मतपेटीतून दाखवली आणि इंदिरा गांधींना सत्तेपासून दूर ठेवलं."

शरद पवारांनी मांडलेले मुद्दे -

  • एकच विचार आणि एकाच संघटना देशाचा कारभार चालवत असेल तर काही ना काही समस्या उद्भवतात. यामुळे देशाला मार्ग दाखवण्यासाठी समाजवादी विचारांची शक्ती जयप्रकाश नारायण यांच्या नेतृत्वात देशासमोर आली होती.
  • यानंतर देशभरात एका विचारातून अनेक संघटना एकत्र यायला लागल्या. मजबूत व्हायला लागल्या. यात समाजवादी विचारांवर श्रद्धा असलेले नेते तरुण वर्गाला आकर्षित करत होते.
  • त्यानंतर अनेक समाजवादी विचारांचा पुरस्कार करणाऱ्या नेत्यांचं एक संघटन देशात जन्मास आलं.
  • आणीबाणीच्या काळात देश एका वेगळ्याच परिस्थितीला सामोरा गेला. पण, या देशातल्या सामान्य जनतेच्या मनात लोकशाहीविषयी खूप विश्वास आहे.
  • आणीबाणीनंतर जनतेला संधी मिळाली तेव्हा जनतेनं आपली ताकद मतपेटीतून दाखवली आणि इंदिरा गांधींना सत्तेपासून दूर ठेवलं.

हेही वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)